Current Affairs | चालू घडामोडी | 10 FEB 2026
1) १० फेब्रुवारी दिनविशेष
१.१) पुणे विद्यापीठ स्थापना = १० फेब्रुवारी १९४९
- नामांतर = सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९ ऑगस्ट २०१४)
१.२) १८०३: दानशूर व शिक्षणतज्ञ जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा जन्म
१.३) १९१०: साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ दुर्गा भागवत यांचा जन्म
१.४) जागतिक कडधान्य दिवस

2) Responsible Nation Index
- काय आहे हा इंडेक्स ?
- Responsible Nation Index (RNI) हा एक वैश्विक फ्रेमवर्क आहे ज्याचा उद्देश आहे:
देश त्यांची सत्ता, संसाधने आणि धोरणे किती जिम्मेदारीने वापरतात हे मोजणे - पहिल्यांदाच भारताने स्वतःचा एक निर्देशांक तयार केलेला आहे
- केवळ GDP, सैन्यशक्ती किंवा आर्थिक प्रगतीचा विचार न करता मोरल, पर्यावरणीय आणि सामाजिक जबाबदारी वर आधारित रँकिंग देणे
- हा निर्देशांक भारतात डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, दिल्ली येथे अनावरण करण्यात आली
- World Intellectual Foundation (WIF)
- Jawaharlal Nehru University (JNU)
- IIM मुंबई
यांचं महत्त्वाचं योगदान आहे.
- RNI चे मुख्य तत्त्वे
- Ethical Governance (नैतिक शासन)
- Social Welfare (सामाजिक कल्याण)
- Environmental Responsibility (पर्यावरणीय जवाबदारी)
- Global Accountability (वैश्विक जबाबदारी)
- Citizen-Centric Policies (नागरिकाभिमुख धोरणे)
- RNI मधील रँकिंग (2026) 154 देशांच्या यादीतून
- Singapore – 1st
- Switzerland – 2nd
- Denmark – 3rd
- भारत – 16 वे स्थान

3) स्पेन देशाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी जाहीर केली
- युरोपमध्ये स्पेन हा पहिला देश आहे
- नाव- Social Media Ban for Minors Under 16 (Spain).
- घोषणा – 3 फेब्रुवारी 2026,
- पंतप्रधान पेड्रो सांचेझ
- घोषणा – दुबई येथील World Governments Summit 202
- ऑस्ट्रेलिया: 16 वर्षांखालील बंदी (डिसेंबर 2025).
- फ्रान्स 15 वर्षांखालील बंदी (विधेयक प्रक्रियेत)

4) केरळ : पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य
- केरळ राज्याने 2026-27 च्या अर्थसंकल्पात ऐतिहासिक घोषणा केली
- या घोषणेनुसार कला (Arts) व विज्ञान (Science) शाखांतील पदवी (UG) शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे
- ही सुविधा सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये लागू असेल
- यामुळे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे
- उद्दिष्टे
- आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणातून होणारी गळती थांबवणे
- सर्वसामान्य व गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची समान संधी
- शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता व मानवी विकास वाढवणे
- स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्व
- राज्य: केरळ
- घोषणा: पदवीपर्यंत मोफत शिक्षण
- अर्थसंकल्प: 2026-27
- वैशिष्ट्य: भारतातील पहिले राज्य

5) महाराष्ट्राच्या इतिहासाला आधुनिकतेची जोड!
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच 55 नव्या अत्याधुनिक 3×2 आसनी बसेस दाखल होणार आहेत
- या नव्या बसेसना ‘हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले असून या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.
- याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली

6) CSIR-CIMFR (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च) ने ग्रेटर नोएडा येथील NTPC-NETRA (निलपंत एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स) कॅम्पसमध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजन कॉम्प्रेसर आणि डिस्पेंसरचे सुरक्षा मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
- या यशाचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:
- देशांतर्गत क्षमता: हे मूल्यांकन हायड्रोजन उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी भारताची वाढती तांत्रिक क्षमता दर्शवते, ज्यामुळे भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.
- ग्रीन हायड्रोजन मिशनला गती: भारताच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ अंतर्गत हायड्रोजन आधारित वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुरक्षा मानके अत्यंत आवश्यक आहेत.
- सुरक्षेची खात्री: हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्याने, त्याचे कॉम्प्रेसर (दाब वाढवणारे यंत्र) आणि डिस्पेंसर (इंधन भरणारे यंत्र) यांचे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मूल्यांकन करणे अत्यंत गरजेचे होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel