Current Affairs | चालू घडामोडी | 12 AUG 2024
अनुक्रमणिका
1) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुमूया ‘ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर-लेस्टे’ पुरस्कार
- तिमोर-लेस्टे चे अध्यक्ष, जोस रामोस-होर्टा यांच्या हस्ते सार्वजनिक सेवा आणि शिक्षण आणि समाजसेवेतील त्यांच्या समर्पणा बद्दल प्रदान करण्यात आला.
- राष्ट्रपती फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्टे या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
- राष्ट्रपतींच्या 6 दिवसांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा उद्देश भारताचे ‘एक्ट ईस्ट’ धोरण पुढे नेणे हा आहे.
- याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ ने सन्मानित करण्यात आले.
2) पुण्यातील दोन शास्त्रज्ञांना ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार जाहीर.
- यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (एनआयव्ही, पुणे) येथे कार्यरत असलेल्या तरुण शास्त्रज्ञ डॉ. प्रज्ञा यादव आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम, पुणे) डॉ. रॉक्सी मॅथ्यु कोल यांचा समावेश आहे.
- डॉ. प्रज्ञा यादव ह्या पुणे शहरातील NIV मध्ये बायोसेफ्टी लेव्हल-4 प्रयोगशाळेच्या प्रमुख आहेत.
- ही प्रयोगशाळा आशिया खंडातील पहिली असून, त्यांनी कोविडच्या काळात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
- पृथ्वी आणि अवकाश विज्ञानातील संशोधनासाठी डॉ. रॉक्सी मॅथ्यु कोल यांना पुरस्कार
3) एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणारे खेळाडू
- या ऑलिम्पिकमध्ये जलतरणपटू लिओन मार्चडने चार वेगवेगळ्या स्पर्धामध्ये सर्वाधिक 4 सुवर्णपदके जिंकली आहेत.
- 22 वर्षीय लिओन मार्चडची तुलना महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सशी केली जाते.
- मार्चडने अवघ्या 2 तासांच्या कालावधीत 2 सुवर्णपदकांवर नाव कोरले आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये 3-3 सुवर्णपदके जिंकली आहेत.
- यात यूएसएची टोरी हस्के, सिमोन बिल्स आणि गॅबी थॉमस, ऑस्ट्रेलियाची मॉली ओ’कॅलाघन यांचा समावेश आहे.
- यंदा भारताकडून 117 खेळाडू सहभागी झाले, पण कोणालाही सुवर्णपदक जिंकता आले नाही.
- सुवर्णपदक जिंकण्यामध्ये अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपानसह अनेक देश आघाडीवर आहेत.
4) पदकविजेत्यांमध्ये भारत 71 व्या स्थानी
- भारताने पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकूण सहा पदके जिंकली आहेत.
- 1900 मधील पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारत सर्वोत्तम 17 व्या स्थानावर होता. त्यानंतर 1928 मधील अॅमस्टरडॅम मधील ऑलिंपिकमध्ये भारत 23 व्या स्थानावर राहिला.
- त्यानंतर 1932 मधील लॉस एंजिलिस ऑलिंपिक ते 1980 मधील मॉस्को येथील ऑलिंपिकपर्यंत भारताने 50च्या आत क्रमवारीत जागा मिळवली.
- यंदा पाकिस्तान 62व्या स्थानावर
- अर्शद नदीम याने भालाफेकीत 92 मीटरपेक्षा जास्त भाला फेकून ऑलिंपिक विक्रम नोंदवला.
- पहिले 3 देश :
- 1) अमेरिका
- 3) जपान
- 2) चीन
5) पॅरिस 2024 समारोप समारंभात श्रीजेश आणि भाकर भारतासाठी सह-ध्वज वाहक असणार.
- भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने जाहीर केले आहे की पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभात हॉकी गोलकीपर पी आर श्रीजेश आणि पिस्तुल नेमबाज मनू भाकर हे भारतासाठी सह-ध्वज वाहक असतील.
- हा निर्णय श्रीजेशची शानदार कारकीर्द आणि भाकरच्या अलीकडील कामगिरीवर प्रकाश टाकतो.
6) बांग्लादेश सीमा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने समिती स्थापन केली.
- बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, भारत सरकारने भारत-बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शेजारील देशातील भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
- ही समिती बांगलादेशी अधिकाऱ्यांशी संवाद साधेल आणि सीमेवरील सुरक्षा
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel