Current Affairs | चालू घडामोडी | 05 July 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 05 July 2025

1) 5 जुलै दिनविशेष

1.1) 2004 = FRBM कायदा 2003 अंमल

  • उद्देश = राजकीय (Fiscal) व महसूल (Revenue) तूट कमी करणे
  • FRBM = Fiscal Responsibility and Budget Management Act, 2003.
  • उद्देश:आर्थिक शिस्त राखणे, वित्तीय तूट (Fiscal Deficit) कमी करणे, पारदर्शक आणि उत्तरदायी आर्थिक व्यवस्थापन, FRBM कायदा सरकारच्या खर्चावर बंधन घालतो आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करतो.

1.2) 5 जुलै 1996 –

  • जगातील पहिले क्लोन प्राणी – ‘डॉली’ मेंढीचा जन्म
  • स्कॉटलंडमध्ये जन्मलेली डॉली ही क्लोनिंग तंत्रज्ञानातील क्रांतीकारक प्रगती होती

1.3) 5 जुलै 1894 – लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म

  • भारताचे दुसरे पंतप्रधान
  • “जय जवान जय किसान” या घोषणेने प्रसिद्ध
  • 1965 च्या भारत-पाक युद्धात नेतेपद
  • मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार

2) UNSC अध्यक्षपद – जुलै 2025

  • पाकिस्तानकडे अध्यक्षपद
    • 1 जुलै 2025 पासून पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.
    • राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांच्याकडे संपूर्ण महिन्याचे नेतृत्व.
    • पाकिस्तान सध्या UNSC चा अस्थायी सदस्य (2025-2026) आहे.
    • हे पाकिस्तानचे 2013 नंतरचे पहिले अध्यक्षपद असून, 8व्या वेळेस परिषदेत सहभाग.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC)
  • स्थापना – 24 ऑक्टोबर 1945
  • मुख्यालय – न्यू यॉर्क, अमेरिका
  • उद्देश – आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे
  • सदस्यसंख्या – 15
    • 5 स्थायी सदस्य – चीन, फ्रान्स, रशिया, UK, USA
    • 10 अस्थायी सदस्य – 2 वर्षांसाठी महासभेद्वारे निवडले जातात
    • सध्याचे अस्थायी सदस्य – अल्जेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, कोरिया (द.), सिएरा लिओन, स्लोव्हेनिया, सोमालिया
  • अध्यक्षपद प्रत्येक महिन्याला बदलते
    • जुलै 2025 अध्यक्ष – पाकिस्तान
    • भारत सध्या सदस्य नाही, शेवटचा कालावधी: 2021-22

3) SBI ला 70 वर्षे पूर्ण – एक ऐतिहासिक वाटचाल

  • स्थापना : 1 जुलै 1955
    • भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक
    • मालमत्तेच्या बाबतीत 23% बाजार हिस्सा
    • कर्ज व ठेवीत 25% बाजार हिस्सा
    • मुख्यालय : मुंबई
    • जगातील 47 वी सर्वात मोठी बँक (मालमत्तेनुसार)
    • Fortune Global 500 यादीत 178 वा क्रमांक (2024) – एकमेव भारतीय बँक
    • 1806 साली सुरू झालेली पहिली भारतीय व्यावसायिक बँक
  • SBI ची ऐतिहासिक वाटचाल – महत्त्वाच्या तारखा
    • 1806 – बँक ऑफ कलकत्ता ची स्थापना
    • 1840 – बँक ऑफ बॉम्बे
    • 1843 – बँक ऑफ मद्रास
    • 1921 – तीनही बँकांचे विलिनीकरण → इम्पीरियल बँक ऑफ इंडिया
    • 1935 – RBI ची स्थापना (इम्पीरियल बँकेकडून केंद्रीय बँकिंग कार्ये थांबवले)
    • 1955 (30 एप्रिल) – इम्पीरियल बँकेचे नाव बदलून SBI
    • 1955 (1 जुलै) – SBI ची अधिकृत स्थापना
    • 1959 – सहाय्यक बँका कायदा व विलिनीकरण सुरू
    • 2017 – सर्व सहाय्यक बँकांचे SBI मध्ये अंतिम विलीनीकरण

4) मेनो-माइंड कार्यक्रम

  • राष्ट्रीय महिला आयोग (NCW) व Rising India Research Foundation यांचा संयुक्त उपक्रम
  • रजोनिवृत्ती (Menopause) आणि महिलांचे मानसिक आरोग्य यावर देशव्यापी जागरूकता मोहीम
  • प्रमुख वैशिष्ट्ये:
    • रजोनिवृत्ती आणि मानसिक आरोग्य:
    • महिलांच्या रजोनिवृत्तीनंतर होणाऱ्या मानसिक व शारीरिक बदलांवर लक्ष केंद्रित
  • मौनभंग:
    • महिलांना त्यांच्या अनुभवांबाबत बोलण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ
  • राष्ट्रीय अभियान:
    • संपूर्ण भारतभर राबवला जाणारा देशव्यापी उपक्रम
  • प्रशिक्षण व क्षमता विकास:
    • महिलांना रजोनिवृत्ती व मानसिक आरोग्यविषयक ज्ञान व कौशल्य दिले जाते
  • समर्थन सेवा:
    • वैद्यकीय व कायदेशीर समुपदेशन यांसह आवश्यक सेवा एका छताखाली
  • उद्दिष्ट:
    • महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक पाठबळ देणे

5) 5 जुलै – आंतरराष्ट्रीय सहकार दिवस

  • आंतरराष्ट्रीय सहकारी दिन २०२५
    • सहकारी संस्था शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करतात आणि समृद्धीला प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवतात.
  • महत्वाचे ठळक मुद्दे:
  • थीम: “Cooperatives Build a Better World” (सहकार संस्था चांगला जग निर्माण करतात)
  • जगभरात ३ दशलक्ष (३० लाख) सहकारी संस्था कार्यरत
  • देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी विद्यापीठाचे उद्घाटन — त्रिभुवन सहकारी विद्यापीठ, ५ जुलै २०२५ रोजी
  • भारत सरकारने प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) साठी नमुनाभूत उपनियम जारी केले
  • ६७,९३० PACS संस्थांच्या संगणकीकरणास मंजुरी
  • १८,१८३ नवीन बहुउद्देशीय PACS, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था नोंदणीकृत
  • व्हाईट रेव्होल्यूशन २.० (दुग्ध क्रांती २.०) अंतर्गत पुढील ५ वर्षांत दूध संकलन ५०% ने वाढविण्याचे लक्ष्य

6) QUAD बैठक 2025

  • 1 जुलै 2025
  • वॉशिंग्टन D.C., USA
  • बैठकीतील प्रमुख मुद्दे
  • Critical Minerals Initiative
    • दुर्मिळ खनिजांचा सुरक्षित पुरवठा साखळी निर्माण करण्याचा निर्णय
  • Maritime Security
    • इंडो-पॅसिफिकमध्ये बेकायदेशीर हालचालींवर नजर ठेवण्यासाठी “Quad Maritime Domain Awareness” कार्यक्रम बळकट
    • “Quad-at-Sea Observer Mission” ची घोषणा
  • Emerging Technologies सहकार्य
    • AI, डिजिटल पायाभूत सुविधा, सबमरीन केबल्सवर संयुक्त गुंतवणूक
    • “Ports of the Future” उपक्रमाचा आरंभ
  • आंतरराष्ट्रीय शांतता व कायद्याचा पुरस्कार
    • दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या आक्रमक हालचालींवर टीका
    • “UNCLOS” आणि 2016 न्यायाधिकरण निर्णयाचे समर्थन
  • भारताचा मुद्दा:
    • पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध
    • हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाईसाठी QUAD देश भारताच्या पाठीशी
  • QUAD बद्दल थोडक्यात
    • पूर्ण नाव: Quadrilateral Security Dialogue
    • स्थापना: 2007 (पुन्हा सक्रिय: 2017)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment