Current Affairs | चालू घडामोडी | 21 JULY 2025

Current Affairs | चालू घडामोडी | 21 JULY 2025

1) २१ जुलै दिनविशेष

१.१) १९६९ = मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल

  • यानाचे नाव अपोलो-११
  • प्रथम पाऊल नील आर्मस्ट्रांग
  • दुसरे पाऊल = एडवीन ॲलड्रीन

१.२) १९१०: स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे यांचा जन्म.

१.३) १९०६: भारतीय कॉंग्रेसचे सह-संस्थापक आणि पहिले अध्यक्ष व्योमेशचन्‍द्र बनर्जी यांचे निधन

2) अर्थंकल (Arthunkal) पोलीस स्टेशन – भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन

  • ठिकाण – अर्थंकल पोलीस स्टेशन, चेरथला सर्कल, अलप्पुझा जिल्हा, केरळ.
  • प्रमाणपत्र : IS/ISO 9001 : 2015 (QMS) ― गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीसाठीचे जागतिक मानक.
  • भारतीय मानक ब्यूरो (BIS) ने प्रमाणपत्र दिले
  • हे पोलीस स्टेशन नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी ओळखले 

3) टीआरएफ (TRF) अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित

  • पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची सूत्रधार संघटना ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ला (टीआरएफ) अमेरिकेने जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
  • टीआरएफ ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारतानंतर अमेरिका हा दुसरा देश.
  • पहलगाममध्ये २२ एप्रिल 2025 ला ‘टीआरएफ’च्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून २७ लोकांची हत्या केली होती.
  • पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्करे तैय्यबाचा नवा अवतार असलेल्या ‘टीआरएफ’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती
  • त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबविताना पाकव्याप्त काश्मीर तसेच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते.

4) पुस्तक = ‘फ्रॉम कमोडिटी टू ब्रँड’

  • लेखक = नागेश पन्नास्वामी
  • लेखक नागेश हे ‘इंडिपेन्डन्ट इंटिग्रेटेड ॲडव्हर्टायझिंग एजन्सी करी नेशन’चे संस्थापक

5) देशात पहिल्यांदाच ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणुकीवर कठोर कारवाई!

  • पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक निर्णय – ९ जणांना जन्मठेप!
  • सायबर गुन्ह्यांमध्ये दोषींना शिक्षा देणारा देशातील पहिलाच निकाल
  • डिजिटल अरेस्टप्रकरणी दिलेली ही पहिलीच जन्मठेप
  • डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
    • बनावट पोलीस/तपास यंत्रणा म्हणून कॉल
    • “तुम्ही ड्रग्स / मनी लॉन्ड्रिंगमध्ये अडकलात” अशी भीती
    • सतत कॉल्स, मेसेजेस आणि व्हिडिओ कॉलवर पोलीस स्टेशनचा सेटअप
    • “सुटकेसाठी पैसे द्या” – अशी फसवणूक
  • खरं लक्षात ठेवा:
    • ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार फक्त बनावट आहे!
    • कोणतीही सरकारी यंत्रणा तुम्हाला फोनवर अटक करत नाही!
  • या निर्णयामुळे देशात सायबर गुन्ह्यांविरोधात नवा अध्याय सुरू!
  • सावध व्हा, जागरूक रहा, फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा!

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment