Current Affairs | चालू घडामोडी | 01 AUG 2025
1) १ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९२० = लोकमान्य टिळक पुण्यतिथी
१.२) १९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म.
१.३) १९२० = असहकार चळवळ प्रारंभ
- कारण = जालियनवाला बाग हत्याकांड व खिलाफत वाद
- अखिल भारतीय खिलाफत समितीचे अध्यक्ष = म. गांधी (1919)
- नेते = अली बंधू, मौलाना आझाद, हजरत मोहानी
१.४) १९६२ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन (MIDC)
१.५) २०१४ = पालघर जिल्हा निर्मिती
१.६) राज्य महसूल दिवस

2) UK मध्ये मतदानाचे वय 16 वर्षा पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव
- 17 जुलै 2025 रोजी हा निर्णय जाहीर केला
- पंतप्रधान – कीर स्टार्मर यांनी
- मतदान वय – 18 वरून 16 वर्षे करणार
- पुढील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी (2030 पूर्वी)
- अंदाजे 15 लाख 16 ते 17 वयोगटातील लोकांना मिळणार मतदान अधिकार
- स्कॉटलँड आणि वेल्समध्ये आधीच 16 वर्षे वयोगटासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आहे.
- युकेमध्ये मतदानाचे वय शेवटचे 1969 मध्ये 21 वरून 18 पर्यंत कमी करण्यात आले होते
- भारताचे मतदानाचे वय 18 वर्षे आहे

3) ASI ने मिझोरामच्या “लुंगफुन रोपईला” राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले
- ASI – Archaeological Survey of India
- घोषणा – 14 जुलै 2025
- ठिकाण – लियानपुई गाव, चांफई जिल्हा, मिझोराम
- लियानपुई गावाची स्थापना 18व्या शतकात लुसेई प्रमुख लियानपुई याने केली होती
- प्राचीन स्मारके पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा, 1858 अंतर्गत राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित
- आता याचे संरक्षण आणि देखभाल जबाबदारी ASI कडे.
- लुंगफुन रोपई (Lungphun Ropui) स्मारक काय आहे
- हे एक मेगालिथ साइट आहे
- 114 बारकाईने कोरलेले प्राचीन दगडी रचना आहेत
- यामध्ये मानवी आकृत्या, प्राणी, पक्षी, सरडे आणि इतर सांस्कृतिक आकृत्यांचे तपशीलवार कोरीवकाम आहे
- अशा स्मारकांपैकी सर्वात मोठ्या दगडाची उंची 1.87 मीटर आणि रुंदी 1.37 मीटर आहे.

4) पश्चिम घाटातील नवीन लायकेन प्रजाती आढळली
- नाव – अलोग्राफा एफ्युसोसोरेडिका (Allographa effusosoredica)
- लायकेन्स परिसंस्थांमध्ये, माती तयार करण्यात, कीटकांना खायला घालण्यात आणि निसर्गाचे जैव निर्देशक म्हणून काम करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात
- संशोधन संस्था – MACS-आघारकर संशोधन संस्था , पुणे
- भारतात सापडलेली ही प्रजाती, आण्विक डेटाद्वारे समर्थित देशातील पहिली अलोग्राफा आहे
- अलोग्राफा एफ्युसोसोरेडिका ही भारतात आढळणाऱ्या प्रजातींपैकी 53 वी आणि एकट्या पश्चिम घाटातील 22 वी प्रजाती बनली आहे
- ही प्रजाती फंगस आणि शैवाल यांच्या सहजीवनातून तयार झालेली आहे.
- यात लायकेन मध्ये norstictic acid नावाचे दुर्मीळ रसायन आढळले आहे. हे रसायन Allographa जीनसमधील इतर समान प्रजातींशी तुलनेत दुर्मीळ मानले जाते
- लायकेन हे पर्यावरणीय बदलांचे जैवसूचक (bioindicators) म्हणून काम करतात

5) AI आणि रोबोटिक शिकविणारी राज्यातील पहिली जि.प. शाळा – केळशी
- शुभारंभ – 24 जुलै 2025 ला
- जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 – केळशी
- तालुका – दापोली
- जिल्हा रत्नागिरी
- स्काय रोबोटिक्स, पुणे यांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे
- पहिली ते सातवी पर्यंत

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel