Current Affairs | चालू घडामोडी | 18 JULY 2025
1) 18 जुलै दिनविशेष
1.1) अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (१९६९)
- लोकशाहीर, साहित्य-फकिरा (१९५९) सहभाग – संयुक्त महाराष्ट्र चळवळ
1.2) बॉम्बे विद्यापीठाची स्थापना (१८५७)
- वूडच्या अहवालाच्या (१८५४) आधारे स्थापना,
- कलकत्ता विद्यापीठ & मद्रास विद्यापीठ देखील = १८५७ साली
2) UPI व्यवहारात महाराष्ट्र देशात आघाडीवर!
- जून 2025 मध्ये महाराष्ट्रातून २.११ लाख कोटी रुपयांचे UPI व्यवहार
- देशातील एकूण UPI व्यवहारांपैकी ८.८०% वाटा महाराष्ट्राचा
- कर्नाटकच्या तुलनेत ५६.७९% अधिक व्यवहार
- UPI व्यवहारासाठी सर्वाधिक वापर:
- फोन पे, गुगल पे, पेटीएम
- व्यवहार करताना:
- सरकारी बँकांचा वापर
- अॅप वापरासाठी आघाडीवर:
- एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक बँकेचे अॅप्स
- NPCI चा अहवाल

3) ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे निधन
- तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता
- वयाच्या ८३व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
- ४० वर्षांहून अधिक काळाचे योगदान
- ७५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय
- कारकिर्दीची सुरुवात: ‘प्रणाम खरेदू’ (१९७८)
- राजकीय कारकीर्द:
- १९९९–२००४ – विजयवाडा (पूर्व) येथून भाजप आमदार
- पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

4) TIME100 Creators 2025 मध्ये प्राजक्ता कोळी यांचा गौरव!
- ‘MostlySane’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्राजक्ता कोळी ही TIME100 Creators 2025 यादीतील एकमेव भारतीय creator ठरली आहे
- जगातील १०० प्रभावशाली डिजिटल निर्मात्यांमध्ये स्थान
- या यादी मध्ये मिस्टर बीस्ट, खबाने लेम, काई सेनाट असे काही उल्लेखनीय नावही आहेत
- २०२५ मध्ये तिची पहिली कादंबरी ‘Too Good To Be True’ प्रकाशित
- YouTuber ते लेखिका व अभिनेत्री असा प्रवास

5) वर्षा देशपांडे यांना पुरस्कार
- 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना मिळाला आहे
- महाराष्ट्रातील सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या
- दलित महिला विकास मंडळ या संस्थेच्या संस्थापक
- वैयक्तिक श्रेणीत यांची निवड झाली
- पुरस्कार देणारी संस्था – UNFPA (United Nations Population Fund)
- हा पुरस्कार 11 जुलै 2025 रोजी न्यूयॉर्क येथे दिला गेले (जागतिक लोकसंख्या दिनी)
- वर्षा देशपांडे या तिसऱ्या भारतीय आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे
- इंदिरा गांधी (1983)
- जे.आर.डी. टाटा (1992)
- वर्षा देशपांडे (2025)
- हा पुरस्कार जागतिक पातळीवर लोकसंख्या, लिंगसमता, आणि पुनरुत्पादन आरोग्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिला जातो
- पुरस्कार स्थपणा – 1981 आणि पहिला पुरस्कार 1983 ला दिला गेला.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel