Current Affairs | चालू घडामोडी | 19 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 JULY 2024

1) 19 जुलै

  • 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण = 19 जुलै 1969
    • 50 कोटी पेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या बँका
    • तत्कालीन पंतप्रधान = इंदिरा गांधी
  • 1952 : फिनलंडमधील हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात.
  • 1832 : सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
  • 1976 : नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती झाली.
  • 1947 : म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
  • 1992 : कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
  • 1980 : मॉस्को येथे 22 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1996 : अटलांटा, यूएसए येथे 26 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1993 : बानू कोयाजी यांना समाज सेवेसाठी डॉ. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

2) सर्वोच्च न्यायालयात दोन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती

  • सर्वोच्च न्यायालयाला दोन नवीन न्यायाधीश मिळाले असून, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मंजूर झालेल्या न्यायाधीशांची संख्या पूर्ण झाली आहे.
  • न्या. एन. कोटिश्वर सिंह आणि न्या. आर. महादेवन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली आहे.
  • जम्मू-काश्मीरचे सरन्यायाधीश एन. कोटिश्वर सिंह हे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले मणिपूरचे पहिले न्यायाधीश ठरले आहेत.
  • न्यायमूर्ती महादेवन हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश आहेत.

3) शाळांमध्ये महावाचन उत्सव, अमिताभ बच्चन सदिच्छादूत

  • 22 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024 ‘हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली.

4) महारेरा अध्यक्षपदी मनोज सौनिक

  • महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अर्थात महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची वर्णी लावण्यात आली आहे.
  • विद्यमान अध्यक्ष अजोय मेहता यांची अध्यक्षपदाची मुदत ही 20 सप्टेंबर 2024 रोजी संपत असताना देखील दोन महिने आधी हा आदेश काढला आहे.
  • मेहता यांची मुदत संपल्यानंतर सौनिक आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • महारेरा च्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले मनोज सौनिक हे भारतीय प्रशासकीय सेवेतील 1987 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत.
  • 30 एप्रिल 2023 रोजी त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे स्वीकारली होती.

5) अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना

  • सन 2024 – 25 च्या अंतरिम अर्थसंकल्पा मध्ये बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती.
  • त्या अनुषंगाने मंत्रिमंडळा च्या झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती या समाजाच्या विकासाकरिता आर्टी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

6) हरियाणा सरकारची घोषणा, पोलीस भरतीत अग्नीवीर दलाला 10 टक्के आरक्षण मिळणार

  • हरियाणा राज्याने अलीकडेच पोलीस भरतीमध्ये अग्नीवीर दलाला 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे.
  • हरियाणा मुख्यमंत्री : नायबसिंग सैनी

7) सरळसेवा भरती ‘एमपीएससी’ मार्फतच

  • २०२६पासून अंमलबजावणी, समन्वय समितीची स्थापना
  • सरळसेवा भरतीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  • गुरुवारी जारी झालेल्या शासननिर्णयानुसार २०२६ नंतर सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट क
  • संवर्गातील पदे एमपीएससीमार्फत भरण्यात येतील.

8) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’चे उद्घाटन

  • लंडनहून साताऱ्यात आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनखांचा भव्य सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पार पडणार आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया ॲंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून साताऱ्यात आणण्यात आली आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment