Current Affairs | चालू घडामोडी | 11 FEB 2026
1) ११ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) नेल्सन मंडेला यांची २७ वर्षांनी कारागृहातून सुटका = ११ फेब्रुवारी १९९०
- कारागृह = व्हिक्टर वेस्टर, केप टाऊन, द. आफ्रिका
१.२) १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले
१.३) १८४७: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म
१.४) १९४२: प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचे निधन
१.५) १९८६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या

2) ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे पहिले बंदर
- व्ही.ओ. चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर
- बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय अंतर्गत
- स्थान – थुथुकुडी, तामिळनाडू
- मुख्य उद्देश – सागरी व किनारी सुरक्षा मजबूत करणे आणि बंदर पायाभूत सुविधांचे संरक्षण
- तंत्रज्ञान आधार – रेडिओ फ्रिक्वेन्सी + रडार आधारित शोध व जॅमिंग प्रणाली
- कव्हरेज क्षमता – 360-डिग्री सर्वदिशात्मक कव्हरेज / 5 KM पर्यंत रेंज
- मुख्य घटक -ड्रोन डिटेक्टर
- विशेष वैशिष्ट्य – स्वदेशी इलेक्ट्रॉनिक काउंटर-मेजर तंत्रज्ञान
- अंमलबजावणी संस्था – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

3) अलवर – १००% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा
- अलवर -भारतातील १००% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरला
- राज्य – राजस्थान
- उपक्रमाचे नाव – “Insurance for All by २०४७”
- अंमलबजावणी संस्था -भारत सरकार + वित्त मंत्रालय + IRDAI
- सर्वेक्षण पद्धत – घरोघरी जाऊन विमा नसलेल्या लोकांची ओळख
- वयोगट – १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांवर लक्ष
- पूर्णपणे विमा उतरवलेली गावे – ९ गावे अधिकृत घोषित
- विमा कंपनी – United India Insurance Company Limited
- मुख्य उद्दिष्ट – आर्थिक समावेशन व सामाजिक सुरक्षितता मजबूत करणे

4) वायु शक्ती हवाई सराव २०२६
- ठिकाण – जैसलमेर, राजस्थान
- मुख्य उद्देश – आक्रमक व बचावात्मक हवाई क्षमतांची चाचणी व प्रदर्शन
- सरावाचे महत्त्व – वर्षातील भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई लढाऊ सराव
- सहभागी कमांड – Western Air Command आणि South-Western Air Command
- लढाऊ विमाने – Rafale, SU-30 MKI, Tejas, MiG-29, Jaguar, Mirage-2000, Hawk (100+)
- विशेष नोंद – MiG-21 विमान IAF मधून निवृत्त झाल्यामुळे पहिल्यांदाच सरावात सहभागी नाही
- निरीक्षक व पाहुणे – अनेक VVIPs आमंत्रित, सुमारे 40 परदेशी दूतावास अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता

5) Global Firepower Index २०२६ (GFP)
- Global Firepower Index २०२६ (GFP)
- २०२६ – लष्करी ताकदीनुसार जगातील सर्वोच्च शक्तिशाली देश
- मूल्यमापन देशांची संख्या – 145 देश
- मोजमाप पद्धत – स्कोअर जितका कमी तितका देश अधिक शक्तिशाली
- Rank 1 – अमेरिका
- Rank 2 – रशिया
- Rank 3 – चीन
- Rank 4 – भारत
- Rank 5 – दक्षिण कोरिया
- Rank 145 – भूतान (सर्वात शेवट)

6) भारतीय लष्कराची पहिली ‘क्वांटम लॅब’
- भारतीय लष्कराची पहिली ‘क्वांटम लॅब’ महू येथे
- भारतीय लष्कराने मध्य प्रदेशातील महू (Mhow) येथील ‘मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग’ (MCTE) मध्ये आपली पहिली ‘क्वांटम लॅब’ (Quantum Lab) स्थापन केली आहे.
- या लॅबचे मुख्य उद्दिष्ट क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन आणि प्रशिक्षण वाढवणे हे आहे, ज्यामुळे भविष्यातील युद्धतंत्र आणि सुरक्षित दळणवळण यंत्रणा अधिक मजबूत होईल.
- याच ठिकाणी लष्कराने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सेंटर’ देखील उभारले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel