Current Affairs | चालू घडामोडी | 18 FEB 2026

Current Affairs | चालू घडामोडी | 18 FEB 2026

1) १८ फेब्रुवारी दिनविशेष

१.१) भारतीय नौसेनेचा उठाव = १८ फेब्रुवारी १९४६

  • मुंबई येथे तलवार युद्धनौकेवर भारतीय नौसैनिकांनी उठाव केला

१.२) इंडियन होमरूल सोसायटीची स्थापना = १८ फेब्रुवारी १९०५

  • संस्थापक श्यामजी कृष्ण वर्मा (इंग्लंड)
  • इतर कार्य = इंडिया हाऊस, इंडियन सोशॉलॉजिस्ट पत्रिका

१.३) प्रधानमंत्री पीक विमा योजना : १८ फेब्रुवारी २०१६

१.४) पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी) = जन्म १८ फेब्रुवारी १८२३

१.५) १८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म

१.६) १८३६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांचा जन्म

१.७) १८७१: थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म

१.८) १९६७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन

१.९) १७४५: बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचा जन्म

2) १६ वी अखिल भारतीय पोलिस कमांडो स्पर्धा

  • आयोजक – राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG)
  • उद्घाटन – बी. श्रीनिवासन (DG, NSG) यांनी केले
  • ठिकाण – NSG गॅरिसन, मानेसर, गुरुग्राम, हरियाणा
  • कालावधी – 16 फेब्रुवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026
  • सहभाग – 24 संघ (CAPF + राज्य पोलिस दल)
  • कमांडो संख्या – सुमारे 800 कमांडो
  • मुख्य उद्देश: दहशतवादविरोधी तयारी, समन्वय, ऑपरेशनल कौशल्य वाढवणे

3) आशियाई रायफल/पिस्तूल अजिंक्यपद २०२६ मध्ये भारताचे वर्चस्व

  • भारताने पदकांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले
  • दिनांक – 2 ते 14 फेब्रुवारी
  • भारताने एकूण पदके 94 पदके जिंकली
  • ज्यामध्ये 51 सुवर्ण, 23 रौप्य आणि 20 कांस्यपदकांचा समावेश आहे.
  • ठिकाण: डॉ. करणी सिंह शूटिंग रेंज, नवी दिल्ली, भारत
  • 25 मी. सेंटर फायर पिस्टल (पुरुष): अमनप्रीत सिंह गोल्ड
  • 25 मी. पिस्टल (ज्युनियर पुरुष): सूरज शर्मा गोल्ड
  • 50 मी. रायफल प्रोन (महिला): सिफ्ट कौर समरा सिल्वर

4) सतेंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा-जलतरणपटू ठरला

  • रहिवासी – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील
  • दिनांक – 12 फेब्रुवारी 2026
  • आशियातील पहिले पॅरा-जलतरणपटू
  • अंतर – 23.6 किलोमीटर
  • वेळ – 9 तास 22 मिनिटे
  • 2024 मध्ये लोहिया यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
  • याअगोदर लोहियाने तीन आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक जलतरण स्पर्धेत एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे.
  • कुक सामुद्रधुनी –  न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांना वेगळे करणारी सामुद्रधुनी (सरासरी रुंदी: फक्त 22 किमी)
  • हे पण लक्षात घ्या
    • इंग्लिश चॅनेल ओलांडले (पहिला भारतीय पॅरा-स्विमर)
    • कॅटालिना चॅनेल (अमेरिका) – आशियातील पहिले

5) केरळ = भारतातील पहिले स्वतंत्र आणि शहरी धोरण

  • केरळची भारतातील पहिले राज्य ज्याने स्वतंत्र आणि शहरी धोरण (Urban Policy) मंजूर केले
    • दिनांक – 13 फेब्रुवारी 2026
    • मुख्यमंत्री – पिनारायी विजयन त्यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी
    • 2050 पर्यंत 80% लोक शहरी भागात राहतील.
    • 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती

6) भारत-मलेशिया क्रॉस-बॉर्डर QR पेमेंट करार

  • दिनांक – 12 फेब्रुवारी 2026
  • करार –  UPI आणि DuitNow QR इंटिग्रेशन यांच्यात
  • PayNet – Payments Network Malaysia Sdn Bhd (DuitNow QR मलेशिया)
  • NIPL – NPCI International Payments Limited (NIPL)
  • उद्देश – भारत आणि मलेशिया दरम्यान क्रॉस-बॉर्डर QR-आधारित व्यापारी पेमेंट सक्षम करणे
  • UPI आधीच UAE, सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, भूतान, मॉरिशस इ. देशांत उपलब्ध आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment