Current Affairs | चालू घडामोडी | 09 JULY 2025
1) 9 जुलै दिनविशेष
1.1) 2015 = राष्ट्रीय अविष्कार अभियान
- सुरुवात (२०१५)
- शुभहस्ते = डॉ. अब्दुल कलाम,
- उद्देश = ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान व गणिताबद्दल चौकस बुद्धी निर्माण करणे.
1.2) 1988 = नॅशनल हौसिंग बँक स्थापना
1.3) 1875 – बॉम्बे स्टॉक्स अँड शेअर्स असोसिएशनची स्थापना झाली (आजचे BSE – Bombay Stock Exchange)
2) सरकारी पदोन्नतीसाठी नवी अट – डिजिटल कोर्स अनिवार्य!
- आता केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी iGOT कर्मयोगी पोर्टलवरील डिजिटल कोर्स उत्तीर्ण करणे बंधनकारक!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला दरवर्षी किमान ६ अभ्यासक्रमांतून ५०% कोर्स पूर्ण करणे गरजेचे.
- APAR (Annual Performance Report) मध्ये याचा थेट समावेश होणार; SPARROW पोर्टलवर हे डेटा जोडले जातील.
- सेवा कालावधीप्रमाणे (9, 16, 25+ वर्षे) कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम निश्चित केले जातील.
- हे बदल म्हणजेच ‘मिशन कर्मयोगी’चा पुढील टप्पा, जो कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवण्याचा उद्देश बाळगतो.
- जुलै 2025 पासून हे कोर्स सर्वांसाठी अनिवार्य झाले असून, पदोन्नतीसाठी आता केवळ सेवा नाही, तर कौशल्यही आवश्यक!

3) निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांचे निधन
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेमलेल्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष व वरिष्ठ सनदी अधिकारी मुकेश खुल्लर (वय ६५) यांचे आकस्मिक निधन.
- 1985 बॅचचे IAS अधिकारी, सेवेला सुरुवात भंडाऱ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून.
- ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना ‘सेतू सुविधा केंद्र’ ही संकल्पना त्यांनी मांडली, जी पुढे संपूर्ण राज्यात राबवली गेली.
- प्रशासकीय क्षेत्रात दूरदृष्टी आणि नवकल्पनांचा वारसा ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली

4) मिशन कर्मयोगी – सिव्हिल सेवा सुधारणा अभियान
- भारत सरकारने २०२० मध्ये सुरू केलेली ही एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय योजना आहे.
- उद्दिष्ट: शासकीय कर्मचाऱ्यांचे कौशल्यविकास (Capacity Building) करून त्यांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे.
- डिजिटल प्लॅटफॉर्म: ‘iGOT–Karmayogi’ (Integrated Government Online Training)
- हे एक ऑनलाइन शिक्षण पोर्टल आहे, जिथे शासकीय कर्मचारी विविध कोर्सेसद्वारे स्व-शिक्षण करू शकतात.
- अंतर्गत मंत्रालय: कार्मिक व प्रशिक्षण विभाग (DoPT)
- सहकार्य संस्था: Karmayogi Bharat संस्था
- महत्त्व:
- सरकारमध्ये “रोल-बेस्ड” कामकाजाचा दृष्टिकोन
- सतत शिक्षण व सुधारणा
- नव्या युगातील प्रशासनासाठी सज्जता
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel