Current Affairs | चालू घडामोडी | 08 AUG 2025
1) ८ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९६७ = आसियानची स्थापना
- बँकॉक घोषणापत्राने स्थापना
- एकूण देश = १०
- मुख्यालय = जकार्ता
१.२) १५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले
१.३) १९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले
१.४) १९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला
१.५) १९०८: राईट ब्रदर्सचे हे पहिले सार्वजनिक उड्डाण – विल्बर राइट यांनी फ्रान्समधील ले मॅन्स येथील रेसकोर्सवर पहिले उड्डाण केले
2) आशियान (ASEAN) – आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ
- स्थापना – ८ ऑगस्ट १९६७, बँकॉक घोषणा
- सदस्य देश – १० (इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया)
- मुख्यालय – जकार्ता, इंडोनेशिया
- उद्दिष्ट – प्रादेशिक शांतता, आर्थिक सहकार्य, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि स्थिरता वाढवणे
- महत्त्व – जगातील एक मोठा आर्थिक गट, भारतासोबत ASEAN-India Summit द्वारे घनिष्ठ सहकार्य
- 2025 थीम – “ASEAN: Epicentrum of Growth” – विकासाचे केंद्रस्थान

3) DRDO ने प्रगत मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपित प्रेसिजन गाईडेड मिसाइल-V3 च्या यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या आहेत
- नाव – Unmanned Aerial Vehicle Launched Precision Guided Missile (ULPGM)-V3
- ठिकाण: नॅशनल ओपन एरिया रेंज (NOAR), कर्नूल, आंध्र प्रदेश.
- DRDO ने विकसीत केले आहे
- पूर्वी विकसित आणि वितरित केलेल्या ULPGM-V2 क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे.
- वैशिष्ट्ये –
- ULPGM-V3 मध्ये हाय डेफिनेशन ड्युअल-चॅनेल सीकर आहे जो विविध प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करू शकतो
- दिवसा आणि रात्री , उंच आणि सखल भागात काम करू शकते
- पेनिट्रेशन-कम-ब्लास्ट वॉरहेड
- विशेषतः अँटी-आर्मर आणि अँटी-बंकर
- DRDO अध्यक्ष = डॉ. समीर व्ही. कामत

4) AI इम्पॅक्ट समिटचे 2026 चे आयोजन भारत करणार आहे.
- AI Impact Summit 2026
- दिनांक – 19 ते 20 फेब्रुवारी 2026
- ठिकाण – नवी दिल्ली
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली
- ही समिट समाजातील सर्व घटकांना सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असणार आहे.
- आरोग्यसेवा, शिक्षण, शेती, हवामान बदल आणि प्रशासन यासारख्या क्षेत्रातील वास्तविक जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी एआयचा वापर करण्यावर या कार्यक्रमाचे लक्ष केंद्रित असेल.

5) इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांना 2025 चा जीपी बिर्ला मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- भारताच्या अंतराळ कार्यक्रमात आणि अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या नेतृत्वासाठी
- 25 जुलै 2025 रोजी श्रीमती निर्मला बिर्ला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
पुरस्कार बद्दल माहिती - स्थळ: हैदराबाद, तेलंगणा.
- पुरस्कार – विज्ञान, शिक्षण, खगोलशास्त्र आणि सार्वजनिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी
- यापूर्वी 32 नोबेल पुरस्कार विजेत्यांना हा सन्मान देण्यात आला आहे
- यापूर्वी हा पुरस्कार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. कस्तुरीरंगन आणि डॉ. वेंकटरामन रामकृष्णन सारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या मिळाला आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel