Current Affairs | चालू घडामोडी | 10 JULY 2024
1) फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना = 10 जुलै 1800
- संस्थापक = लॉर्ड वेलस्ली (कोलकाता)
- इतर संस्था =
=> वॉरन हेस्टिंग = कलकत्ता मदरसा (1781)
=> डंकन = संस्कृत महाविद्यालय, बनारस
2) राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन
- 1957 मध्ये या दिवशी भारतीय प्रमुख कार्ब्सच्या यशस्वी प्रजननाच्या स्मरणार्थ दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन भारतात साजरा केला जातो.
- ही कामगिरी करणारे शास्त्रज्ञ होते प्राध्यापक डॉ. हिरालाल चौधरी आणि त्यांचे सहकारी डॉ. अलीकुन्ही. ते कटक, ओडिशातील सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआयएफआरआय) येथे कार्यरत होते.
3) कल्पना धनावत जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसची बनली सहायक लोको पायलट
- कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट ठरली आहे.
- जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदिल मिळाला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या रेल्वेचं उद्घाटन केले आहे.
- सुरेखा यादव : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी या पूर्वी सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) अशी अर्ध-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस चालवली होती.
4) रशियाचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान
- रशियाच्या या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराचे नाव “ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल” आहे.
- 2019 मध्येच पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली होती.
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सेवेबद्दल त्यांना हा सन्मान दिला आहे.
5) राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान
- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी प्यारे जिया खान यांची तर उपाध्यक्षपदी चेतन खेराज देढीया यांची नियुक्ती करण्यात आली.
- मुख्य कार्य
- अल्पसंख्याकांना संविधानाने दिलेल्या हक्काचे संरक्षण करणे.
- अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना बाबतीत शासनास शिफारस करणे.
- कार्यकाळ
- अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ आयोगाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पुढील 5 वर्षाकरिता नियुक्ती असते.
6) भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर टीम इंडियाचे नवे प्रमुख
- BCCI चे सचिव जय शाह यांनी गंभीरच्या नावाची घोषणा केली आहे.
- भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडची जागा गौतम गंभीर घेणार आहे. कोलकात्या पूर्वी, गौतम गंभीर आयपीएल 2022 आणि 2023 साठी लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक होता.
- 2007 आणि 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने ICC ट्रॉफी जिंकली आणि गौतम गंभीरने दोन्ही स्पर्धांच्या अंतिम फेरीत महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
7) AI द्वारे तयार केलेल्या रॉकेट इंजिनची इंग्लंडमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
- न्यूरल नेटवर्कने एक असामान्य डिझाइन व्युत्पन्न केले जे एलियन तंत्रज्ञानासारखे दिसते आणि ते पहिल्याच प्रयत्नात कार्य करते.
- 5 kN ची शक्ती असलेल्या इंजिनने 20 हजार hp चा थ्रस्ट तयार केला.
8) भारतीय पुरुष क्रिकेट संघांचे प्रशिक्षक टीम
- मुख्य प्रशिक्षक: गौतम गंभीर
- फलंदाजी प्रशिक्षक : अभिषेक नायर
- क्षेत्ररक्षण प्रशिक्षक : टी दिलीप
- गोलंदाजी प्रशिक्षक : विनय कुमार
- एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार : रोहित शर्मा
- T20 कर्णधार : हार्दिक पंड्या
9) मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात येणार
- योजनेसाठी सर्वंकष धोरण तयार करून नियमावली केली जाणार
- ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी ही योजना
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel