Current Affairs | चालू घडामोडी | 23 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 23 NOV 2023

1) ओपन एआय कडून सॅम अल्टमन यांना सीईओ म्हणून परत घेणार.

2) पेरूमल मुरूगन यांना 2023 चा साहित्यातील जेसीबी पारितोषिक मिळाले आहे.

  • “फायर बर्ड “या साहित्यासाठी.

3) ‘श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान’.

  • महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम 2007 च्या धर्तीवर हे अभियान सुरू करण्यात येणार आहे
  • गावातील महिलांचा विकास सन्मान आणि आदर राखणाऱ्या गावांना बारा निकषांच्या चाचणीवर या अभियानात पुरस्कार दिले जाणार आहेत
  • आर आर पाटील यांनी तंटामुक्त गाव अभियानाला 19 जुलै 2007 रोजी सुरुवात केली होती.

4) प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एसटी स्थानकावर ‘आपला दवाखाना’ स्थापनार.

  • याच सोबत राज्यातील प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल उभारण्यात येणार.

5) नवभारत साक्षरता कार्यक्रम.

  • 2022 ते 2027 या काळात राबवणार
  • नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात = 8 सप्टेंबर 2023 पासून होत आहे.
  • अंमलबजावणी जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असून ‘शाळा’ हा एकक मानून निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार.
  • 27 ते 47 वर्षे वयोगटातील निरक्षकांच्या सर्वेक्षणाचे व साक्षर करण्याचे काम शिक्षकांकडे सोपवण्यात आले आहे
  • 15 ते 35 या वयोगटातील निरक्षरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे.
  • उद्दिष्ट = दरवर्षी एक कोटी या प्रमाणे पाच वर्षात पाच कोटी निरक्षरांना साक्षर करणे. ( 2027 पर्यंत )
  • सहाय्य = NCERT, NIOS, NIC

6) पुणे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’.

  • रेल्वेच्या जुन्या डब्याचे उपाहारगृहात रूपांतर करण्यात येणार
  • रेल्वे प्रशासनाने 2020 पासून ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली.
  • पहिले अशा स्वरूपाचे उपाहारगृह पश्चिम बंगालमधील ‘असनसोल’ स्थानकावर उभे राहिले.

7) जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत राज्य सरकारने ज्येष्ठ सनदी अधिकारी सुबोध कुमार, के पी बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव यांची समिती स्थापन केली होती.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment