Current Affairs | चालू घडामोडी | 05 AUG 2024
अनुक्रमणिका
1) 5 ऑगस्ट दिनविशेष
1.1) 5 ऑगस्ट 1991 = लीला सेट यांची हिमाचल प्रदेश हायकोर्टात
मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती
- हायकोर्टातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
1.2) 5 ऑगस्ट 2019 = कलम 370 रद्द
- राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम काढण्यात आले
2) नेल्सन मंडेला लेगेसी साइट्स युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून घोषित.
- संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने नेल्सन मंडेला यांच्याशी संबंधित अनेक प्रतिष्ठित दक्षिण आफ्रिकन स्थळे जागतिक वारसा स्थळे म्हणून नोंदवली आहेत.
- नवी दिल्लीतील युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४६व्या सत्रादरम्यान जाहीर करण्यात आलेली ही मान्यता, दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदापासून लोकशाहीपर्यंतच्या प्रवासाच्या स्मृती जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.
3) पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाकडून खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण होण्याची भीती व्यक्त करीत त्याऐवजी आधीच अस्तित्वात असलेल्या शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांचेच बळकटीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे.
- केंद्र सरकारच्या पशुवैद्यक धोरणानुसार पाच हजार पशुधनामागे एक नोंदणीकृत पशुवैद्यक असावा, असा निकष आहे.
- महाराष्ट्रात ३ कोटी ३० लाख इतक्या संख्येत पशुधन आहे. त्यानुसार सहा हजार ६०० पशुवैद्यक हवे आहेत.
- मात्र राज्यातील नोंदणीकृत पशुवैद्यकांची संख्या त्यापेक्षा दुप्पट ११ हजार १६० इतकी आहे.
- सध्या पशुसंवर्धन विभागात केवळ अडीच हजार शासकीय पशुवैद्यक आहेत.
4) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 मध्ये भारत 39 व्या क्रमांकावर आहे
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने अलीकडेच 2024 चा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक (TTDI) जारी केला आहे, ज्याने जागतिक पर्यटन लँडस्केपमध्ये भारताच्या स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यमापन केले आहे.
- जगभरातील पर्यटन क्षेत्रातील स्पर्धात्मकता आणि टिकावूपणाचे मूल्यांकन करण्यासाठी हा निर्देशांक महत्त्वाचा बेंचमार्क आहे.
- 2024 TTDI मध्ये भारताने 119 देशांमध्ये 39 वे स्थान मिळवले आहे.
5) नोवाक जोकोविचने जिंकले पॅरिस 2024 पुरुष टेनिस मधील सुवर्णपदक
- याचसोबत त्याने करिअर गोल्डन स्लॅमदेखील पूर्ण केले
- करिअर गोल्डन स्लॅम (चारही ग्रँडस्लॅम विजेतेपदे + ऑलिंपिक सुवर्ण) पूर्ण करणारे खेळाडू 👇
- स्टेफी ग्राफ
- आंद्रे अगासी
- सेरेना विल्यम्स
- राफेल नदाल
- नोव्हाक जोकोविच
6) बांगलादेशात सत्तापालट
- बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी देश सोडल्याचं आणि राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
- 2009 पासून शेख हसीना पंतप्रधान पदावर होत्या.
- गेले अनेक दिवस बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांनी राजीनामा दिला आहे.
- त्या भारतात आगरतळामध्ये हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत.
- या हिंसाचारात किमान 90 जणांचे प्राण गेले आहेत असं सांगण्यात येत आहे.
काही आंदोलक पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर चालून गेल्याचं सांगण्यात येत आहे. - आम्ही देशातल्या सर्व पक्षांना इथं चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. सर्वांशी चर्चा केल्यानंतर आम्ही अंतरिम सरकार स्थापन करत आहोत, असं बांगलादेशचे लष्कर प्रमुख जनरल वकार यांनी म्हटलंय.
- आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या जातील. आंदोलकांनी हिंसक आंदोलन करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
- भारताच्या सीमा सुरक्षा दलाने बांगलादेशशी असलेल्या 4,096 किमी सीमेवर अलर्ट जाहीर केला आहे.
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 14 जुलैला एका पत्रकार परिषदेत केलेल्या एका विधानानं आंदोलक आणखी नाराज झाले आहेत.
- शेख हसीना यांनी म्हटलं होतं, “आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्यसैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही, मग तो तो रझाकारांच्या नातवंडांना द्यायचा का?”
- बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रझाकार म्हणून ओळखले जायचे.
- एकप्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो.
- शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रझाकारांचे वंशज ही उपमान वापरल्याचं सांगत आंदोलक आणखी आक्रमक झाले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel