Current Affairs | चालू घडामोडी | 08 JULY 2025
1) 8 जुलै दिनविशेष
1.1) 1918 = मॉन्टेग्यु चेम्सफोर्ड अहवाल प्रकाशित
- तरतूद – द्विगृही कायदेमंडळ (केंद्रात), लोकसेवा आयोग स्थापना, प्रांतात द्विदल राज्यपद्धती (Dyarchy)
1.2) 1859 – चार्ल्स डार्विनने “On the Origin of Species” पुस्तक प्रकाशित केले
- “Survival of the fittest” हे त्याचे प्रसिद्ध सूत्र.
1.3) 1964 = IDBI Bank स्थापना
- सुरुवातीला RBI अंतर्गत होती, नंतर केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आली.
- MSME आणि उद्योग क्षेत्रासाठी कर्जपुरवठा करणारी प्रमुख बँक.
2) भारतातील पहिला ट्रान्सजेंडर दवाखाना हैदराबाद येथे पुन्हा सुरू
- या दवाखान्याचे नाव ‘मित्र क्लिनिक’ होते. परंतु आता त्याला ‘साबरंग’ (SABRANG) क्लिनिक म्हणून ओळखले जाईल.
- हे ट्रान्सजेंडर समुदायासाठी समर्पित असून आणि तेथील कर्मचारी देखील ट्रान्सजेंडर समुदायातील आहेत
- हे क्लिनिक 2021 मध्ये हैदराबादमधील नारायणगुडा येथे सुरू झाले आणि ते भारतातील पहिले ट्रान्सजेंडर समुदायाद्वारे चालवले जाणारे आरोग्य केंद्र आहे
- टाटा ट्रस्टच्या मदतीने हा दवाखाना पुन्हा एकदा हैदराबादमध्ये सुरू झालेला आहे

3) भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना नुकताच त्रिनिदाद & टोबॅगो ya देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार जाहीर झाला आहे
- आतापर्यंत जगातील 25 देशांनी आपल्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे

4) सायमा वाजेद यांना WHO चा “Mental Health Award 2025”
- स्थळ – बँकॉक, थायलंड
- कोणासाठी?
- मानसिक आरोग्य व ऑटिझम क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
- धोरण निर्मितीपासून ते जागरूकता व डिजिटल उपाययोजना राबवण्यात अग्रणी भूमिका
- सायमा वाजेद कोण?
- WHO दक्षिण–पूर्व आशिया क्षेत्रीय संचालिका
- मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव
- बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची कन्या
- पुरस्काराचे महत्त्व
- WHO तर्फे जागतिक मानसिक आरोग्याच्या भविष्य घडविणाऱ्या नेतृत्त्वाची पावती
- दक्षिण आशिया क्षेत्रात मानसिक आरोग्य धोरणासाठी आदर्श नेतृत्व
- WHO तर्फे जागतिक मानसिक आरोग्याच्या भविष्य घडविणाऱ्या नेतृत्त्वाची पावती
- स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा:
- सायमा वाजेद – WHO Regional Director (SE Asia)
- Mental Health Award – 2025
- कारण – मानसिक आरोग्य व ऑटिझमसाठी कार्य

5) गिनी निर्देशांक 2024 : उत्पन्न समानतेत भारत चौथ्या क्रमांकावर!
- गिनी निर्देशांक (Gini Index) म्हणजे उत्पन्नातील असमानतेचे मोजमाप
- 0 = पूर्ण समानता | 100 = पूर्ण असमानता
- भारताचा निर्देशांक: 25.5 (मध्यम-कमी असमानता गट)
- स्थान: जगात चौथे
- सर्वोच्च समानतेचे देश (गुणसंख्या):
- स्लोवाक रिपब्लिक – 24.1
- स्लोव्हेनिया – 24.3
- बेलारूस – 24.4
- भारत – 25.5
- भारताचा निर्देशांक चीन (35.7) व अमेरिका (41.8) पेक्षा चांगला
- G7 व G20 देशांपेक्षाही भारत अधिक समान
- भारताची वाटचाल:
- 2011 मध्ये निर्देशांक: 28.8
- 2024 मध्ये निर्देशांक: 25.5
- महत्त्वाच्या सरकारी योजना
- जनधन योजना – 55.69 कोटी बँक खाती
- आधार कार्ड – 142 कोटी डिजिटल ओळखपत्रे
- DBT – 3.48 लाख कोटी रुपयांची बचत
- आयुष्मान भारत – 41.3 कोटी कार्ड, प्रति कुटुंब ₹5 लाख विमा
- Stand-up India – 2.75 लाख महिला/SC-ST उद्योजकांना ₹62,800 कोटी कर्ज
- PMGKAY – 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य
- PM विश्वकर्मा योजना – 30 लाख पारंपरिक कारागिरांची नोंदणी

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel