Current Affairs | चालू घडामोडी | 24 JULY 2025
1) २४ जुलै दिनविशेष
१.१) १९९१ = नवीन औद्योगिक धोरण जाहीर
- औद्योगिक परवाना पद्धत सुधारणा, MRTP कायदा रद्द, खाजगीकरण
- निर्गुतवणुकीकरण आणि परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन
१.२) १९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
१.३) १९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.
2) अपाचे हेलिकॉप्टर – लष्करी सामर्थ्यात वाढ
- हवाई टैंक म्हणून प्रसिद्ध असलेले अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल
- अमेरिकेच्या बोइंग कंपनीकडून भारतीय लष्करासाठी निर्मिती
- पाक सीमेलगत जोधपूरमध्ये होणार तैनाती – भारताच्या लष्करी क्षमतेत मोठी भर
- वेग: 280 किमी/तास, उड्डाणक्षमता: 550 किमी
- सलग 3 तास उड्डाण शक्य
- 22 हेलिकॉप्टरसाठी 2015 मध्ये अब्जावधी डॉलर्सचा करार
- 2017 मध्ये ₹4168 कोटींच्या शस्त्रास्त्रांसह आणखी 6 हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी
- उद्दिष्ट – आधुनिक युद्ध कौशल्य आणि सीमासुरक्षेत बळकटी

3) ‘निसार’ – नासा आणि इस्रोची ऐतिहासिक संयुक्त मोहीम!
- ३० जुलैला श्रीहरिकोटावरून झेपावणार ‘निसार’ उपग्रह —
पृथ्वीच्या पृष्ठभागातील बदल आणि नैसर्गिक आपत्तींवर करणार बारकाईने नजर! - पहिलाच ड्युअल फ्रिक्वेन्सी रडार उपग्रह
- ‘इस्रो’च्या S-बँड आणि ‘नासा’च्या L-बँडचा वापर
- ढगांमधूनही स्पष्ट निरीक्षण!
- उपग्रहाचे वजन – 2,392 किलो
- GSLV-F16 रॉकेटमार्फत 743 किमी उंचीवर पाठवला जाईल.
- प्रत्येक १२ दिवसांनी पृथ्वी स्कॅन
- जमीन, हिमप्रदेश, समुद्र, जहाजांची हालचाल – अचूक माहिती!
- नैसर्गिक आपत्तींचे पूर्वसूचनादान
- भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलन, वादळ यांची प्रभावी ओळख.
- 1 सेमी इतके लहान बदलही टिपण्याची क्षमता!
- एकूण खर्च – ₹10,349 कोटी
- जागतिक स्तरावरील विज्ञान-तंत्रज्ञानातील भारत-अमेरिकेची मोठी उडी!
- ‘निसार’ बदल घडवणारा उपग्रह – विज्ञानाचा नवा अध्याय!

4) रतन थिय्याम (1948–2025) – ‘थिएटर ऑफ रूट्स’ चे आधारस्तंभ
- प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक व कवी रतन थिय्याम यांचे २३ जुलै २०२५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले
- मूलतः मणिपूर येथील असलेले थिय्याम यांनी ईशान्य भारताच्या परंपरा, नृत्य आणि कला यांना भारतीय रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणले.
- त्यांनी पाश्चात्त्य प्रभावाच्या काळात भारतीय नाट्यपरंपरेचा ‘थिएटर ऑफ रूट्स’ हा प्रवाह निर्माण केला (१९७० चे दशक)
- गाजलेली नाटके
- करणभरम, इम्फाळ इम्फाळ, चक्रव्यूह, लेंगशोनेई, उत्तर प्रियदर्शी, अंध युग, ऋतुसंहारम, आशिबागी एशेई, द किंग ऑफ डार्क चेंबर इ.
- महत्त्वाचे पुरस्कार
- पद्मश्री (1989 – नंतर 2001 मध्ये परत), संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॉकफेलर पुरस्कार, फ्रिंज फर्स्ट्स (एडिनबर्ग), भूपेन हजारिका सन्मान इ.
- भूमिका आणि कार्य
- एनएसडी पदवीधर होणारे पहिले मणिपुरी कलाकार
- 1987–88 मध्ये एनएसडी संचालक, 2013–17 अध्यक्ष
- संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष
- सामाजिक भूमिका
- 2023 साली मणिपूर शांतता समितीत सहभागी होण्यास नकार

5) मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य अभियान
- ‘जीबीएस’ आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी मुख्यमंत्री ग्राम स्वास्थ्य योजना लवकरच राबविण्यात येणार आहे
- अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली
- ग्रामपंचायत आणि आरोग्यसेवक एकत्रितपणे शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करतील
- चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांना या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनपर बक्षीस मिळेल

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel