Current Affairs | चालू घडामोडी | 02 OCT 2024
अनुक्रमणिका
1) आजच्या दिवशी भारतात अशा दोन व्यक्तींनी जन्म घेतला की त्यांच्यामुळे देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख मिळाली. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना आदराने बापू संबोधले जाते आणि दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री.
- आज गांधी यांची १५३ वी तर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी होत आहे
- मोहनदास करमचंद गांधी – जन्मः ऑक्टोबर २, इ.स. १८६९ मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८
- लाल बहादूर शास्त्री – जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १९०४ मृत्यू: जानेवारी ११, इ.स. १९६६
2) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन : 2 ऑक्टोबर
- जगभरात 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा केला जातो.
- सुरुवात : 15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं 2 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला.
- महात्मा गांधींना संपूर्ण जगानं खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा एक मार्ग आहे.
- थीम 2024 : शांततेची संस्कृती जोपासणे
3) भारतामध्ये रंगणार पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा
4) मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त
- अभिजात दर्जा मिळवणारी मराठी ही सातवी भाषा
- मराठी सोबतच बंगाली, आसामी, प्राकृत, पाली या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता एकूण अभिजात भाषा 11 झाल्या आहेत
- ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
- तमिळ (2004) T
- संस्कृत (2005) S
- कन्नड (2008) K
- तेलगू (2008) T
- मल्याळम (2013) M
- ओडिया (2014) O
- 2024 :
- मराठी
- पाली
- बंगाली
- आसामी
- प्राकृत
- अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील 4 निकष लावले जातात :
- भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान 1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
- हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
- सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.
- अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार?
- अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
- भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं.
- अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात.
- सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं.
5) मराठी, पाली, प्राकृत, आसामी व बंगाली यांसारख्या भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला
- अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय होईल ?
- अभिजात भाषेचा प्रसार आणि विविध उपक्रमासाठी विशेष निधीची तरतूद केंद्र सरकार कडून केली जाते.
- पुरातन साहित्य, हस्तलिखिते आणि कलाकृतीचे संरक्षण होईल आणि त्यांचे डिजिटायझेशन प्राधान्याने होऊ शकेल
- यामुळे संशोधन संस्था निर्माण होतील ज्यामुळे महत्त्वाच्या ग्रंथांचे अनुवाद व प्रकाशन सोपे होईल.
- भाषिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत मिळू शकेल.
- या भाषांशी संबंधित ऐतिहासिक ठिकाणे आणि सांस्कृतिक केंद्रे पर्यटन स्थळे म्हणून विकसित होण्यास मदत होईल.
- या भाषांशी निगडीत कला, विधी आणि सणांचे म्हणजेच भाषांशी निगडीत सांस्कृतिक संरक्षण होईल
- निर्माण होऊ शकणाऱ्या रोजगार संधी:
- या भाषांसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू होतील व भाषा तज्ज्ञ, शिक्षकांसाठी मागणी वाढेल.
- भाषेतील विद्वान व संशोधकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होतील.
- संग्रहालये आणि ग्रंथालयांना तज्ञांची गरज भासेल.
- अनुवादक आणि संपादकांची मागणी वाढेल.
- सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल आणि त्यामुळे तज्ज्ञ मार्गदर्शकांची गरज भासेल.
- डिजिटल माध्यमांना या भाषांवर आधारित कार्यक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासेल.
- डिजिटायझेशनमुळे IT व्यावसायिकांसाठी संधी वाढतील.
- उद्योजक भाषाशिक्षण व हेरिटेज टुरिझमवर आधारित व्यवसाय सुरू करू शकतात.
- सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज वाढेल, ज्यासाठी व्यावसायिकांची मागणी वाढेल.
6) सर्जन व्हाइस ॲडमिरल आरती सरीन यांनी सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला असून, त्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत
7) संभाजी राजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाची ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता
- निवडणूक चिन्ह = सप्तकिरणांसह पेनाची निब
8) उरण नगरपरिषदेस शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पारितोषिक जाहिर.
- महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावराणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो.
- दि. २७ सप्टेंबर रोजी जाहिर केलेल्या निकालानुसार कोकण महसुली विभागातुन उरण नगरपरिषदेस उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाले असुन रु.५० लक्ष असे पारितोषीकाचे स्वरुप आहे.
- माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत ४१४ नागरी स्थानीक संस्था व सुमारे २२२१८ ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel