Current Affairs | चालू घडामोडी | 15 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 FEB 2024

1) 15 फेब्रुवारी

 • 52 वी घटनादुरुस्ती = 15 फेब्रुवारी 1985
  • पक्षांतर विरोधी कायदा व शेड्युल दहा चा समावेश
 • वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन = 15 फेब्रुवारी 2019
  • अगोदरचे नाव = ट्रेन 18
  • पहिला मार्ग = दिल्ली ते वाराणसी

2) ‘पुस्तकांचे गाव’ या धर्तीवर ‘पुस्तकांचा बगिचा’ ही राज्यातील पहिली नावीन्यपूर्ण संकल्पना एरंडोल नगरपरिषदेने (जळगाव जिल्हा) सुरू केली आहे.

3) महाराष्ट्रातील 6 राज्यसभा जागांच्या निवडणुका 27 फेब्रुवारी रोजी

 • भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली.
 • राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विद्यमान खासदार प्रफुल पटेल यांना उमेदवारी दिली
 • शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली
 • काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.
 • महाराष्ट्रात एकूण राज्यसभा जागा = 19

4) आंतरजातीय-धर्मीय नवविवाहितांसाठी साताऱ्यात ‘आश्रयस्थळ’!

 • आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहानंतर अनेक तरुण-तरुणींना सामाजिक बहिष्कारापासून जीवघेण्या हल्ल्यापर्यंतच्या घटनांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर अशा दाम्पत्यांना सुरुवातीचा काही काळ सुरक्षित निवारा देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे सातारा जिल्ह्यात राज्यातील पहिले ‘सुरक्षित आश्रयस्थळ’ उभारण्यात आले आहे.

5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे भक्तिगीत आणि स्वामीनारायण संप्रदायाच्या आध्यात्मिक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.

 • अबुधाबीमध्ये बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने (BAPS) मंदिर बांधले आहे.

6) तमिळनाडू विधानसभेत ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ धोरणाविरोधात ठराव

7) संविधानभान

 • प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना संविधान लिहिण्याचे काम देण्यात आले.
 • ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी या हस्तलिखिताची सुंदर सजावट केली होती तर नंदलाल बोस यांनी काढलेली सुरेख चित्रं संविधानात होती आणि संविधानाच्या मुखपृष्ठाला सोनेरी वर्ख होता.

8) निवडणूक फंडिंग साठी मोदी सरकारने आणलेली इलेक्टोरल बॉन्डस स्कीम घटनाबाह्य असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

 • माहिती अधिकार कायद्यातील कलम 19(1)(A) चे ते उल्लंघन करते असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला
 • पारदर्शकतेच्या नावाखाली जनतेसोबत अशी लपवाछपवी योग्य नसल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे
 • सोबतच इलेक्ट्रॉल बाँँड्सची विक्री थांबवण्याचा आणि पुढच्या तीन आठवड्यामध्ये याचे सगळे तपशील जाहीर करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे
 • संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांना इलेक्टोरल बॉण्ड्सचे रिफंड देण्याचे सुद्धा आदेश कोर्टाने दिले आहेत.

9) विदेशात वेतनाद्वारे कमावलेले उत्पन्नावर भारतात आयकर भरण्याची गरज नाही.

 • प्राप्तिकर अपील न्यायधिकरणाच्या दिल्ली पिठाचा निर्णय.

10) भारतीय कसोटी संघात दोन नवीन चेहऱ्यांनी पदार्पण केले.

 • सर्फराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल हे करणार आपले पदार्पण.
 • रणजी गाजवणाऱ्या मुंबईकर सर्फराजला अखेर संधी मिळत आहे. अनिल कुंबळे यांनी त्याला इंडिया कॅप दिली. तर ध्रुव जुरेल याला माजी यष्टिरक्षक दिनेश कार्तिक याने इंडिया कॅप प्रदान केली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment