Current Affairs | चालू घडामोडी | 02 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 02 DEC 2023

1) राज्यातील वस्त्रोद्योगाला महाटफ्स(महाराष्ट्र टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम) योजनेमुळे गती.

  • केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्राची मदतीची नवी योजना. नियोजनासाठी समितीची स्थापना.
  • टफ्स (टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड स्कीम) ही भारत सरकारची योजना असून याच्याच धर्तीवर महाराष्ट्राने ‘महाटफ्स’ योजना सुरू करण्याचे ठरविले आहे.
  • टफ्स योजना 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने सुरू केली होती. परंतु सध्या केंद्राची योजना स्थगित असल्याने वस्त्रोद्योगाची गरज लक्षात घेत राज्य शासनाने ही योजना आता ‘महाटफ्स’ नावाने सुरू करण्याचे ठरविले आहे.

2) किसान रेल्वे बंद

  • कृषी मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणारी वाहतूक दरातील सवलत केंद्र सरकारने बंद केल्याने किसान रेल्वेला मिळणारा प्रतिसाद कमी झाला आहे.
  • प्रतिसाद नाही म्हणून सरकारने देशभरातील सर्व अठरा किसान रेल्वे गाड्या बंद केल्या.
  • कृषी क्षेत्राला आधार देण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर अभियानांतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन योजना’ 2020 मध्ये सुरू केली होती. त्यानंतर शेतकरी व प्रक्रिया उद्योगांना शेतमालाची साठवून व वाहतूक भाड्यात 50 टक्के अनुदान दिले जात होते. त्यासाठी विशेष गाडी ‘किसान रेल्वे’ सोडली जात होती.
  • मात्र 31 मार्च 2021 नंतर ही योजना बंद करण्यात आली.

3) दरवर्षी, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

  • इतिहास:
    2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कीटकनाशक प्लांटमधून इतर रसायनांसह एक हानिकारक रसायन – मिथाइल आयसोसायनेट – सोडण्यात आले. मध्यप्रदेश सरकारने हानिकारक वायूंच्या संपर्कात आल्याने 25000 लोकांना मृत घोषित केले. आजपर्यंत, ही जगभरातील सर्वात धोकादायक औद्योगिक आपत्तींपैकी एक म्हणून ओळखली जाते. दुर्दैवी घटनेमुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 थीम-
    राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 ची थीम आहे “स्वच्छ आणि निरोगी पृथ्वीसाठी शाश्वत विकास.

4) पोषण आहारात अंडी देण्यास विरोध.

  • सरकारी शाळांमध्ये शालेय पोषण आहारात अंडी आणि केळीचे समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यानुसार आता प्रत्येक बुधवारी किंवा शुक्रवारी विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी पुलाव बिर्याणी देण्यात येणार आहे.
  • मात्र या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केलेला आहे.
  • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेत मुलांना दुपारचे जेवण दिले जाते त्यानुसार सध्या शाळांमध्ये खिचडी दिली जाते.
  • पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 450 कॅलरी तर 12 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात.
  • सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरी व 20 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते.

5) कॉप 28= दुबई (यूएई)

  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप 28 मध्ये भाषण केले
  • यावेळी त्यांनी कार्बन उत्सर्जन शोषक प्रणालीच्या (कार्बन सिंक) निर्मितीवर भर देणारा ‘ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह’ (GCI) कृती कार्यक्रम जाहीर केला
  • यावेळी मोदींनी भारतात 2028 मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषद किंवा कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या 33 व्या सत्राचे (COP 33) आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला.
  • दुबईत सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेच्या 28 व्या सत्रात (COP 28) विविध देशांच्या प्रमुखांना संबोधित करताना मोदींनी याची घोषणा केली.
  • COP 28 चे अध्यक्ष आणि यजमान दुबईचे सुलतान अल जाबेर आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदलाचे अध्यक्ष सायमन स्टील यांच्यासह उद्घाटन सत्राला उपस्थित राहणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव राष्ट्रप्रमुख होते.

6) यंदा कडाक्याची थंडी नाहीच

  • हवामान शास्त्राच्या 174 वर्षांच्या इतिहासात यंदाचे वर्ष म्हणजे 2023 हे सर्वाधिक उष्ण ठरू शकते .
  • 1850 ते 1900 या काळातील सरासरी तापमानाच्या तुलनेत यंदा जागतिक तापमानात सुमारे 1.40 अंशाने वाढ झालेली आहे.

7) विंडफॉल कर

  • तेल उत्पादन कंपन्यांना कोणतेही अतिरिक्त संसाधने खर्च न करता अनपेक्षितपणे कमावलेल्या मोठ्या नफ्यावर आकारला जाणारा कर म्हणून त्याला विंडफॉल टॅक्स असे म्हटले जाते
  • केंद्र सरकारने 1जुलै 2022 पासून या कराची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.

8) 43 वे मराठवाडा साहित्य संमेलन गंगापूर = छत्रपती संभाजीनगर

9) पुन्हा मंजूर केलेली विधेयके राष्ट्रपतींकडे पाठवू नयेत: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

  • विधिमंडळाने संमत केलेली आणि पुन्हा स्वीकृती केलेली विधेयके राज्यपाल राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवू शकत नाही असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला
  • अनुच्छेद 200= राज्यपालांनी पहिल्याच वेळी संबंधित विधेयके राष्ट्रपतींकडे पाठविण्यासाठी राखून ठेवायला हवी होती. त्यांनी ती विधानसभेकडे परत पाठवले असतील आणि नंतर विधानसभेने ती पुन्हा मंजूर करून राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवले असतील तर राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाही असे सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी घटनेच्या अनुच्छेद 200 चा संदर्भ देत स्पष्ट केले.

10) आयुका च्या संचालकपदी प्रा. आर श्रीआनंद यांची नियुक्ती.

  • देशातील खगोल अभ्यासाच्या क्षेत्रात महत्त्वाची संस्था असलेल्या आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयूका) संचालक पदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. रघुनाथन श्रीआनंद यांची नियुक्ती करण्यात आली.
  • कॉस्मोलॉजी आणि खगोल भौतिक क्षेत्रात श्री आनंद यांनी अनेक वर्षापासून कार्य केलेले आहे.
  • रेडशिफ्ट इव्होल्युशन, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड रेडिएशन अशी अनेक संशोधने त्यांच्या नावावर आहेत.
  • ते इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स चे फेलो आहेत
  • CSIR ने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मानाचा ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’ 2008 साली प्रा. श्रीआनंद यांना दिलेला आहे.

11) आभासी पद्धतीने ‘प्रज्ञा’ या सशस्त्र दलांच्या संगणकीय औषधोपचार केंद्राचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.

  • याचवेळी पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाला प्रेसिडेंट कलर हा सन्मान देऊन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

12) शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यास सुरुवात.

  • यासाठी शाळा मधील शिक्षकांनी ‘स्विफ्टचॅट’ या मोबाईल उपयोजनाद्वारे आपल्या वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यास सुरुवात केली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment