Current Affairs | चालू घडामोडी | 03 AUG 2025
1) ३ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९०० = क्रांतिसिंह नाना पाटील जयंती
- सातारा येथील प्रति सरकारचे संस्थापक
- बीड जिल्ह्याचे माजी खासदार
१.२) १९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली
2) भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार
- दिनांक – 24 जुलै 2025 ला हा करार झाला
- पूर्ण अंमलबजावणी साठी – एकूण 15 महिने अपेक्षित
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लंडन भेटीदरम्यान हा करार
- तीन वर्षांच्या चर्चेनंतर हा करार पूर्ण झाला
- Brexit नंतर यूकेचा सर्वात मोठा व्यापार करार
- भारत आणि युनायटेड किंगडममधील व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA)
- 99% भारतीय निर्यातीला यूकेमध्ये शुल्कमुक्त प्रवेश मिळेल
- समुद्री उत्पादनांवर शुल्क पूर्णपणे काढले जाणार (मासे वगैरे)
- भारतीय व्यावसायिकांना 35 क्षेत्रांमध्ये दोन वर्षांपर्यंत UK मध्ये कार्यालय नसतानाही काम करण्याची संधी मिळेल
- करारामध्ये 27 प्रकरणांचा समाविष्ट आहेत
- व्यापारात 584500 कोटींच्या वाढीची शक्यता

3) विदर्भातील वाघांच्या निरिक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर
- ठिकाण – नागपूर मध्ये
- महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत करार
- महाराष्ट्र सरकारने जुलै 2025 मध्ये ‘मार्वल’ कंपनी सोबत करार केला आहे 🤝
- MARVEL – Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement Ltd
- 3150 AI सक्षम कॅमेरे स्थापित करण्याचा निर्णय घेतला
- गावात अलार्म सिस्टम बसविण्यात आले आहेत वाघ बिबट्या आल्यावर सायरन वाजवले जातात
- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील 20 गावांमध्ये AI चेतावणी प्रणाली कार्यरत आहे

4) महाभियोग प्रस्ताव – न्या. यशवंत वर्मा प्रकरण
- प्रकरण:
- दिल्ली उच्च न्यायालयातील तत्कालीन न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने महाभियोग प्रस्ताव लोकसभा व राज्यसभेत सादर.
- सह्या:
- लोकसभेतील १४५ व राज्यसभेतील ६३ खासदारांनी सह्या
- राहुल गांधी, रविशंकर प्रसाद यांचा सहभाग
- महाभियोग म्हणजे काय?
- Judges Enquiry Act, 1968 अंतर्गत न्यायमूर्तींना पदावरून हटविण्याची प्रक्रिया.
- प्रक्रिया कशी असते?
- अध्यक्ष/सभापतींची छाननी
- 3 सदस्यीय चौकशी समिती नेमली जाते
- चौकशी + न्यायमूर्तीला स्पष्टीकरणाची संधी
- अहवाल दोषी ठरवल्यास, संसदेत 2/3 बहुमताने मंजुरी
- अंतिम आदेश – राष्ट्रपती
- इतिहासात महाभियोग:
- 1991 – न्या. व्ही. रामास्वामी (अर्धवट कारवाई)
- आजवर कोणत्याही न्यायमूर्तीला राष्ट्रपतींनी हटवलेले नाही
- जर वर्मा यांच्याविरुद्धची प्रक्रिया पूर्ण झाली, तर ते भारताचे पहिले न्यायमूर्ती ठरतील जे महाभियोगातून पदावरून हटवले जातील.

5) मोदींचा विक्रम – इंदिरा गांधींचा विक्रम मोडला!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४०७८ दिवसांचे पंतप्रधानपद पूर्ण करत इंदिरा गांधींचा विक्रम मोडला.
- आता ते पं. नेहरूंनंतर सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहणारे दुसरे नेते ठरले आहेत.
- सलग कार्यकाळानुसार शीर्ष 3 पंतप्रधान:
- पं. नेहरू – ६१३० दिवस
- नरेंद्र मोदी – ४०७८ दिवस
- इंदिरा गांधी – ४०७७ दिवस
- मोदींच्या नावावर महत्त्वाचे विक्रम:
- स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान
- बिगर काँग्रेस, हिंदी भाषक राज्यातून सर्वाधिक काळ सत्तेवर
- दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्तेत आलेले पहिले बिगर काँग्रेसी नेते
- सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकलेले नेते (२०१४, २०१९, २०२४)
- इंदिरा गांधींनंतर पूर्ण बहुमताने पुन्हा निवडून आलेले एकमेव पंतप्रधान
- सलग ६ निवडणुका जिंकलेले सार्वकालीन एकमेव नेते:
- गुजरात विधानसभा: २००२, २००७, २०१२
- लोकसभा: २०१४, २०१९, २०२४

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel