Current Affairs | चालू घडामोडी | 02 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 02 FEB 2026

1) २ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) जागतिक पाणथळ दिवस

  • पाणथळ जागा संबंधीच्या रामसर कराराचा स्वीकार या दिवशी = २ फेब्रुवारी १९७१
  • एकूण रामसर स्थळे = ९८
    (नुकतेच २ नवीन स्थळांना रामसर दर्जा मिळाला आहे)
  • जगात सर्वाधिक = UK
  • भारतात सर्वाधिक = तामिळनाडू (२०)

१.२) मेकॉले मिनिट जाहीर = २ फेब्रुवारी १८३५

  • इंग्रजी भाषेचा शिक्षण पद्धतीत समवेशास समर्थन

१.३) MGNREGA योजनेची सुरूवात = २ फेब्रुवारी २००६-

  • Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act, 2005
  • जगातील सर्वात मोठी रोजगार हमी योजना
  • नवीन नाव – विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) २०२५’ म्हणजेच ‘व्हीबी जी राम जी’ (VB-G RAM G)

2) सागर मैत्री मिशन

  • भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या ‘सागर मैत्री’ (SAGAR MAITRI) या संयुक्त वैज्ञानिक मोहिमेच्या पाचव्या टप्प्याचे (SM-5) यशस्वी आयोजन
  • प्रारंभ: १७ जानेवारी २०२६ रोजी कोची येथील दक्षिण नौदल कमांडमधून INS सागरध्वनी (INS Sagardhwani) या संशोधन जहाजावरून
  • उद्दिष्ट: हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) देशांमध्ये सामाजिक-आर्थिक सहकार्य वाढवणे आणि महासागर संशोधनात वैज्ञानिक देवाणघेवाण मजबूत करणे.
  • सहभागी देश: ओमान, मालदीव, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि म्यानमार या ८ देशांशी वैज्ञानिक सहकार्य प्रस्थापित केले जाते. चालू मोहिमेत
  • प्रामुख्याने मालदीव सोबतच्या सहकार्यावर भर दिला जात आहे.
  • INS सागरध्वनी: हे DRDO च्या ‘नेव्हल फिजिकल अँड ओशनोग्राफिक लॅबोरेटरी’ (NPOL) द्वारे संचालित एक विशेष महासागर संशोधन जहाज आहे.
  • हे जहाज १९६२-६५ मधील ऐतिहासिक ‘आयएनएस किश्ना’च्या मार्गाचा पुनरुच्चार करत वैज्ञानिक डेटा गोळा करेल.
  • मोहीम भारताची ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ (UDA) वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण

3) तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी

  • जानेवारी २०२६ मध्ये तमिळनाडू सरकारने ‘तमिळनाडू डीप टेक स्टार्टअप पॉलिसी’ अधिकृतपणे जाहीर
  • अशा प्रकारची स्वतंत्र आणि समर्पित पॉलिसी जाहीर करणारे तमिळनाडू हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

मुख्य वैशिष्ट्ये:

१. निधीची उपलब्धता: डीप टेक स्टार्टअप्सना सुरुवातीच्या टप्प्यावर मदत करण्यासाठी १० कोटी रुपयांचा विशेष ‘डीप टेक सीड फंड’ स्थापन करण्यात आला आहे.

२. प्रोत्साहन: सेमीकंडक्टर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या प्रगत क्षेत्रांतील संशोधनावर आधारित स्टार्टअप्सना चालना देणे हा या धोरणाचा उद्देश आहे.

३. पायाभूत सुविधा: या स्टार्टअप्सना प्रयोगशाळा (Labs) आणि ‘इंटेलॅक्च्युअल प्रॉपर्टी’ (IP) नोंदणीसाठी सरकारकडून विशेष सवलती दिल्या जाणार आहेत.

४. लक्ष्य: पुढील काही वर्षांत राज्यात मोठ्या संख्येने उच्च-स्तरीय तंत्रज्ञान कंपन्या निर्माण करून तमिळनाडूची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे.

4) RBI कडून ‘अंतर्गत लोकपाल’साठी नवे कडक नियम

  • बँका व वित्तीय संस्थांमध्ये तक्रारींचा निपटारा लांबत असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
  • आता ही अडचण दूर होणार असून RBI ने ‘अंतर्गत लोकपाल’ प्रणाली अधिक मजबूत केली आहे.
  • अंतर्गत लोकपालची भूमिका
    • लोकपाल थेट ग्राहकांकडून तक्रारी स्वीकारणार नाही
    • बँकेकडे तक्रार करूनही ग्राहक असमाधानी असल्यास लोकपाल अंतिम निर्णय देईल
    • त्यामुळे ग्राहकांना न्याय मिळणे अधिक सोपे व जलद होणार
  • लोकपाल कोण असू शकतो? (नियम)
    • सेवानिवृत्त किंवा सेवेत असलेला अधिकारी
    • दर्जा – महाव्यवस्थापक (General Manager) समकक्ष
    • बँकिंग / नियमन / ग्राहक संरक्षण क्षेत्रात किमान 7 वर्षांचा अनुभव अनिवार्य
  • कोणत्या संस्थांसाठी नियम लागू?
    व्यावसायिक बँका
    • स्मॉल फायनान्स बँका
    • पेमेंट बँका
    • NBFC व क्रेडिट कंपन्या
  • प्रत्येक संस्थेला किमान एक ‘अंतर्गत लोकपाल’ नेमणे अनिवार्य
  • बँकिंग लोकपाल योजना १९९५ साली सुरू करण्यात आली आहे आणि ही योजना बँक बाबत जर ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर निवारण करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

5) ‘अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026’

  • ‘अखिल भारतीय व्याघ्र अनुमान 2026’ चा पहिला टप्पा तमिळनाडूतील थंथाई पेरियार वन्यजीव अभयारण्य येथे सुरू झाला आहे.
  • पाचवी व्याघ्र गणना: ही देशातील पाचवी व्याघ्र गणना असून ती दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTRA) द्वारे आयोजित केली जाते.
  • थंथाई पेरियार अभयारण्य: हे तामिळनाडूतील १८ वे वन्यजीव अभयारण्य असून ते ईरोड जिल्ह्यातील अंथियुर आणि गोबीशेट्टीपलयम वनविभागात विस्तारलेले आहे.
  • प्रक्रिया: या टप्प्यात वन कर्मचारी ‘M-STrIPES’ या मोबाईल ॲपचा वापर करून वाघांच्या पाऊलखुणा, विष्ठा आणि इतर खुणांची नोंद घेणार आहेत.
  • महत्त्व: थंथाई पेरियार अभयारण्य हे सत्यमंगलम आणि बिलीगिरी रंगास्वामी मंदिर (BRT) व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग (Corridor) असल्याने या गणनेला विशेष महत्त्व आहे.

6) बजेट २०२६

  • वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी ₹53.5 लाख कोटींचा बजेट सादर केला.
    • राजकोषीय घाटा (Fiscal Deficit) साधारण 4.3–4.4% of GDP ठेवण्याचा उद्देश.
    • Public Capital Expenditure (CAPEX) वाढवून ₹12.2 लाख करोड़ करण्यावर भर (अधुना आणि भविष्यातील विकासासाठी).
  • विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर
    • मोठा इन्फ्रास्ट्रक्चर पुश – रेल्वे, रस्ते, जहाज, जलमार्ग विस्तारीकरण (20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग)
    • हाई-स्पीड रेल कॉरिडोर (उदा. मुंबई–पुणे, पुणे–हैदराबाद)
    • Dedicated freight corridor (Dankuni ते Surat), Coastal cargo योजना.
  • उद्योग व MSME
    • Manufacturing आणि Strategic Sectors वर जोर (Bio-pharma, semiconductors, electronics).
    • India Semiconductor Mission 2.0 ₹40,000 करोड़चा प्रकल्प
  • कर आणि करसुविधा
    • इनकम-टॅक्स स्लॅबमध्ये थेट बदल नाही, पण Filing/Compliance सुलभ करणारे बदल.
    • TCS (विदेशात ट्रॅव्हल / शिक्षण / वैद्यकीय खर्च) कमी करून 2% केले
  • विशेष कार्यक्रम
    • Girls’ hostels प्रत्येक जिल्ह्यात STEMमध्ये.
    • AVGC कंटेंट labs, शिक्षणातून रोजगार जोडण्याचे उपक्रम

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment