Current Affairs | चालू घडामोडी | 01 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 01 DEC 2023

1) गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन.

  • गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांचे सहकारी आणि ते मुख्याधिकारी असलेली कंपनीचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर यांचे वयाच्या 99 या वर्षी 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले.

2) हेन्री किसिंजर यांचे निधन.

  • अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला आकार देणारे नोबेल विजेते रणनीतिकार हेन्री किसिंजर यांचे वृद्धापकाळाने निधन.
  • 1973 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • व्हिएतनांचे युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
  • संपूर्ण शीतयुद्धाच्या काळात किसिंजर पाकिस्तानच्या बाजूने झुकलेले राहिले.

3) एनडीएच्या (NDA) दीक्षांत संचालनात नवा इतिहास.

  • 75 वर्षांच्या एनडीएच्या वाटचालीत प्रथमच मुलींच्या बटालियनने राष्ट्रपतींना दिली मानवंदना.
  • पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे ही मानवंदना देण्यात आली.

4) जीडीपीत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 7.6 सहा टक्के वाढ

  • आरबीआयच्या अंदाजापेक्षा अधिक दर.

5) भारतीय नौदलासाठी 97 ‘तेजस’ लढाऊ विमाने आणि 150 ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आले.

  • या निर्णयामुळे आता नौदलात देखील तेजस विमाने दिसून येणार.

6) 1 डिसेंबर = अंटार्क्टिका दिन

  • अंटार्क्टिका खंड पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धाच्या साधारण मध्यावर असलेल्या पठारावर असून त्याला अंटार्क्टिक महासागराने वेढलेले आहे. अंटार्क्टिका महासागर हा हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक या तीन महासागरांचा दक्षिण भाग आहे. अंटार्क्टिका खंड हा पृथ्वीवरचा एकमेव खंड आहे जिथे कधी युद्ध झाले नाही की ज्यावर कोणत्याही राष्ट्राची मालकी नाही.
  • हा खंड कायमस्वरूपी पर्यटन व विज्ञान यासाठी राखीव राहावा म्हणून अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे 1 डिसेंबर 1959 रोजी एक महत्त्वाचा करार झाला.
  • आत्तापर्यंत 50 हून अधिक राष्ट्रांनी या करारावर सह्या केलेले आहेत.
  • भारताने 1981 साली अंटार्क्टिकाच्या करारावर सही करून आणि कराराचा पंधरावा सल्लागार सभासद होऊन स्वतःच्या पहिल्या वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली.
  • अंटार्क्टिका कराराला 2009 साली पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त झालेल्या वार्षिक सभेत अंटार्क्टिका दिन दरवर्षी एक डिसेंबरला साजरा करण्याचे ठरले
  • यानंतर 2010 सालापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

7) एक डिसेंबर = जागतिक एड्स दिन


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment