Current Affairs | चालू घडामोडी | 06 AUG 2025
1) ६ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९४५ = जपानवर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अणुबॉम्ब हल्ला
- ६ ऑगस्ट= हिरोशिमा
- ९ ऑगस्ट= नागासाकी
- इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला
१.२) १९५२ = राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना
- उद्देश = पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याचा आकार देण्यासाठी
१.३) १९२५: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन
१.४) २०१९: २५ व्या वर्षीच हरयाणाच्या कॅबिनेट मंत्री, १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, २०००-२००३ माहिती आणि प्रसारण मंत्री, २००३-२००४ आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री, २०१४ मध्ये भाजप सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं अश्या भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन
2) ७ ऑगस्ट : शाश्वत शेती दिन
(महाराष्ट्र शासनाचा नवा उपक्रम)
- हरितक्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा जन्मदिन – ७ ऑगस्ट – राज्य शासन ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करणार!
- १०० वी जयंती (२०२५) निमित्त, शेतीतील त्यांच्या योगदानाला मानवंदना
- राज्य, जिल्हा, तालुका आणि विद्यापीठ स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार
- डॉ. स्वामिनाथन यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
- प्रत्येक कृषी विद्यापीठात “डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर” –
- शाश्वत शेती
- हवामान अनुकूलन तंत्रज्ञान
- अन्न सुरक्षा
- यावर संशोधन केंद्र स्थापन होणार
- महत्वाचे हरित जनक
- महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक = वसंतराव नाईक
- हरित कांतीचे जनक = डॉ. नॉर्मल बोरलॉग
- भारतीय हरितक्रांतीचे जनक = डॉ. एम. एस. स्वामीनाथन

3) डॉ. एम. एस. स्वामीनाथन – हरित क्रांतीचे जनक
- पूर्ण नाव – मानकोम्बू संबासिवन स्वामीनाथन
- जन्म – 7 ऑगस्ट 1925, कुंभकोणम (मद्रास)
- निधन – 28 सप्टेंबर 2023, चेन्नई (तामिळनाडू)
- गहू व तांदळाच्या उच्च-उत्पादनशक्ती असलेल्या जाती भारतात आणणारे अग्रणी वैज्ञानिक
- UNEP ने त्यांना “आर्थिक पर्यावरणशास्त्राचे जनक” असे गौरवले
- महत्त्वाचे कार्यकाल
- 1954-72 – भारतीय कृषी संशोधन संस्थेत शिक्षक, संशोधक
- 1972-79 – I.C.A.R. चे महासंचालक
- 1979-80 – कृषी व सिंचन मंत्रालयात प्रधान सचिव
- 1982-88 – आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे पहिले आशियाई प्रमुख
- 2004-06 – राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष
- 2007-13 – राज्यसभा सदस्य
- प्रमुख पुरस्कार व सन्मान
- 1967 – पद्मश्री
- 1971 – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- 1972 – पद्मभूषण
- 1987 – जागतिक अन्न पुरस्कार (पहिले विजेते)
- 1989 – पद्मविभूषण
- 2024 – भारतरत्न
- त्यांचे योगदान भारतीय शेतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.

4) राज्यातील शाळांमध्ये १४ ऑगस्टला ‘पसायदान’
- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त आयोजन
- यंदा १५ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांच्या कवायती करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
- समर्पक पेहराव करून, देशभक्तीपर पार्श्वसंगीताचा वापर करून प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कवायतींचे सादरीकरण करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

5) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे दिल्लीमध्ये निधन (५ ऑगस्ट २०२५)
- राजकीय प्रवास
- उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यात १९४६ मध्ये जन्मलेले मलिक हे मेरठ कॉलेजमधून विज्ञान पदवी आणि एलएलबीचे शिक्षण घेतलेले.
- १९६८ मध्ये विद्यार्थीदशेतून राजकारणात प्रवेश; चौधरी चरणसिंह यांच्या पक्षातून आमदार आणि नंतर लोकदल, काँग्रेस, जनता दल आणि शेवटी भाजप असा प्रवास केला.
- राज्यपालपद व ऐतिहासिक भूमिका
- बिहार (२०१७), जम्मू-काश्मीर (२०१८), व मेघालयचे राज्यपाल
- जम्मू-काश्मीरचे शेवटचे राज्यपाल, ज्या काळात कलम ३७० रद्द होऊन राज्याचे विभाजन झाले
- बिघडलेली कायदा-सुव्यवस्था हाताळण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
- वादग्रस्त भूमिका
- पुलवामा हल्ला व किरू हायड्रोपॉवर प्रकल्प वरील आरोपांमुळे चर्चेत
- अखेरच्या टप्प्यात केंद्र सरकारचे टीकाकार
- जाट समाजाचे प्रभावी नेतृत्व, अनेक दशकांचा अनुभव आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळख

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel