Current Affairs | चालू घडामोडी | 14 JULY 2025
1) 14 जुलै दिनविशेष
1.1) 1856 = गोपाळ गणेश आगरकर जयंती
- कार्य = केसरीचे पहिले संपादक , डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये स्थापनेत सहभाग (1884)
1.2) 2017 = सरस्वती दीर्घिकेचा (Supercluster) शोध
2) INS निस्तार – सागरातील रक्षक!
- भारताची पहिली पूर्णतः स्वदेशी पाणबुडी सहाय्यक युद्धनौका!
- ‘INS निस्तार’ खोल समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या पाणबुडीतील जवानांना वाचवण्यासाठी खास बनवलेली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) आहे.
- हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम येथे ही युद्धनौका बांधली गेली असून 8 जुलै 2025 रोजी ती भारतीय नौदलात सामील झाली.
- विशेष वैशिष्ट्ये
- डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल (DSRV) साठी मदरशिप
- बचाव मोहिमांमध्ये अडकलेल्या नौदल कर्मचाऱ्यांचा जीव वाचवण्याची क्षमता
- पूर्णपणे भारतात डिझाइन व विकसित
- आत्मनिर्भर भारताच्या नौदल क्षमतेत मोठी भर
- ‘निस्तार’ या शब्दाचा अर्थ – मोक्ष, बचाव किंवा मुक्ती!
- या नावाची प्रेरणा 1971 च्या भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक युद्धनौकेपासून घेतली आहे.
- लवकरच येणारी INS निपुण ही दुसरी जहाजही भारताची समुद्री बचावक्षमता अधिक बळकट करणार!

3) गणेशोत्सव = महाराष्ट्र राज्य महोत्सव
- १०० वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून घोषित करण्यात आले.
- राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली.
- महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे.

4) जनसुरक्षा विधेयक – 2025
(10 जुलै 2025 रोजी विधानसभेत मंजूर)
- मुख्य उद्देश:
- शहरी व ग्रामीण भागातील नक्षलवादी, विशेषतः डाव्या उग्रवादी चळवळींना आळा घालणे.
- प्रमुख ठळक बाबी:
- कठोर शिक्षा:
- नक्षलवादी कृत्यांबद्दल 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास व ₹3 लाखांपर्यंत दंड.
- चौकशी यंत्रणा:
- आता पोलिस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी चौकशी करणार.
- जामीन मिळणे कठीण:
- आरोपींना जामीन मिळणे कठीण; कठोर कायदेशीर प्रक्रिया.
- संघटना बेकायदेशीर ठरवणे:
- कोणतीही संघटना बेकायदेशीर ठरवण्याआधी सल्लागार मंडळाचा निर्णय अनिवार्य.
- देशविरोधी कारवायांवर कारवाई:
- देशविरोधी विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती व गटांवर थेट कारवाई.
- मालमत्ता जप्तीची तरतूद:
- नक्षलवादी कृत्यांशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार.
- पोलीसांना विशेष अधिकार:
- राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना आरोप न करता ताब्यात घेण्याची मुभा.
- लक्ष कोणावर?
- शहरी/ग्रामीण नक्षलवादी गट, डाव्या उग्र विचारांचा प्रसार करणाऱ्या संघटना व देशविरोधी व्यक्तींवर कारवाईची तरतूद.

5) पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा – महाराष्ट्र देशात पहिले राज्य!
- महत्त्वाचा निर्णय: महाराष्ट्र सरकारने पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा दिला असून, अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- ही माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
- उद्दिष्ट:
- पशुपालकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे.
- फायदे:
- राज्यातील ७६.४१ लाख पशुपालक कुटुंबांना थेट लाभ
- ७,७०० कोटी रुपयांची आर्थिक वृद्धी अपेक्षित
- वीज दर कृषी वर्गवारीप्रमाणे आकारले जातील
- ग्रामपंचायत करात एकसमानता – कृषी दरप्रमाणेच पशुपालनावर कर
- कर्जावरील ४% पर्यंत व्याज सवलत
- स्वयंस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे व कार्यपद्धती जाहीर होणार
- कुक्कुटपालनालाही मिळणार कृषी व्यवसायाचा लाभ

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel