Current Affairs | चालू घडामोडी | 20 OCT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 OCT 2024

1) 20 ऑक्टोबर दिनविशेष

1.1) 20 ऑक्टोबर 1969 = पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना

  • स्थळ = अकोला

1.2) 20 ऑक्टोबर 2022 MITRA (मित्र) स्थापनेचा निर्णय

  • ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन’
  • नित्या आयोगाच्या धर्तीवर राज्य शासनाचा निर्णय

2) राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती

  • राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.
  • तर महाराष्ट्र महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 1993 ला केली.
  • राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत.
  • यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आहे.
  • पहिल्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष सुश्री जयंती पटनायक होत्या.

3) हरियाणात विनेश फोगाट, सावित्री जिंदाल विजयी

  • दुष्यंत चौटाला पराभूत : विद्यमान मुख्यमंत्री सैनी, माजी मुख्यमंत्री हुड्डा विजयी
  • विनेशने दिग्गजांना दाखवले अस्मान
  • जुलाना मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार कुस्तीपटू विनेश फोगाटने विजय मिळवला.
  • जननायक जनता पक्षाचे अमरजित धांडा, भाजपचे योगेश बैरागी या अनुभवी उमेदवारांना विनेश फोगाटने अस्मान दाखवले व या मतदारसंघात विजय मिळवला.

4) मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण : पंतप्रधान मोदी

  • १० वैद्यकीय महाविद्यालयांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन
  • कुठे असतील ही महाविद्यालये?
  • ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली.

5) PM गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (PMGS-NMP)

  • सुरुवात : 13 ऑक्टोबर 2021
  • नवनिर्मितीला प्रोत्साहन
    • => PMGS-NMP च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोदींनी भारत मंडपम येथे असलेल्या ‘पीएम गतिशक्ती केंद्राला’ अचानक भेट दिली.
  • उद्देश
    • => भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम विकासाला चालना देणे

6) सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत.

  • खरं तर, न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे.
  • यासोबतच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांच्या मते  कायदा कधीच आंधळा नसतो.
  • तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते.
  • तसेच, न्यायदेवतेच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment