Current Affairs | चालू घडामोडी | 19 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 19 DEC 2023

1) संसदेत एकाच दिवशी 78 खासदार निलंबित.

  • लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदार निलंबित
  • एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची संसदीय इतिहासातील ही पहिलीच घटना
  • निलंबनानंतर काय ?
  • निलंबन कालावधीत खासदारांना संसदेत वा समितीच्या बैठकांना उपस्थित राहता येत नाही.
    • एखाद्या विषयासंबंधीत चर्चा करण्यासाठी ते सूचना मांडू शकत नाहीत.
    • विचारलेल्या प्रश्नांना उत्तर मिळविण्याचा अधिकार गमावतात.
  • घटनेच्या कलम 122 नुसार , संसदेने केलेल्या कारवाईवर न्यायालयात दाद मागता येत नाही.
  • 4 दिवसांमध्ये अधिवेशन संपणार असल्याने हे निलंबन 4 दिवसांसाठीच असेल.

2) वाराणसीतील स्वर्वेद महामंदिराचे पंतप्रधानाच्या हस्ते लोकार्पण.

  • जगातील सर्वात मोठे ध्यानधारणा केंद्र
  • याचवेळी वाराणसी येथेच ‘काशी तमिळ संगमम 2.0’ चे अनावरण
  • तमिळ भाषिकांसाठी‌ ‘भाषिणी’ नावाच्या AI चा वापर केला गेला

3) YCMOU प्रमाणपत्रांसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान.

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) दीक्षांत सोहळ्यात दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे वैशिष्ठ्यपूर्ण असून त्यावरील सांकेतांक (क्यू्आर कोड) स्कॅन केल्यावर त्यांची वैधता पडताळता येणार आहे.
  • अशा प्रकारे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारीत प्रमाणपत्र वितरित करणारे मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरणार आहे.

4) सुवर्णमहोत्सवी राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन पुण्यात.

  • उद्देश = मुलांमध्ये विज्ञानाची गोडी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
  • १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना सृजनशीलता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एनसीईआरटी) राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येते.
  • यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असलेल्या या प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान पुण्याला मिळाला असून, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात २६ ते ३० डिसेंबरदरम्यान हे प्रदर्शन होणार आहे.
  • 2022 चे प्रदर्शन आसाम मधील गुवाहाटी येथे झाले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment