Current Affairs | चालू घडामोडी | 16 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 SEPT 2024

1) 16 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 16 सप्टेंबर 1909 = अरुणा असफलीची जयंती

  • गोवालिया टॅंक सभेत ध्वजारोहण = 1942
  • उषा मेहता सोबत भूमिगत रेडिओ स्टेशन = 1942
  • दिल्लीच्या प्रथम महापौर = 1958
  • भारतरत्न 1997

2) माणगावमध्ये सापडले सर्वात मोठे फुलपाखरू

  • जगातील आकाराने सर्वात मोठे फुलपाखरू रायगड जिल्ह्यातील उतेखोल माणगाव येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सापडले आहे.
  • या फुलपाखरूला शास्त्रीय परिभाषेत ‘ॲटलास मॉथ’ म्हणून ओळखले जाते.

3) वंदे भारत मेट्रोच नावं बदलेले आहे

  • नवीन नाव = नमो भारत रॅपिड रेल

4) लवकरच होणार जनगणना

  • केंद्र सरकारने दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेची तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेत जातीसंबंधी माहितीचा रकाना समाविष्ट करण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  • यावेळी प्रथमच डिजिटल जनगणना होणार असून, नागरिकांना स्व-गणना करण्याची संधी मिळणार आहे.
  • त्यासाठी स्व-गणना पोर्टल तयार करण्यात आले असून, ते लवकरच लाँच होईल.
  • महिला आरक्षणासाठी : महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यासाठी कायदा लागू झाल्यानंतरच्या पहिल्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे परिसीमन प्रक्रिया सुरू होईल.
  • 12 हजार कोटी रुपयांचा खर्च यावेळी अपेक्षित आहे.
  • आधार किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे स्व-गणना होईल.
  • कोरोनामुळे २०२० मध्ये होणारी जनगणना स्थगित करण्यात आली.

5) रणधीर सिंग ओसीएच्या अध्यक्षपदी

  • ओसीएच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले ते पहिले भारतीय आहेत
  • शेख अहमद अल-फहद यांची त्यांनी जागा घेतली
  • अनुभवी खेळ संघटक रणधीर सिंग यांची आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (ओसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ओसीएच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले ते पहिले भारतीय ठरले आहेत.

6) 16 सप्टेंबर = जागतिक ओझोन दिवस

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या अहवालानुसार जगातील पहिल्या पंधरा वायू प्रदूषित देशांमध्ये भारतातील दहा शहरे
  • ओझोन प्रदूषणामुळे देशभरात 23 वर्षांत 2.40 लाख बळी
  • ओझोन थराच्या नाजूक कवचाचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून नियुक्त केला आहे, जो पृथ्वी ग्रहाला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देतो.
  • ओझोन नैसर्गिकरित्या पृथ्वीच्या वरच्या वातावरणात, स्ट्रॅटोस्फियरमध्ये आढळतो.
  • थीम 2024 :  “मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स”
  • ओझोन (O3) हा एक प्रतिक्रियाशील वायू आहे, ज्यामध्ये तीन ऑक्सिजन अणू असतात जे नैसर्गिक किंवा मानव बनू शकतात आणि पृथ्वीच्या उच्च वातावरणात (स्ट्रॅटोस्फियर) उपस्थितीत असतात.

7) झिका, फ्लू, रक्ताच्या कर्करोगावर लवकरच लस

  • ICMR कडून पहिल्या टप्प्याच्या चाचणीसाठी कंपन्यांसोबत करार
  • कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसींची निर्मिती करून जगात आपला ठसा उमटवल्यानंतर भारत पुन्हा एकदा नव्या लसी बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  • झिका व्हायरस, फ्लू आणि रक्ताच्या कर्करोगापासून ग्रस्त रुग्णांसाठी या लसी विकसित करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment