Current Affairs | चालू घडामोडी | 07 AUG 2025
1) ७ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९०५ = स्वदेशी चळवळीची सुरुवात
- कलकत्ता टाऊन हॉलमध्ये परकीय मालावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
- बंगालच्या फाळणीची घोषणा = ७ जुलै १९०५ (लॉर्ड कर्जन)
- फाळणी रद्द घोषणा = १९११ (लॉर्ड हार्डिंग)
१.२) महाराष्ट्र शाश्वत शेती दिवस
१.३) १९२५ = हरितक्रांतीचे शिल्पकार भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचा १०० वा जन्मदिन
१.४) १९४१: रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी
जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते
2) १४ वा बोल्ड कुरुक्षेत्र २०२५ – भारत-सिंगापूर संयुक्त लष्करी सराव 🇸🇬
- स्थान: जोधपूर, राजस्थान
- कालावधी: २७ जुलै – ४ ऑगस्ट २०२५
- सुरुवात: २००५ पासून
- प्रकार:
- टेबल टॉप एक्सरसाइज
- कॉम्प्युटर-आधारित वॉरगेम (प्रत्यक्ष युद्धसराव नाही)
- उद्दिष्ट: संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाखाली परस्पर समन्वय व संवाद वाढवणे
- १२ वा आणि १३ वा सरावही जोधपूरमध्येच पार पडला होता
- भारत-सिंगापूर अन्य युद्ध सराव:
- SIMBEX: नौदल सराव
- Agni Warrior: लष्करी सराव

3) आशियान (ASEAN) – आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ
- स्थापना – ८ ऑगस्ट १९६७, बँकॉक घोषणा
- सदस्य देश – १० (इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया)
- मुख्यालय – जकार्ता, इंडोनेशिया
- उद्दिष्ट – प्रादेशिक शांतता, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि स्थिरता वाढवणे
- महत्त्व – जगातील एक मोठा आर्थिक गट, भारतासोबत ASEAN-India Summit द्वारे घनिष्ठ सहकार्य
- 2025 थीम – “ASEAN: Epicentrum of Growth” – विकासाचे केंद्रस्थान

4) माधुरीची घरवापसी होणार
- वनतारा प्राणी संवर्धन केंद्रामध्ये उपचार घेत असलेली महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतणार आहे.
- तिच्या घरवापसीसाठी नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा संस्था न्यायालयात एकत्रित पुनर्विचार याचिका दाखल करेल.
- नांदणी मठात महादेवीसाठी सर्व प्रकारच्या सुविधा ‘वनतारा’ उपलब्ध करून देणार आहे.
- माधुरी हत्ती प्रकरण 🐘
- ठिकाण – नांदणी , शिरोळ तालुका , जिल्हा – कोल्हापूर
- नाव – ‘माधुरी’ किंवा ‘महादेवी ‘🐘
- मागील 33-36 वर्षांपासून नांदणी येथील जैन मठात होती
- हत्तीचा उपयोग धार्मिक मिरवणुका, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांसाठी होत होता
- PETA (People for the Ethical Treatment of Animals ने दावा केला की माधुरी हत्तीण साखळदंडांनी बांधून ठेवली जात होती त्यामुळे तिला त्रास होतो आहे
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 28 जुलै 2025 रोजी माधुरी हत्तीणला गुजरातमधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले होते

5) भारतावर सर्वाधिक आयातशुल्क
- अतिरिक्त २५ टक्के कराच्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
- २१ दिवसांनी कर ५० टक्क्यांवर
- रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादले.
- आधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्यास १४ तास बाकी असताना, ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढला असला, तरी या अतिरिक्त कराची अंमलबजावणी आदेश निघाल्यापासून २१ दिवसांनी केली जाईल
- ट्रम्प यांच्या आदेशानुसार भारतीय मालावर ५० टक्के शुल्क लादले गेले, तर ते जगात सर्वाधिक असेल.
- अमेरिकेने सध्या केवळ ब्राझीलवर ५० टक्के आयातकर लावला आहे.
- ‘ब्रिक्स’मधील अन्य देश चीन आणि दक्षिण आफ्रिकेवरदेखील ३० टक्के शुल्क असले, तरी भारतावरील कर त्यापेक्षा कितीतरी जास्त होईल.
- विशेष म्हणजे निर्यातीमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आशियातील बांगलादेश, व्हिएतनाम यांच्या तुलनेत भारताला मोठी झळ सोसावी लागेल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel