Current Affairs | चालू घडामोडी | 03 FEB 2026
1) ३ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) पहिली इलेक्ट्रिक ट्रेन = ३ फेब्रुवारी १९२५
- मार्ग = व्ही टी ते कुर्ला
१.२) बॉम्बे हाय येथील पहिली तेलविहिर खोदली = ३ फेब्रुवारी १९७४
- तेलविहिरीचे नाव = सागर सम्राट
१.३) उमाजी नाईक यांचा हौतात्म्य दिन = ३ फेब्रुवारी १८३४
१.४) १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन
१.५) १९६९: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांचे निधन

2) ऑस्ट्रेलियन ओपन २०२६
- महिला विजेते
- विजेती : एलिना रायबाकिना (कझाकस्तान)
- उपविजेती : आर्यना सबालेंका (बेलारूस)
- पुरुष विजेते
- विजेता = कार्लोस अल्काराज (स्पेन)
- उपविजेता = नोवाक जोकोविच (सर्बिया)
- ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराझने ‘करिअर ग्रँड स्लॅम’ (चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे) पूर्ण केले.
- असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे
- ग्रँड स्लॅम स्पर्धा
- ऑस्ट्रेलियन ओपन – हार्ड कोर्ट
- यूएस ओपन – हार्ड कोर्ट
- विंबल्डन – ग्रास कोर्ट (गवताचे मैदान)
- फ्रेंच ओपन – क्ले कोर्ट (लाल मातीचे मैदान)
- चार ग्रँड स्लॅम स्पर्धा व त्यांचा कालावधी
- ऑस्ट्रेलियन ओपन – जानेवारी (स्थापना: 1905)
- फ्रेंच ओपन – मे ते जून (स्थापना: 1891)
- विंबल्डन – जून ते जुलै (स्थापना: 1877) (सर्वात जुनी)
- यूएस ओपन – ऑगस्ट ते सप्टेंबर (स्थापना: 1881)
- ग्रँड स्लॅम म्हणजे काय?
- एका कॅलेंडर वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे
- गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणजे काय?
- एका वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि ऑलिंपिक सुवर्णपदक दोन्ही जिंकणे

3) अरालम वन्यजीव अभयारण्य
- केरळमधील व भारतामधील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित
- हे केरळमधील एकमेव वन्यजीव अभयारण्य आहे जिथे सर्वाधिक प्रमाणात फुलपाखरांच्या प्रजाती आढळतात
- वैशिष्ट्ये:
- स्थान: हे केरळच्या कन्नूर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या उतारावर स्थित आहे.
- फुलपाखरांचे नंदनवन: येथे फुलपाखरांच्या सुमारे २५० हून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
- स्थलांतर: दरवर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात फुलपाखरांचे स्थलांतर पाहायला मिळते, जे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते.
- पक्षी आणि प्राणी : फुलपाखरांव्यतिरिक्त हे अभयारण्य मलबार धनेश, हत्ती, सांबर आणि विविध प्रकारच्या वनस्पतींसाठी देखील प्रसिद्ध आहे

4) श्रीनिवास डेम्पो यांना ‘कॅव्हलिअर डेल’ऑर्डिन डॅला स्टेला डी’इटालिया’ सन्मान
- जानेवारी २०२६ मध्ये, इटलीच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी श्रीनिवास डेम्पो यांना ‘कॅव्हलिअर डेल’ऑर्डिन डॅला स्टेला डी’इटालिया’ हा प्रतिष्ठित नागरी सन्मान प्रदान केला आहे.
- सन्मानाचे स्वरूप: हा इटलीचा एक उच्च नागरी सन्मान (Order of the Star of Italy) असून, तो द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.
- कारण: श्रीनिवास डेम्पो यांनी भारत आणि इटली, विशेषतः गोवा आणि इटली यांच्यातील व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.
- पद: श्रीनिवास डेम्पो हे डेम्पो समूहाचे अध्यक्ष असून गोव्यातील एक नामवंत उद्योजक आहेत.

5) वकील प्रशिक्षण अकादमी : देशातील पहिलाच ऐतिहासिक प्रकल्प
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर
राज्य शासनाने दिलेल्या जागेचा उत्कृष्ट उपयोग करून कमी कालावधीत भव्य व आधुनिक वास्तू उभारण्यात आली आहे. - वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू करण्याचा हा देशातील पहिलाच निर्णय आहे.
- उद्घाटन सोहळा – तळोजा
- उद्घाटन : माजी सरन्यायाधीश न्या. भूषण आर. गवई यांच्या हस्ते
- अध्यक्ष : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. चंद्रशेखर
- प्रमुख उपस्थिती
- न्या. रेवती मोहिते-डेरे – मुख्य न्यायमूर्ती, मेघालय उच्च न्यायालय
- अॅड. अनिल सी. सिंग – अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
- डॉ. मिलिंद साठे – महाधिवक्ता, महाराष्ट्र
- अॅड. देविदास पांगम – महाधिवक्ता, गोवा
- राज्य शासनाचे आर्थिक पाठबळ
- अकादमीसाठी ₹10 कोटी अनुदान
- आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निधी वितरित होणार

6) चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रम – चर्चेतील योजना
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) २०२२ मध्ये चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याचा उद्देश भारत सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये आत्मनिर्भर बनवणे आणि या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करणे आहे
- कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये:
- मनुष्यबळ विकास: पुढील ५ वर्षांत ८५,००० उद्योगासाठी तयार सेमीकंडक्टर डिझाइन व्यावसायिकांची निर्मिती करणे
- नाविन्य आणि स्टार्टअप्स: चिप डिझाइनमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणे, नवीन IP तयार करणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण सक्षम करणे
- संशोधन आणि विकास: शैक्षणिक संस्था आणि R&D केंद्रांना चिप डिझाइनसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे
- आत्मनिर्भर भारत: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर एक प्रमुख केंद्र बनवणे
- हा कार्यक्रम C-DAC च्या मदतीने राबवला जात असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आणि स्टार्टअप्सचा सहभाग आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel