Current Affairs | चालू घडामोडी | 03 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 03 JULY 2024

1) महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम, 2016 राष्ट्रपतींची मंजुरी = 3 जुलै 2017

  • महाराष्ट्र पहिले राज्य ठरले

2) पहिला भारतीय अभिनेता

  • शाहरुख खानला ‘लोकार्नो फिल्म फेस्टिवल’मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • त्यांना ‘पार्डो अला करिअर असकोना-लोकार्नो टुरिझम’ या नावाचा पुरस्कार मिळणार आहे.
  • हा पुरस्कार मिळवणारा शाहरुख खान पहिला भारतीय अभिनेता असणार आहे.

3) प्रेमाताई पुरव कालवश

  • हजारो महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आत्मनिर्भर बनविण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ व ‘अन्नपूर्णा परिवारा’च्या संस्थापक आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी प्रेमाताई पुरव (८८) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले.
  • केंद्र सरकारने २००२ मध्ये ‘पद्माश्री’ किताबाने प्रेमाताई यांच्या कार्याचा गौरव केला होता.

4) मोसमी पाऊस संपूर्ण देशात

  • मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
  • आसामच्या मोरीगाव जिल्ह्याचा मोठा भाग ब्रह्मनदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडाला आहे
  • नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये प्रगती केली आहे.

5) राष्ट्रीय कालिदास सन्मान उदय भवाळकर यांना जाहीर

  • धृपद संगीतातील योगदानाबद्दल पं. उदय भवाळकर यांना मध्य प्रदेश सरकारचा मानाचा राष्ट्रीय कालिदास सन्मान जाहीर झाला आहे.
  • भवाळकर हे उस्ताद झिया मोहिउद्दीन डागर आणि झिया फरिदुद्दीन डागर यांचे शिष्य असून, देशातील आणि परदेशातील अनेक रसिकांपर्यंत त्यांनी आपले धृपद संगीत महोत्सव आणि मैफलींमधून पोहोचविले आहे
  • पं. उदय भवाळकर यांना २०२२ या वर्षासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment