Current Affairs | चालू घडामोडी | 12 AUG 2025
1) १२ ऑगस्ट दिनविशेष
१.१) १९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले
१.२) १९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म.
१.३) १८९०: बालकवी, निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म
१.४) १२ ऑगस्ट = आंतरराष्ट्रीय युवा दिवस
- तरुणांशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि जागतिक समाजात भागीदार म्हणून तरुणांच्या क्षमतेचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे मान्यता प्राप्त दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो.
- 1998 मध्ये तरुणांसाठी जबाबदार असलेल्या मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या शिफारशीनंतर आणि 1999 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने मान्यता दिल्यानंतर 12 ऑगस्ट 2000 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला.
- या दिवसाचे उद्दीष्ट तरुणांना प्रभावित करणार्या सांस्कृतिक आणि कायदेशीर आव्हानांकडे लक्ष वेधणे आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी तरुणांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.
१.५) जागतिक हत्ती दिवस
2) प्रमिलताई मेढे – राष्ट्र सेविका समितीची प्रेरणादायी नेत्या
- वयाच्या 97व्या वर्षी निधन
- 1950–1964: विदर्भ प्रांत कार्यवाहिका
- 1965–1975: केंद्रीय कार्यालय प्रमुख
- 1975–1978: आंध्र प्रदेश पालक अधिकारी
- 1978–2003: अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका (25 वर्षे)
- 2003–2006: सहप्रमुख संचालिका
- 2006–2012: समितीच्या चौथ्या प्रमुख संचालिका
- त्यांचे कार्य राष्ट्र सेविका समितीच्या इतिहासातील सुवर्णपान आहे.

3) शैलेश जेजुरिकर P&G चे वैश्विक अध्यक्ष नियुक्त
- प्रॉक्टर अँड गॅम्बलने (पी अँड जी) जानेवारीपासून भारतीय वंशाचे कार्यकारी अधिकारी शैलेश जेजुरीकर यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे.
- पी अँड जी ला विक्री कमी होणे, बदलणारे व्यापार धोरणे आणि जागतिक आर्थिक अनिश्चितता यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने, नोकऱ्यांमध्ये कपात आणि बाजारपेठेतून बाहेर पडणे यासारख्या संकटाना सामोरे जावे लागत आहे
- पॅन्टीन शॅम्पू आणि टाइड डिटर्जंटची निर्माता कंपनी
- १८७ वर्षांच्या इतिहासात अमेरिकास्थित कंपनीचे प्रमुख असलेले ते पहिले भारतीय आणि आशियाई असतील
- जेजुरीकर यांचे कुटुंब महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावचे आहे.
- त्यांनी १९८७ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आणि १९८९ मध्ये आयआयएम-लखनऊ येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले

4) “खालिद जामील” भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक
- खालिद जामील यांना 1 ऑगस्ट 2025 रोजी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) भारतीय पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
- ही नियुक्ती भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक ठरते, कारण 2012 मध्ये ‘सावियो मेडेईरा’ यांच्या नंतर खालिद जामील हे ‘राष्ट्रीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक’ म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
- खालिद जामील यांच्याबद्दल माहिती
- जन्म 21 एप्रिल 1977
- जन्म ठिकाण – कुवेत (भारतीय पंजाबी कुटुंबात).
- 1990 च्या दशकात ते भारतात आले
- 1997 कारकीर्द सुरवात
- मिडफिल्डर म्हणून खालिद यांनी भारतासाठी 40 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.
- 2009 मध्ये वयाच्या 32व्या वर्षी निवृत्ती घ्यावी लागली.
- खालिद जामील यांची स्पॅनिश प्रशिक्षक “मॅनोलो मार्केझ” यांच्या जागी नियुक्ती झाली

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel