Current Affairs | चालू घडामोडी | 20 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 20 JULY 2025

1) २० जुलै दिनविशेष

१.१) १९२४ = बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना

  • स्थळ = मुंबई,
  • अध्यक्ष = डॉ.बाबासाहेब आंबेडकर

१.२) २०१७ = भारत-जपान नागरी अणुसहकार्य करार लागू

  • भारतासोबत अणुकरार करणारा जपान १२ वा देश

१.३) १८२२: जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ ग्रेगोर मेंडेल यांचा जन्म

१.४) १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म

१.५) १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन.

2) पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना

  • केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी – वार्षिक ₹२४,००० कोटी खर्चाच्या “पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला” मान्यता.
  • ३६ योजनांचा समन्वय – केंद्र सरकारच्या विविध योजनांचा एकत्रित कृती आराखडा.
  • १०० जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी – ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही योजना उत्पादनक्षमतेनुसार निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राबवली जाईल.
  • मुख्य उद्दिष्टे –
    • शेती उत्पादनवाढ
    • सिंचन सुविधा
    • पिकवैविध्य
    • कृषी पतपुरवठा विस्तार
    • पूरक व्यवसायांना चालना
  • मास्टरप्लॅन तयार होणार – प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा कृषी कृती आराखडा तयार होणार.
  • थेट लाभार्थी – पुढील ६ वर्षांत सुमारे १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ.

3) पंतप्रधान मोदींची ऐतिहासिक कामगिरी – १७ देशांच्या संसदेत भाषणे

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ देशांच्या संसदेत भाषण करणारे एकमेव भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
  • ही संख्या काँग्रेसच्या सर्व माजी पंतप्रधानांनी मिळून केलेल्या भाषणांइतकीच आहे.
  • नुकताच नामिबिया संसदेत त्यांनी भाषण करताना ही कामगिरी गाठली.
  • अलीकडच्या दौऱ्यात भाषण केलेले देश:
    • घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, नामिबिया (२०२५)
  • देशवार भाषणांची यादी:
    • २०१४ – ऑस्ट्रेलिया, फिजी, भूतान, नेपाळ
    • २०१५ – मॉरिशस, मंगोलिया, अफगाणिस्तान, ब्रिटन, श्रीलंका
    • २०१६ व २०२३ – अमेरिका
    • २०१८ – युगांडा
    • २०१९ – मालदीव
    • २०२४ – गयाना
    • २०२५ – घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो, नामिबिया
  • इतर पंतप्रधानांची भाषणे:
    • डॉ. मनमोहन सिंग – ७
    • इंदिरा गांधी – ४
    • जवाहरलाल नेहरू – ३
    • राजीव गांधी – २
    • अटलबिहारी वाजपेयी – २
    • मोरारजी देसाई – १
    • पी. व्ही. नरसिंहराव – १
  • ही कामगिरी भारताच्या जागतिक स्तरावरील नेतृत्वाची साक्ष देते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment