Current Affairs | चालू घडामोडी | 03 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 03 DEC 2023

1) जागतिक दिव्यांग दिन = 3 डिसेंबर

  • हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो.
  • अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे.
  • The theme for the 2023 International Day of Persons with Disabilities (IDPD) is “United in action to rescue and achieve the SDGs for, with and by persons with disabilities”.

2) दिव्यांग कल्याण इतिहास

  • जागतिक दिव्यांग दिन = 3 डिसेंबर
  • संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण अधिवेशनात दिव्यांगांना मानवाधिकार देणारा ठराव मंजूर करण्यात आल्यानंतर 1981 हे वर्ष अपंग वर्ष म्हणून घोषित करण्यात आले
  • त्यानंतर दिव्यांगांसाठी निश्चित धोरण आखून ‘अपंगत्वापासून संरक्षण’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
  • कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 1981 ते 1991 हे दशक ठरविण्यात आले.
  • यातूनच पुढे 1987 मध्ये मानसिक आरोग्य कायदा, भारतीय पुनर्वास कायदा 1992, अपंग व्यक्ती कायदा 1995 तसेच राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999 आदी कायदे झाले.
  • महाराष्ट्र राज्यात दिव्यांग कल्याण विषयक योजना राबविण्यासाठी अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मध्ये कलम 60 अन्वये 2000 मध्ये स्वतंत्र आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली
  • 2001 मध्ये महाराष्ट्र सरकारने अपंग कल्याण कृती आराखडा जाहीर केला.
  • 2016 मध्ये भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी सुधारित कायदा आणला. यामध्ये नवीन 14 दिव्यंगत्वाचा समावेश करण्यात आला होता.
  • 3 डिसेंबर 2022 रोजी दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने मंत्रालयात दिव्यांग कल्याण स्वतंत्र विभाग सुरू झाला.

3) सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात

  • देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल सहा नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आला त्या देशातील 28 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशातील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली यात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे.
  • नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम राबविण्यात येतो. यात पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण ठरविले जाते.
  • 311 नद्यांपैकी सर्वाधिक महाराष्ट्र मध्ये 55 नद्या आहेत.
  • महाराष्ट्रातील मिठी मुळा सावित्री आणि भीमा या सर्वाधिक प्रदूषित तर त्या खालोखाल गोदावरी पावना कंधार आणि मुळा मुठा या नद्या प्रदूषित आढळल्या.

4) महिला कैद्यांसाठी देशातील पहिले फुले कारागृह येरवड्यात.

  • जन्मठेपेसह गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेल्या काही त्यांना खुल्या कारागृहात ठेवण्यात येते. खुल्या कारागृहात बराकी नसतात. शिक्षेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कैद्यांना भिंतीआड राहावे लागत नाही. खुल्या कारागृहात वसाहती असतात. तेथे शेती असते. तेथे फारसा बंदोबस्त नसतो. नियमित हजेरी देण्याशिवाय अन्य बंधने कैद्यांवर नसतात.
  • येरवडा कारागृह देशातील सर्वात मोठे कारागृह म्हणून ओळखले जाते.
  • येरवडा परिसरात महिलांसाठी खुले कारागृह बांधण्याची घोषणा तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी केली होती. 15 ऑगस्ट 2010 रोजी खुल्या कारागृहाची भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मात्र त्यानंतर निधी अभावी हे रखडले.
  • येरवडा महिलांसाठी फुले कारागृह सुरू झाल्यानंतर देशातील किंबहुना आशिया खंडातील ते पहिले कारागृह ठरणार आहे.

5) आर. वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर

  • बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मिळविणारे ते पहिलेच बहिण भाऊ ठरलेले आहेत.
  • भारताचा विघ्नेश एन आर हा भारताचा 80 व ग्रँडमास्टर झाला होता. यासह विघ्नेश आणि विशाख हे ग्रँडमास्टर किताब मिळविणारे पहिलेच भारतीय भाऊ भाऊ ठरले होते.
  • आर. वैशाली ही भारताची 84 वी ग्रँडमस्टर ठरली तर जगातील 42 वी महिला खेळाडू ठरली.
  • ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली तिसरी भारतीय महिला ठरली. यापूर्वी कोनेरू हम्पीने 2002 मध्ये तर द्रोणावली हरिकाने 2011 मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळविला होता.

6) कॉप 28 परिषद

  • ‘ग्लोबल स्टोकटेक’ने विकसित राष्ट्रांनाही त्यांच्या अपयशाचा हिशोब मागायला हवा अशी मागणी ‘बेसिक’ या राष्ट्र संघटनेने केले आहे
  • ‘ग्लोबल स्टोकटेक’ हा पॅरिस करारातील महत्त्वाचा घटक आहे या घटकांनुसार पॅरिस करारात ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणी होते आहे की नाही याचे मूल्यांकन केले जाते.
  • ‘बेसिक’ या राष्ट्र संघटनेत ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन या देशांचा समावेश होतो.
  • दुबईतील या परिषदेत श्रीमंत आणि विकसित देशांवरील बांधीलकीच्या करारावर सहमती झाली. यामुळे 430 दशलक्ष डॉलर्स चा निधी विकसनशील देशांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
  • 2009 साली ‘ग्रीन क्लायमेट फंड’ जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार गरीब आणि विकसनशील देशांना श्रीमंत देश 2020 पर्यंत प्रत्येक वर्षी 100 अब्ज डॉलरचा पुरवठा करण्याबाबत सहमती झाली होती.

7) ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान

  • राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व जिल्हा परिषद व महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी 5000 दत्तक शाळा योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
  • या देणगीदारांना पाच ते दहा वर्षांच्या करारावर शाळा दिली जाणार आहे या बदल्यात शाळांना देणगीदारांचे नाव दिले जाणार आहे.
  • राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियाना सोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा- माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन या उपक्रमांचा प्रारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात पाच डिसेंबरला करण्यात येणार आहे.
  • ‘माझी शाळा माझी परसबाग’ उपक्रमातून शाळांमध्ये परसबाग असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment