Current Affairs | चालू घडामोडी | 01 OCT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 01 OCT 2024

1) 1 ऑक्टोबर दिनविशेष

1.1) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

1.2) 1 ऑक्टोबर 1847 = ॲनी बेझंट जयंती

  • कार्य= भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या प्रथम महिला अध्यक्ष (कलकत्ता, 1917)
  • वृत्तपत्रे = न्यू इंडिया, कॉमन विल

1.3) 1 ऑक्टोबर 2000 = भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) स्थापना

2) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

  • कौशल्य विकास विभागामार्फत व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राबवली जात आहे
  • महत्वाचे मुद्दे
    • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी रुपये ५ हजार ५०० कोटींची तरतूद
    • उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा
    • कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने राहील
    • दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार
    • १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये, आय.टी.आय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये
    • उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार

3) 1 ऑक्टोबर = जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना
  • मोफत प्रवास
    • ७५ वर्षों पुढील ज्येह नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या सर्व बसमध्ये मोफत प्रवास
  • अर्थसहाय्य
    • श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील महिला आणि पुरुषांना १,५००/- रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य
  • निराधार ज्येष्ठांसाठी
    • ६० वर्षावरील पुरुष व १५ वर्षांवरील महिलांना वृद्धाश्रमात प्रवेश व प्रतिमाह २,२००/- रुपये परिपोषण अनुदान
  • हेल्पलाइन
    • ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन १४५६७
  • निराधारांना आधार
    • निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रम योजना
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना
    • ज्येष्ठ नागरिकोना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
    • ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रासह देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी
  • महामंडळाची स्थापना
    • ज्येष्ठ नागरिकोसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

    4) बीड जिल्ह्यात सीताफळ इस्टेट तर नाशिकला डाळींब इस्टेट स्थापण्याचा निर्णय

    • या निर्णयानुसार नाशिक मधील मालेगाव येथील तालुका फळरोपवाटिका निळगव्हाण येथे डाळींब इस्टेट स्थापन करण्यात येईल. यासाठी ३९ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली जाईल.
    • तर बीड जिल्ह्यात मौजे वडखेल (ता.परळी) येथे सीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ५३ कोटी ६० लाख २५ हजार रुपयांची तरतूद केली जाईल.

    5) गोर बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ संस्थेस मंजुरी

    • गोर बंजारा जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी ‘वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी)’ ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
    • या संस्थेमध्ये गोर बंजारा जमातीसह काही प्रमाणात विमुक्त जाती, भटक्या जमाती-ब, भटक्या जमाती-क व भटक्या जमाती-ड यांना स्थान राहणार आहे.

    6) जगातील सर्वाधिक वार्षिक मानधन घेणारे राष्ट्रप्रमुख

    • सिंगापूर चे पंतप्रधान लॉरेन्स वांग हे सर्वसाधारण वार्षिक मानधन घेणारे जागतीक नेते ठरले आहेत.

    7) महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’

    • गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पाण्डेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
    • या वर्षी बँकेला श्रेष्ठ गृह पत्रिका या श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळाला. नवी दिल्ली येथे आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात बँकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
    • देशभरातील विविध सरकारी कार्यालये, उपक्रम आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी व राजभाषा अधिकाऱ्यांचीही या कार्यक्रमाला हजेरी होती.

    8) मिथुन चक्रवर्ती यांना 2022 चा 54 वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला.

    • मिथुन चक्रवर्ती यांच्याविषयी
      • जन्म १६ जून १९५० रोजी झाला.
      • 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या मृणाल सेन दिग्दर्शित ‘मृगया’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार
      • एकूण 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला
      • पुण्यातील FTII मधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं
    • दादासाहेब फाळके पुरस्कार विषयी
      • स्थापना = 1969
      • दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे .
      • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हा पुरस्कार दिला जातो
      • पहिला पुरस्कार = अभिनेत्री देविका राणी
      • 54 वा = मिथुन चक्रवर्ती (2022)
      • 53 वा = वहिदा रेहमान (2021)
      • 52 वा = आशा पारेख
      • 51 वा = रजनीकांत
      • 50 वा = अमिताभ बच्चन
    • स्वरूप = हा पुरस्कार प्राप्तकर्त्यांना एक शाल, सुवर्ण कमळ पदक आणि रु. 15 लाख मिळतात
    • अभिनेता पृथ्वीराज कपूर (1971) आणि अभिनेता विनोद खन्ना (2017) हे एकमेव मरणोत्तर प्राप्तकर्ते आहेत.

    9) माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    • अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी धर्मपाल मेश्राम यांची नियुक्ती तर गोरक्षक लोखंडे आणि वैदेही वाढाण यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    10) मान्याचीवाडी अव्वलस्थानासह एक कोटीच्या बक्षिसाची मानकरी, ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्रिक’

    • ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धेत वैशिष्ठ्यपूर्ण ग्राम म्हणून सर्वदूर लौकिकास असलेल्या मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक आणि एक कोटीचा पुरस्कार पटकावला.
    • राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने घेतलेल्या या स्पर्धेत मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारून ‘हॅट्रिक’ साधली.
    • पर्यावरणाच्या संगोपन आणि संवर्धनासाठी राज्य शासनातर्फे चार वर्षांपासून ‘माझी वसुंधरा अभियान’ स्पर्धा सुरु आहे.

    Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
    MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
    Telegram Channel || WhatsApp Channel

    TelegramWhatsAppCopy LinkShare

    Leave a Comment