Current Affairs | चालू घडामोडी | 12 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 12 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 12 सप्टेंबर 2013 = राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत
2) आत्महत्या रोखण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यावर भर देण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन पाळला जातो.
- हा दिवस 2003 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) द्वारे स्थापित करण्यात आला.
- यावर्षीची थीम “चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाइड” अशी आहे.
3) देशात पहिल्यांदाच ‘पेपरलेस’ मतदान
- ठिकाण: मध्य प्रदेश, भोपाल जिल्ह्यातील बैरसिया तहसील
- प्रथम प्रयोग: बैरसिया तहसील मधील ग्रामीण पंचायत निवडणुकीत
- देशातील पहिल्या पेपरलेस मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
- पेपरलेस मतदानाचे फायदे:
- मतदार ओळख आणि माहिती एका क्लिकवर उपलब्ध.
- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि त्वरित झाली.
- बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगवान प्रक्रिया.
- महत्त्वाचे मुद्दे:
- २६ गावांमध्ये बायोमेट्रिक प्रणालीने मतदान प्रक्रिया सुरुवात झाली.
- प्रत्येक मतदाराची माहिती त्वरित उपलब्ध.
- मतदारांची ओळख निश्चित करण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर.
- विशेष महत्त्व: राज्य निवडणूक आयोगाने हा तंत्रज्ञानावर आधारित मतदानाचा प्रयोग केला आहे. यामुळे गावातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.
4) डावे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे ७२ व्या वर्षी श्वसनाच्या आजाराने निधन झाले.
- तीन दशकांहून अधिक काळ सीपीएमची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असलेल्या पॉलिटब्युरोचे सदस्य, श्री. येचुरी पश्चिम बंगालमधून 2005 ते 2017 या काळात राज्यसभेचे सदस्य होते.
5) अविनाश साबळे प्रथमच खेळणार डायमंड लीगची फायनल
- 3000 मीटर स्टीपलचेस मध्ये होणार सहभागी
- नीरज चोप्रा नंतर चा दुसरा भारतीय
- नीरज चोप्रा देखील भालाफेकिमध्ये होणार सहभागी
6) स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार” महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर
- सर्वेक्षण 2023 अभियानातील पुरस्कार प्राप्त शहरे
- नवी मुंबई महानगरपालिका : स्वच्छ शहर 3 रा क्रमांक आणि 7 स्टार दर्जा
- सासवड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या 1 ला क्रमांक
- लोणावळा नगरपरिषद: 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या – 3 रा क्रमांक
- पुणे महानगरपालिका : स्वच्छ शहर 10 वा क्रमांक
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका: 5 स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकन व स्वच्छ शहर 13-वा क्रमांक
- गडहिंग्लज नगरपरिषद : 50 हजारापेक्षा कमी लोकसंख्या – विभागीय पुरस्काराने सन्मानित
- पाचगणी नगरपरिषद : 15 हजारापेक्षा कमी लोकसंख्या – विभागीय पुरस्काराने सन्मानित
- कराड नगरपरिषद : 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या – विभागीय पुरस्काराने सन्मानित
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel