Current Affairs | चालू घडामोडी | 29 NOV 2023
1) उत्तर काशी मधील सिल्क्यारा बोगद्यातून कामगारांची यशस्वी सुटका करण्यात आली.
- ‘रॅट होल मायनिंग’ चे यश
- मागील 17 दिवसापासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2023 रोजी 41 कामगार उत्तरकाशी मधील ‘सिल्क्यारा’ बोगद्यात अडकले होते.
- 𝟰𝟭 कामगार 𝟭𝟳 दिवस अडकून होते.
- त्यांच्या सुटकेमध्ये NDRF, SDRF, भारतीय लष्कर, अरनॉल्ड डिक्स (बोगदा तज्ञ ऑस्ट्रेलिया), ख्रिस कूपर (मायक्रो-टनेलिंग तज्ञ) आणि उत्तराखंड बोगदा बचाव कार्य यांनी यशस्वीपणे कार्य पार पाडले.
2) रॅट होल मायनिंग पद्धत (हाताने पारंपारिक पद्धतीने)
- सध्या रॅट होल मायनिंग बंदी आहे.
- खाणीतून कोळसा काढण्यासाठी हे तंत्र उपयुक्त आहे. चार फुटांपेक्षा अरुंद बोगद्यात खोदून कोळसा काढण्यासाठी ही पद्धत अवलंबतात.
- चिंचोळ्या बोगद्यात शिरून या पद्धतीने काम करण्यासाठी मेघालयात अनेकदा मुलांचा वापर केला जातो.
- ही पद्धत अवैज्ञानिक असल्याने ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने’ (NGT) 2014 मध्ये बंदी घातली आहे.
3) राज्यात अकृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या वैद्यकीय आणि वैयक्तिक अपघात विमा योजनेचे ‘स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना’ असे नामकरण करण्यात आले आहे.
- राज्य सरकारने 16 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांसाठीच्या विमा योजनेची घोषणा केली होती.
4) भारत श्रीलंकेच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप.
- भारत आणि श्रीलंकेच्या सैन्य दलात ‘मित्र शक्ती 2023’ हा संयुक्त लष्करी सराव पुण्यातील काऊन मिलिटरी स्टेशन येथे झाला.
5) ‘गाळयुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेत गाळ उपसा करून तो गाळ शेतात टाकण्यासाठी शेतमालकास एकरी 15000 रुपये अनुदान राज्य सरकारने देते.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel