Current Affairs | चालू घडामोडी | 18 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 18 AUG 2024

1) लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी वेणुगोपाल

  • संसदेच्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे सदस्य अशोक चव्हाण व प्रफुल्ल पटेल या दोन मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संसदीय परंपरेनुसार लोकलेखा समितीचे अध्यक्षपद विरोधी पक्षाला देण्यात आले असून, अध्यक्षपदी काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांची वर्णी लागली आहे
  • विधिमंडळाच्या वित्तीय सामित्यांपैकी एक महत्त्वाची समिती 1919 च्या माँटफोर्ड सुधारणेअंतर्गत गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया अक्ट, 1919 नुसार 1921 मध्ये लोकलेखा समितीची स्थापना करण्यात आली.
  • लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात. त्यांपैकी 15 लोकसभेतून तर 7 राज्यसभेतून निवडून दिले जातात.
  • लोकलेखा समितीला सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताच्या महालेखापालाच्या सरकारी जमा-खर्चाच्या अहवालावर अवलंबून रहावे लागते.

2) महाराष्ट्राच्या लेकीला पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत ध्वजवाहकाचा मान

  • पॅरिसमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत पॅरालिम्पिक स्पर्धा होत आहेत.
  • या स्पर्धेत भारतीय दलाच्या ध्वजवाहकाचा मान महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव यांच्यासह भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मिळाला आहे.
  • भारत यंदा 84 खेळाडूंसह सर्वात मोठा दल पॅरिसमध्ये पाठवणार आहे.
  • टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या 14 महिलांसह एकूण 54 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदा 32 महिला खेळाडूंसह एकूण 84 जण सहभागी होत आहेत.
  • टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य व सहा कांस्यसह एकूण 19 पदके जिंकली होती.
  • भाग्यश्री जाधव यांचा जन्म 1985 मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे झाला.
  • 2006 मध्ये एका अपघाताने तिला व्हिलचेअरवर बसवले आणि ती प्रचंड मानसिक दडपणात गेली होती, पण तिने गोळाफेकीचा खेळ निवडला आणि डिप्रेशनवर मात केली.

3) मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. प्रसाद कारंडे

  • गेल्या 2 वर्षांनंतर मुंबई विद्यापीठात पूर्णवेळ कुलसचिवांची नियुक्ती करण्यात आली.
  • माटुंग्यातील वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘व्हीजेटीआय’ मधील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद कारंडे यांची मुंबई विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • डॉ. प्रसाद कारंडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे.

4) खगोलप्रेमींसाठी ‘सुपर ब्लू मून’ पाहण्याची पर्वणी

  • नेमके काय घडते?
  • ‘ब्लू मून’ ही एक खगोलीय घटना आहे .
  • जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा असतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला किंवा एका हंगामात चार पौर्णिमा असतात तेव्हा तिसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ असे म्हणतात .
  • जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो तेव्हा त्याला ‘सुपरमून’ म्हणतात .
  • या स्थितीत चंद सामान्य पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा 14 टक्के मोठा आणि 30 टक्के अधिक तेजस्वी दिसतो.
  • किती वाजता पाहता येणार?
  • 19 ऑगस्टला रक्षाबं- धनाच्या दिवशी संध्याकाळी 6: 56 वाजता चंद्रोदय होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रास्त होईल.
  • रात्री 11:55 वाजता चंद्र सर्वांत मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. त्या त्या ठिकाणचे हवामान आणि दृश्यमानता यानुसार खगोलप्रेमींना चंद्राचे ‘सुपर ब्लू मून’ हे रूप पाहता येईल.

5) MSEDCL च्या प्रयत्नाने मण्याचीवाडी वर सूर्यकृपा

  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) ने येत्या दोन महिन्यांत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना 100% पर्यंत सौरऊर्जेवर वीज पुरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.
  • सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मन्याचीवाडी हे या योजनेचा लाभ घेणारे पहिले गाव आहे.
  • याला लवकरच जास्तीत जास्त सौरऊर्जेवर चालणारी वीज मिळेल आणि ‘सोलर व्हिलेज’ म्हणून ओळखले जाईल.
  • मन्याचीवाडीपाठोपाठ महाराष्ट्रातील इतर ७० हून अधिक गावेही या प्रकल्पाचा भाग असतील.
  • छतावरील सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

6) बांगलादेश अशांतता UN च्या रडारवर

  • बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी चर्चा करण्यासाठी तसेच बांगलादेशातील अलीकडील अशांतता दरम्यान मानवी हक्क उल्लंघनाच्या चौकशीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मानवाधिकार पथक पुढील आठवड्यात ढाकाला भेट देणार आहे.
  • बांगलादेश हिंसाचारात तेथील अल्पसंख्यांकाना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

7) व्हिएतनाममधून होणाऱ्या पोलाद आयातीची अँटी डंपिंग चौकशी सुरू

  • ही उत्पादने अत्यंत कमी किमतीत विकली जात असल्याच्या तक्रारींनंतर भारताने व्हिएतनाममधून हॉट रोल्ड फ्लॅट उत्पादनांच्या आयातीबाबत अँटी-डंपिंग तपासणी सुरू केली आहे.
  • कारण यामुळे देशांतर्गत पोलाद उद्योगावर नकारात्मक परिणाम होत आहे.
  • JSW स्टील आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (AM/NS India) सारख्या आघाडीच्या भारतीय पोलाद निर्मात्यांच्या विनंतीनंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment