Current Affairs | चालू घडामोडी | 02 AUG 2025
1) 2 ऑगस्ट दिनविशेष
1.1) 2 ऑगस्ट 1861 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1944)
1.2) 2 ऑगस्ट 1876 : ‘पिंगाली वेंकय्या’ – भारतीय तिरंग्याचे रचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1963)
1.3) 2 ऑगस्ट 1954 : दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांकडून भारतीयांनी ताब्यात घेतली.
1.4) १९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन
2) “मेरी पंचायत” मोबाइल ॲप्लिकेशनला जागतिक माहिती सोसायटी समिट (WSIS) 2025 चा चॅम्पियन पुरस्कार मिळाला आहे.
- वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) प्राइजेस 2025 चॅम्पियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे
- श्रेणी – “सांस्कृतिक विविधता आणि ओळख, भाषिक विविधता आणि स्थानिक सामग्री” या श्रेणीत पुरस्कार
- पुरस्कार दिला – 7 ते 11 जुलै 2025 दरम्यान जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आयोजित WSIS+20 हाय-लेव्हल इव्हेंट दरम्यान झाला
- हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (ITU) आयोजित केला होता.
- “मेरी पंचायत” ॲप
- 2.65 लाख ग्रामपंचायतींसाठी एम-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म
- 95 कोटी ग्रामीण लोकांची ताकद बनले आहे
- बजेट, विकास योजना, तक्रार निवारण सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध.
- 12 + भाषांमध्ये उपलब्धतेमुळे डिजिटल समावेशन वाढण्यास मदत

2) डॉ. नितीन करीर यांची राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
- राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- ही नियुक्ती राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.
- माजी अध्यक्ष मुकेश खुल्लर यांचे ७ जुलै २०२५ रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.
- खुल्लर यांची नियुक्ती १ एप्रिल २०२५ रोजी झाली होती.
- राज्य वित्त आयोग – महत्त्वाचे मुद्दे:
- ही संस्था घटनात्मक दर्जाची आहे.
- प्रथम आयोग सन १९९४ मध्ये स्थापन झाला.
- राज्य, केंद्र व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील आर्थिक समतोल राखणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे.
- आयोगाच्या शिफारशींसाठी अंतिम अहवाल सादरीकरणाची नवीन मुदत – ३१ मार्च २०२६.

3) Henley Passport Index मध्ये
भारताचा 77 वा क्रमांक
- भारत आठ स्थान वर गेला
- 2025 – 77 व्या स्थानावर 〰️
- 2024 – 85 व्या स्थानावर
- व्हिसा-फ्री देश 2025 : 59 देश 〰️
- व्हिसा-फ्री देश 2024 : 57 देश
- नवीन 2 देश – फिलिपिन्स , श्रीलंका यांचा समावेश
- भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी सुधारणा (8 स्थानांनी)
- भारताचे सर्वोच्च स्थान -2006 मध्ये 71
- भारताचे सर्वात खराब स्थान – 2021 मध्ये 90
- पाहिले 3 क्रमांक
- सिंगापूर 🇸🇬 (193 देश व्हिसा फ्री)
- जपान 🇯🇵(190 देश व्हिसा फ्री)
- दक्षिण कोरिया 🇰🇷 (190 देश व्हिसा फ्री)
- शेवटचा क्रमांक – अफगाणिस्तान ( फक्त 25 देशांत प्रवेश करता येतो)

4) पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठीचे मुख्य अतिथी
- मालदीव स्वातंत्र्य दिन – 26 जुलै 2025
- मालदीव स्वतंत्र झाला – 26 जुलै 1965 (ब्रिटिशांच्या पासून)
- राष्ट्राध्यक्ष – डॉ. मोहम्मद मुइज्झु यांचे आमंत्रण
- हा मालदीवचा 60 वा स्वातंत्र्य दिन आहे
- भारत-मालदीव राजनैतिक संबंधांलाही 60 वर्ष पूर्ण होत आहेत
- मालदीवचे राष्ट्रपती मुइज्जू यांच्या ‘इंडिया आउट’ धोरणामुळे 2023-24 मध्ये भारत-मालदीव संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
- मालदीव बद्दल
- राजधानी – माले
- क्षेत्रफळ : 298 km2 (155 sq mi)
- लोकसंख्या : 515,132 (2022 साली)
- GDP : $6.977 billion
- स्वातंत्र्य घोषित : 26 जुलै 1965
- अधिकृत भाषा: दिवेही
- धर्म : इस्लाम ( अधिकृत)
- अध्यक्ष: मोहम्मद मोइझू
- चलन : मालदीवियन रूफिया
- मालदीव हा आशियातील सर्वात लहान देश आहे
- ब्रिटन कडून स्वतंत्र – 26 जुलै 1965

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel