Current Affairs | चालू घडामोडी | 23 JULY 2025
1) २३ जुलै दिनविशेष
१.१) १८५६ = लोकमान्य टिळक जयंती
- स्थापना-न्यू इंग्लिश स्कूल (१८८०),
- डेक्कन एज्युकेशन सोसायटी
- सार्वजनिक गणेश उत्सव (१८९३),
- शिवजयंती उत्सव
- ग्रंथ – गीतारहस्य, The Arctic home of Vedas, ओरायन
१.२) १९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.
१.३) १९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
१.४) १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला.
१.५) २०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन.
2) अमेरिका ‘युनेस्को’तून पुन्हा बाहेर
- संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या ‘युनेस्को’ मधून बाहेर पडत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले.
- ही संस्था इस्त्रायल विरोधात पूर्वग्रह बाळगून असल्याचा आरोप करत अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.
- अमेरिकेने ‘युनेस्को’ मधून बाहेर पडण्याची ही तिसरी वेळ आहेत
- सर्वात प्रथम १९८४ मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ‘युनेस्को’ वर गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि सोव्हिएत रशियाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
- २०१७ मध्ये ट्रम्प यांनी या निर्णयाची पुनरावृत्ती केली.

3) UNESCO – संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था
(United Nations Educational, Scientific and Cultural Organization)
- स्थापना – 16 नोव्हेंबर 1945
- मुख्यालय – पॅरिस, फ्रान्स
- सदस्य देश – १९३
- उद्दिष्ट
- शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि वारसा यांच्याद्वारे जागतिक शांतता व सहकार्य वाढवणे.
- शिक्षणाचा प्रसार, स्त्री-पुरुष समता आणि गरिबी निर्मूलनात मदत करणे.
- प्रमुख कार्य –
- जागतिक वारसास्थळांची यादी जाहीर करणे
- शिक्षण धोरण व संशोधनाला प्रोत्साहन
- भाषिक विविधता आणि संस्कृती संवर्धन
- पर्यावरण व पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन
- भारत व युनेस्को –
- भारत १९४६ पासून युनेस्कोचा सदस्य आहे
- भारतातील ४० पेक्षा जास्त स्थळांना “युनेस्को जागतिक वारसास्थळ” दर्जा मिळाला आहे

4) मिग-२१ लढाऊ विमाने सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त
- भारतीय हवाई दलातील मिग-२१ विमाने सप्टेंबर २०२५ मध्ये सेवेतून बाद होणार
- या विमानांची जागा देशी बनावटीची तेजस LCA मार्क 1A विमाने घेणार
- १९६३ मध्ये मिग-२१ विमाने भारतीय ताफ्यात दाखल
- सोव्हिएत रशियासोबत करार
- भारतातील पहिली स्वनातीत लढाऊ विमाने
- सहभाग –
- १९७१ भारत-पाक युद्ध
- १९९९ कारगिल युद्ध
- २०१९ बालाकोट हवाई हल्ला
- या वेळी विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पकडण्यात आले होते
- सध्या स्क्वाड्रन्स – राजस्थानच्या नाल हवाई तळावर
- अपघातांमुळेही ही विमाने चर्चेत राहिली
- २०२३ मध्ये उत्तरलाई येथील मिग-२१ व सुखोई-३० स्क्वाड्रन निवृत्त

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel