Current Affairs | चालू घडामोडी | 16 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 FEB 2024

1) दादासाहेब फाळके पुण्यतिथी = 16 फेब्रुवारी 1944

 • भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक
 • पहिला भारतीय चित्रपट = राजा हरिश्चंद्र (1913)

2) निवडणूक रोखे घटनाबाह्य

 • राजकीय पक्षांना निनावी देणग्या देण्याची व्यवस्था असलेली केंद्र सरकारची निवडणूक रोखे (इलेक्टोरल बाँड्स) योजना घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.
 • ही योजना माहिती अधिकाराच्या कायद्याचेही उल्लंघन करते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 • तसेच राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांचा तपशील निवडणूक आयोगाला ६ मार्चपर्यंत सादर करावा, असे आदेशही स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) देण्यात आले आहेत.
 • मागील सहा वर्षांमध्ये निवडणूक रोख्यांद्वारे सर्वाधिक रक्कम भाजपाकडे जमा. भाजपा पाठोपाठ दुसऱ्या नंबरला काँग्रेसकडे सर्वाधिक रक्कम
निवडणूक रोखे म्हणजे काय ??
 • हे एक राजकीय पक्षांना देणगी देण्याचे एक आर्थिक साधन आहे.
 • केंद्रीय अर्थमंत्र्यांनी २०१७-१८च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा
 • निवडणूक रोखे योजना, २०१८ नुसार हे रोखे हमीपत्राच्या स्वरूपात दिले जातात
 • त्यावर खरेदीदार किंवा ते देणाऱ्याच्या नावांचा उल्लेख नसतो. मालकीहक्काची कोणतीही नोंद नसते
 • रोख्यांचा धारक म्हणजेच राजकीय पक्ष त्याचा मालक असल्याचे गृहीत धरले जाते.
 • भारतीय नागरिक व देशातील कंपन्यांना एक हजार, दहा हजार, एक लाख, दहा लाख आणि एक कोटींपैकी कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येत होते.
 • या रोख्यांची वैधता १५ दिवसांची असते. या १५ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीत न वठविलेल्या रोख्यांची रक्कम संबंधित बँकेद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केली जाते.
 • संबंधित पक्षांना देणगी देणाऱ्यांना वैयक्तिक किंवा संयुक्तपणे रोखे खरेदी करता येऊ शकतात
 • एक व्यक्ती किंवा कंपनी कितीही निवडणूक रोखे खरेदी करू शकते.
 • निवडणूक रोख्यांतून ते खरेदी करणाऱ्या नागरिकांची माहिती मिळत नसली तरी सरकार स्टेट बँकेकडून ही माहिती मागू शकते.

3) अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष ठरतो, असा निवाडा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला.

 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद पक्षातील फूट नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवले.

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कतार दौरा

 • कतार सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये अटक केल्यानंतर मृत्युदंडाची शिक्षा केलेल्या आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी कतारने सुटका केली. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या नेत्यांची ही बैठक झाली.
 • पंतप्रधानांचा हा दुसरा कतार दौरा आहे. यापूर्वी त्यांनी जून २०१६ मध्ये भेट दिली होती.

5) जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था

 • 2024 मधील जगातील टॉप अर्थव्यवस्था
  • अमेरिका
  • चीन
  • जर्मनी
  • जपान
  • भारत

6) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी समिती स्थापन

 • 2024 ला पुन्हा एकदा पाठपुरावा समितीची स्थापना त्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मूळे आहेत
 • 2012 साली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती
 • भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे.
  1.तामिळ (2004)
  2.संस्कृत (2005)
  3.कन्नड (2008)
  4.तेलुगु (2008)
  5.मल्याळम (2013)
  6.ओडिया (2014)
 • अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात
  • संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा. 
  • या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे. 
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
  • प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment