Current Affairs | चालू घडामोडी | 30 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 30 NOV 2023

1) 30 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय संगणक सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो.

  • नुकताच डिजिटल डेटा प्रोटेक्शन कायदा 2023 संसदेने संमत केला आहे. त्यामुळे आपला डेटा खाजगी राहून त्याचा दुसऱ्या कारणासाठी गैरवापर करता येणार नाही
  • जुना २००० सालचा आयटी कायदा बदलून तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे झालेले नवे बदल सामावून घेण्यासाठी नवा डिजिटल इंडिया कायदा ही आता येऊ घातलेला आहे असे माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी विधान केले
  • महाराष्ट्र सरकारचा पहिला महत्त्वकांक्षी सायबर सुरक्षा प्रकल्प पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सायबर पोलिसांची विशेष शाखा तयार करण्यात येत आहे.

2) 30 नोव्हेंबर 2023 पासून वाळवंटातील दुबई येथे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेस सुरुवात होत आहे.

  • संयुक्त अरब अमीरतीकडे ‘COP 28’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्यावरण परिषदेचे यजमानपद आहे.

3) गारपीट

  • नुकतीच महाराष्ट्रात गारपिटीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले.
  • थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगातून गारपीट निर्माण होते.
  • बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा अरबी समुद्रावरून येणारे वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. परिणामी येणारे ढग किंवा बाष्पयुक्त वारे उंची वाढून नऊ ते बारा किलोमीटरवर जाऊन पोहोचतात . उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये असणारे थंड वारे काही कारणामुळे दक्षिणेकडे वाटचाल करतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्र पर्यंत पोहोचतो. हा वाऱ्याचा प्रवाह कोरडा असतो. तो वरच्या थरात आणि बाष्प असलेल्या आर्द्रतायुक्त हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते . अशाप्रकारे थंड हवा आणि बाष्पयुक्त हवेच्या संयोगातून गारांची निर्मिती होते.
  • पावसाळ्यात विशिष्ट उंचीवर जाणारे ढग असत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गारपीट होत नाही. ही घटना बहुतेक वेळा उन्हाळ्याच्या सुरुवातीस होते. हिमालय पर्वतांच्या रांगांमध्ये हिमवर्षाव होतो तर मध्य आणि दक्षिण भारतात गारपीट होते.

4) ‘एंडलेस बॉर्डर्स’ या इराणी चित्रपटाला इफ्फी मध्ये सुवर्ण मयूर पुरस्कार.

  • 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता होताना चाळीस लाख रुपयांचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘अब्बास इमिनी’ दिग्दर्शित ‘इराणी’ फिल्म ‘एंडलेस बॉर्डर्स’ ला मिळालेला आहे.

5) बचत गटांसाठी ‘लखपती दीदी’ नावाची योजना.

  • या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना शेतीच्या कामासाठी उपयुक्त असलेले ड्रोन उपलब्ध करून दिले जाणारा असून याद्वारे महिलांना दरमहा एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
  • देशातील निवडक 15000 एस एच जी गटांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • दहा ते बारा गावांचे एक क्लस्टर निर्माण केले जाणार.
  • केंद्र सरकारकडून 80 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त आठ लाख रुपये बचत गटांना दिले जाणार आहेत.

6) राज्यात राबवणार ‘सुंदर शाळा’ अभियान

  • शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल.
  • क्रीडा आरोग्य स्वच्छतेचे महत्व राष्ट्रप्रेम व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयीची कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
  • हे अभियान 45 दिवस राबविले जाईल.

7) राज्यपालांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक सूचनांबाबत चाचपणी

  • केरळ विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयके राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी दोन वर्ष प्रलंबित ठेवल्यामुळे सर्वोच्च न्यायालया चा मार्गदर्शक सूचनांचा विचार.

8) विना पेट्रोल विमानाने केला लंडन ते न्यूयॉर्क प्रवास

  • ‘नेट झिरो’ च्या धरतीवर ‘जेट झिरो’ संकल्पना.

9) मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी तीस कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपये करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

  • अल्पसंख्यांक महामंडळाकडून मुदत कर्ज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज तसेच सूक्ष्म पतपुरवठा केला जातो.

10) नागरिकांच्या तक्रारी जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जात पंचायत मूठ माती अभियाना तर्फे हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे.

  • जात पंचायती विरोधातील ही राज्यातील पहिली हेल्पलाईन आहे.

11) जी २० आणि भारत

  • भारताने नुकतेच G20 च्या अध्यक्षपद स्वीकारले होते. ‘वसुधैव कुटुंबकम’ , ‘एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य’ हे परिषदेचे घोषवाक्य होते.
  • G20 सदस्यांनी एकमताने नवी दिल्ली नेत्यांचे घोषणापत्र स्वीकारले.
  • G20 चे कायम सदस्य म्हणून आफ्रिकन संघाच्या समावेशाने ५५ आफ्रिकी देश या मंचाशी जोडले गेलेले आहेत आणि या माणसाचा विस्तार जागतिक लोकसंख्येच्या 80 टक्के पर्यंत केला.
  • भारताने दोन टप्प्यांमध्ये ‘व्हाईस ऑफ द ग्लोबल साऊथ समिट’ आयोजित केली होती. ग्लोबल साउथ (जगाच्या दक्षिणेकडील विकसनशील देश)
  • नवी दिल्ली घोषणापत्रात ‘हरित विकास करार’ तसेच उपासमारीचा सामना करणे आणि पृथ्वीचे संरक्षण करणे हे त्यामध्ये नमूद होते
  • जी 20 नवी दिल्ली घोषणापत्र यामध्ये 2030 पर्यंत जागतिक अक्षय ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे महत्त्वकांक्षी ध्येय निश्चित करण्यात आलेले आहे.
  • शाश्वत विकास पूरक जीवनशैली (लाईफ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) (LiFE) या माध्यमातून पुरातन शाश्वत परंपरांचा जगाला लाभ मिळू शकतो असे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत.
  • ‘लिंगभाव समानता’ हे घोषणापत्राच्या केंद्रस्थानी आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment