Current Affairs | चालू घडामोडी | 19 FEB 2026
1) १९ फेब्रुवारी दिनविशेष
१.१) छत्रपती शिवाजी महाराज जयंती = १९ फेब्रुवारी १६३० (तारखेनुसार)
१.२) गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा स्वीकार = १९ फेब्रुवारी २०२३
- वेळ एक मिनिट ४१ सेकंद
- गीतकार कवी राजा बढे
- संगीतकार श्रीनिवास खळे
- गायन शाहीर साबळे
१.३) १४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म
१.४) १८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज – नोबेल पारितोषिक – स्वांते अर्हेनिअस यांचा जन्म
१.५) १९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन
१.६) १९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन
१.७) १९२५ = आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचा जन्मदिवस

2) रेल्वे मंत्रालयाने दिली 3 प्रकल्पांना मंजुरी
- रेल्वे मंत्रालयाच्या अंदाजे 18509 कोटी रुपयांच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग (बहु-मार्गी) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे
- मंजूर झालेले तीन प्रकल्प:
- कसारा–मनमाड – महाराष्ट्र
- दिल्ली–अंबाला – दिल्ली आणि हरियाणामध्ये.
- बल्लारी–होसापेत – कर्नाटक
- होणारे बदल
- भारतीय रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कमध्ये अंदाजे 389 किलोमीटरची भर पडतील.
- 12 जिल्ह्यांमधून (दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक) हे मार्ग जातील
- 3902 गावांशी कनेक्टिव्हिटी मजबूत होईल
- प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा

3) कोलंबियाने कोलंबिया-आयआयटी बॉम्बे एआय फॉर मॅन्युफॅक्चरिंग सेंटरची स्थापना करार
- ठिकाण – भारत मंडपम, नवी दिल्ली
- कार्यक्रम – भारत बोध एआय कॉन्क्लेव्ह 2026
- उपस्थित – केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान
- हे संयुक्त संशोधन आणि भाषांतर केंद्र आहे.
- उद्देश: वास्तविक जगातील उत्पादन साठी मजबूत, स्केलेबल आणि मानव-केंद्रित एआय प्रणाली विकसित करणे

4) निवडणूक ट्रस्ट निधी वाटप 2024-25 अहवाल प्रसिद्ध
- निवडणूक ट्रस्ट – विशेष संस्था आहेत ज्या कंपन्या आणि लोकांकडून पैसे घेतात आणि ते राजकीय पक्षांना देतात
- 2024-25 मध्ये ट्रस्टना 3826 कोटी रुपये देणग्या मिळाल्या आणि जवळपास तितकेच 3826 कोटी रुपये राजकीय पक्षांना वाटले गेले.
- भाजपला – 3157 कोटी रुपये (सर्वात जास्त 82.5% )
- काँग्रेस – 299 कोटी (7.8%)
- तृणमूल काँग्रेस (TMC) – 102 कोटी रुपये – 2.6%)
- इतर 19 पक्ष एकत्र 268 कोटी रुपये (सुमारे 7%)
- प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट – सर्वात जास्त वाटप (2668 कोटी रुपये, 15 पक्षांना)
- सर्वात मोठी कंपनी: Elevated Avenue Realty LLP (500 कोटी)
- राज्यानुसार महाराष्ट्र – सर्वात जास्त (1225 कोटी)
- निवडणूक रोखे योजना 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने रद्द केली (असंवैधानिक). आता ट्रस्ट हे मुख्य मार्ग आहे

5) इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो २०२६
- दक्षिण आशियातील पहिली परिषद
- दिनांक – 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026
- ठिकाण – भारत मंडपम, नवी दिल्ली
- आयोजक- MeitY अंतर्गत IndiaAI Mission.
- थीम – A global convergence of scale, innovation, and impact
- प्रदर्शनाचा उद्देश – AI यला लोक, पर्यावरण आणि प्रगतीसाठी वापरणे; भारताला ग्लोबल एआय लीडर बनवणे
- यापूर्वी ब्रिटनमधील ब्लेचली (२०२३), सेऊल (२०२४) आणि पॅरिस (२०२५) येथे ‘एआय’ जागतिक परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे
- काही महत्वाची माहिती
- उद्घाटन – पंतप्रधान नरेंद्र मोदी
- एकूण 500+ सत्रे
- 45+ देश सहभागी
- 3250 वक्ते , 300 दालने
- ही भारतातील चौथी शिखर परिषद आहे (ब्रिटन, दक्षिण कोरिया आणि फ्रान्स नंतर)
- परिषदेतील सर्व दालनांची ‘पीपल (लोक), प्लॅनेट (ग्रह) आणि प्रोग्रेस (प्रगती)’ या तीन संकल्पनात्मक चक्रांमध्ये रचना करण्यात आली आहे
- याच वेळी ‘यूपीआय वन वर्ल्ड वॉलेट’ची पायलट आवृत्ती सुरू केली

6) देशातील पहिली ‘एआय लिव्हिंग लॅब’ मुंबईत
- देशातील पहिली AI Living Lab महाराष्ट्रात मुंबईत सुरू झाली आहे.
- हे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ च्या मुख्यालयात (मुंबई) स्थापन करण्यात आलं आहे.
- उद्घाटन – मंगलप्रभात लोढा
- छोट्या-मोठ्या उद्योगांच्या रोजच्या समस्या AI ने सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना खऱ्या कामाचा अनुभव देण्यासाठी ही लॅब आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel