Current Affairs | चालू घडामोडी | 22 JULY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 JULY 2024

22 जुलै 2024

1.1) राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार = 22 जुलै 1947

  • संविधान सभेत निर्णय
  • तिरंग्याचे रचनाकार = पिंगळी व्यंकय्या
  • लांबी:उंची = 3:2
  • भारतीय ध्वजसंहिता = 2002

1.2) राष्ट्रीय ध्वज दिन : 22 जुलै

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळण्याआधी जवाहरलाल नेहरूंनी 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत पिंगली वेकय्या ध्वजाचा प्रस्ताव स्वीकारला.
  • दरवर्षी 22 जुलै रोजी भारतात राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला जातो.
  • स्वातंत्र्यापूर्वी भारतीय तिरंगा भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून date स्वीकारल्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो
  • त्यानंतर हा ध्वज भारतीय प्रजासत्ताक म्हणून कायम ठेवण्यात आला.

2) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करीता ५ हजार ५०० कोटींची तरतूद.
  • उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्ष या वयोगटातील असावे
  • उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्ण- रु.६ हजार, आय.टी.आय व पदविका उत्तीर्ण – रु.८ हजार, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण रु.१० हजार दरमहा विद्यावेतन मिळणार
  • कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने राहील
  • शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे व विविध क्षेत्रातील प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, आस्थापनांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविणे गरजेचे.

3) शाळांमध्ये महावाचन उत्सव, अमिताभ बच्चन सदिच्छादूत

  • 22 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान आयोजन
  • वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024 ‘हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
  • या उपक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली.

4) केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी ५८ वर्षांपूर्वी घातलेले निर्बंध हटवले आहेत.

  • आता सरकारी कर्मचारी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
  • ३० नोव्हेंबर १९६६, २५ जुलै १९७० आणि २८ ऑक्टोबर १९८० साली संबंधित कार्यालयांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख निर्बंधातून वगळण्यात यावा असा आदेश सरकारने दिला आहे. 

5) गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात असलेले पालिताना हे जगातील पहिले असे शहर घोषित करण्यात आले आहे, जिथे मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे.

  • या ऐतिहासिक निर्णयानंतर येथे मांसासाठी प्राण्यांची हत्या, तसेच मांस विक्री आणि सेवन हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे.
  • आता पालीतानात फक्त मांस आणि अंडी विक्रीवरच बंदी आहे असे नाही तर जनावरांच्या कत्तलीला देखिल बंदी घालण्यात आली आहे.
  • हा नियम मोडणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
  • पालीताना एक जैन तीर्थक्षेत्र
  • पालीताना हे सामान्य शहर नाही तर ते जैन समाजाचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
  • त्याला “जैन मंदिर शहर” असे टोपणनाव देखिल आहे.
  • शत्रुंजय टेकड्यांभोवती वसलेले हे अतिशय सुंदर शहर आहे.
  • शहरात 800 हून अधिक मंदिरे आहेत.
  • त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आदिनाथ मंदिर आहे.

6) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (८१) यांनी रविवारी जाहीर केले की, ते आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या नव्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना समर्थन जाहीर केले आहे.

  • अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेताना बायडेन यांनी म्हटले आहे की, हे माझ्या पक्षाच्या आणि देशाच्या हिताचे आहे.
  • बायडेन यांचा हा निर्णय अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या चार महिने आधी आला आहे.
  • जूनच्या उत्तरार्धात त्यांचे रिपब्लिकन पार्टीचे प्रतिस्पर्धी आणि देशाचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत खराब कामगिरीनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते गेल्या अनेक आठवड्यांपासून बायडेन यांच्यावर स्पर्धेतून माघार घेण्यासाठी दबाव आणत होते. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • बायडेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, ‘अध्यक्ष म्हणून काम करणे, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.’

7) सुधारित व्याज अनुदान योजना (MISS)

  • Modified interest subvention scheme (MISS) अंतर्गत अल्प-मुदतीच्या पीक कर्जावरची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
  • शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना अनुदानित व्याजदरावर अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे आहे.
  • ही योजना 2022-23 ते 2024-25 या वर्षासाठी राबविण्यात येत आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSBs), खाजगी क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRBs) स्वतःच्या निधीच्या वापरावर आणि RRB आणि सहकारी बँकांना पुनर्वित्त करण्यासाठी नाबार्डला व्याज सवलत दिली जाईल.
  • ही योजना नाबार्ड आणि आरबीआय द्वारे राबविण्यात येत आहे.

8) नावू मनुजारू कार्यक्रम

  • कर्नाटक सरकार शाळांमध्ये ‘नावू मनुजारू’ कार्यक्रम सुरू करणार आहे.
  • सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
  • यात दोन तासांच्या साप्ताहिक चर्चा आणि संवादांचा समावेश असतो (प्रत्येकी 40 मिनिटांचा तीन कालावधी).
  • यामध्ये सामाजिक समरसता, स्थानिक आणि राष्ट्रीय सणांचे महत्त्व, खेळ या विषयांवर चर्चा केली जाईल.
  • समाजसुधारकांच्या विचारांचा शोध, स्थानिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी आणि विभक्त कुटुंबांवर चर्चा, असमानता निर्मूलन आणि समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व यासारख्या घटनात्मक मूल्यांवरही ते लक्ष केंद्रित करेल.
  • अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि मार्गदर्शन देण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त केले जातील.

9) पँगॉन्ग लेक

  • उपग्रह प्रतिमांमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्व लडाखमधील पँगॉन्ग तलावाच्या आसपासच्या भागात भूमिगत बंकर बांधल्याचे आढळून आले आहे.
  • पँगॉन्ग लेक बद्दल
    • पँगॉन्ग त्सो हे हिमालयात स्थित एक उच्च-उंची, लँडलॉक्ड सरोवर आहे, जे विवादित भारत-चीन सीमेवर पसरलेले आहे.
    • हे सरोवर 4,225 मीटरवर स्थित असून आणि प्रामुख्याने खारट आहे.
    • सूर्यप्रकाश आणि इतर घटकांनुसार तलावाचे पाणी वेगवेगळ्या वेळी रंग बदलते, ते निळे, हिरवे किंवा अगदी लाल दिसते.
    • पँगॉन्ग त्सो हे अनेक स्थलांतरित प्रजातींसह विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी एक आवश्यक प्रजनन स्थळ आहे.

9) युनेस्कोने 11 नवीन बायोस्फियर रिझर्व्ह जाहीर केले आहेत

  • नवीन क्षेत्रे – कोलंबिया, डोमिनिकन रिपब्लिक, गॅम्बिया, इटली, मंगोलिया, फिलीपिन्स, दक्षिण कोरिया आणि स्पेनमध्ये आहेत.
  • याव्यतिरिक्त प्रथमच, यादीमध्ये बेल्जियम आणि नेदरलँड्स आणि इटली आणि स्लोव्हेनिया मध्ये पसरलेल्या दोन सीमापार क्षेत्रांचाही समावेश आहे.
  • 11 नव्याने जाहीर केलेले बायोस्फीअर राखीव क्षेत्रे :
    1. केम्पेन-ब्रोक ट्रान्सबाउंडरी बायोस्फीअर रिझर्व्ह (बेल्जियम, नेदरलँड्स)
    2. डॅरियन नॉर्टे चोकोआनो बायोस्फीअर रिझर्व्ह (कोलंबिया)
    3. माद्रे डे लास अगुआस बायोस्फीअर रिझर्व्ह (डोमिनिकन रिपब्लिक)
    4. निउमी बायोस्फीअर रिझर्व्ह (गॅम्बिया)
    5. कोली युगेनी बायोस्फीअर रिझर्व (इटली)
    6. ज्युलियन आल्प्स ट्रान्सबॉउंडरी बायोस्फीअर रिझर्व्ह (इटली, स्लोव्हेनिया)
    7. खार उस लेक बायोस्फीअर रिझर्व (मंगोलिया)
    8. अपायाओस बायोस्फीअर रिझर्व्ह (फिलीपिन्स)
    9. चांगन्येंग बायोस्फीअर रिझर्व (दक्षिण कोरिया)
    10. व्हॅल डी’अरन बायोस्फीअर रिझर्व (स्पेन)
    11. इराती बायोस्फीअर रिझर्व्ह (स्पेन).

10) खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (KIRTI) कार्यक्रम:

  • पॅरिस ऑलिम्पिक जवळ येत असताना खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (KIRTI) कार्यक्रमाला नव्याने चालना मिळणार आहे.
  • किर्ती बद्दल
    • KIRTI (Khelo India Rising Talent Identification) चे उद्दिष्ट आधुनिक ICT टूल्स द्वारे भारतात खेळांच्या विकासाला हातभार लावणे आहे.
    • देशभरातील क्रीडा प्रतिभा ओळखणे,
      9 ते 18 वयोगटातील शालेय मुलांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचा सामना करण्यासाठी खेळांचा वापर करणे आणि गॅझेटचा जास्त वापर करणे हे या कार्यक्रमाद्वारे साध्य केल्या जाईल.
    • हा कार्यक्रम 2036 पर्यंत भारताला टॉप 10 क्रीडा राष्ट्र बनण्याच्या आणि 2047 पर्यंत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.

11) पहिला ‘ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार’

  • हा पुरस्कार केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला आहे.
  • राहुल गांधी याचे पहिले मानकरी ठरले आहेत.
  • पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपये आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते नेमम पुष्पराज यांनी बनवलेली मूर्ती दिली जाईल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment