Current Affairs | चालू घडामोडी | 05 AUG 2025
1) ५ ऑगस्ट दिनविशेष
१.१) 1991 = लीला सेट यांची हिमाचल प्रदेश हायकोर्टात
मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती
- हायकोर्टातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
१.२) २०१९ = कलम ३७० रद्द
- राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम काढण्यात आले
१.३) १८९०: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा जन्म
१.४) २०२० = रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी केली. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्यास परवानगी दिली होती.
१.५) १७७५: कलकत्ता येथे महाराजा नंदकुमार यांना फसवणुकीच्या खोट्या आरोपाखाली फाशी देण्यात आली, ही घटना ब्रिटिश राजवटीतील “पहिली न्यायालयीन हत्या” मानली. (गवर्नर जनरल = वॉरेन हेस्टिंग)
2) ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केलेल्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पुढील मानांकन ठरले:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : ट्वेल्थ फेल – दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान) व विक्रांत मेस्सी (ट्वेल्थ फेल)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सुदिप्तो सेन (द केरला स्टोरी)
इतर उल्लेखनीय पुरस्कार:
- सहाय्यक अभिनेत्री : उर्वशी (उल्लोझुक्कू, मल्याळम), जानकी बोडीवाला (वश, गुजराती)
- सहाय्यक अभिनेता : विजय राघवन (पुक्कलम), एम.एस. भास्कर (पार्किंग)
- मेकअप : श्रीकांत देसाई (सॅम बहादूर)
- कॉस्च्युम डिझाइन : सचिन लोवलेकर व टीम (सॅम बहादूर)
- बालचित्रपट : नाळ २ – दिग्दर्शक: सुधाकर रेड्डी यक्कांती
- बालकलाकार : सुकृती बंदरेड्डी, कबीर खंदारे, त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक : आशिष बेंडे (आत्मपॅम्प्लेट, मराठी)
71 वे इतर चित्रपट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमन
- सर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडू
- सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा- श्यामची आई
- सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- कथल
- सर्वोत्कृष्ट ॲक्शन सिनेमा- हनूमान
- सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट (रॉकी और रानी की प्रेम कहाणी)
- सर्वोत्कृष्ट म्यूझिक दिग्दर्शक- हर्षवर्धन रामेश्वर ॲनिमल सिनेमा)
- सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइन- ॲनिमल
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर- प्रसन्नता मोहपात्रा (द केरला स्टोरी)
- सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फिमेल- शिल्पा राव
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’)
- सर्वोत्कृष्ट डेब्यू फिल्म दिग्दर्शक- आशीष भेंडे (आत्मपॅम्फलेट)

3) ज्ञान भारतम मिशन – प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलीकरण
- सुरुवात : 28 जुलै 2025 रोजी पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ (भाग 124) मध्ये मिशनची घोषणा
- उद्दिष्ट :
- प्राचीन भारतीय हस्तलिखितांचे डिजिटलीकरण
- जतन, संवर्धन व जागतिक पातळीवर उपलब्धता
- राष्ट्रीय हस्तलिखित मिशनसाठी ₹60 कोटींचे बजेट
- भारताचा ठेवा :
- सुमारे 5 दशलक्ष हस्तलिखिते – जगातील सर्वात मोठा संग्रह
- विषय : धर्म, साहित्य, विज्ञान, कला इ.
- हस्तलिखित म्हणजे काय?
- कागद, ताडपत्री, धातू, कापड आदींवर लिहिलेले 75 वर्षांहून जुने दस्तऐवज, ज्यांचे वैज्ञानिक, ऐतिहासिक व सौंदर्यात्मक मूल्य असते.
- छापील व लिथोग्राफ दस्तऐवज हस्तलिखित मानले जात नाहीत.

4) दत्तात्रय विठोबा भरणे – महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री
- राज्य मंत्रिमंडळातील श्री. दत्तात्रय भरणे व श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडील खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.
- या बदलानुसार कृषी खाते श्री. दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले असून क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ हे खाते श्री. माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel