Current Affairs | चालू घडामोडी | 25 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 25 SEPT 2024

1) 25 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 25 सप्टेंबर 1916 = दीनदयाळ उपाध्याय जयंती

  • जनसंघाचे नेते
  • योजना = दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (2014)
  • दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना (2015)
  • दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना

2) श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान म्हणून हरिणी अमरसूर्या यांनी शपथ घेतली आहे.

  • श्रीलंका देशाच्या इतिहासातील तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत.
  • जगातील पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून श्रीलंकेच्याच होत्या = सिरिमावो बंडारनायके
  • श्रीलंकेविषयी महत्वाचे
  • स्थापना= ४ फेब्रुवारी, १९४८
  • राजधानी=श्री जयवर्धनपुरा कोट्टे
  • पंतप्रधान=हरिणी अमरसूर्या
  • राष्ट्रपती=अनुरा कुमारा दिसानायके
  • चलन= श्रीलंका रुपया

3) परराष्ट्रविषयक समितीच्या अध्यक्षपदी शशी थरूर

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना परराष्ट्रविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. तर, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह शिक्षणविषयक समितीची धुरा सांभाळतील.
  • ग्रामविकास समितीचे नेतृत्व ओडिशातील खासदार सप्तगिरी उलाका करतील.
  • संसदीय स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.

4) ” मिशन मौसम “

  • भारत सरकारने 11 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘मिशन मौसम’ नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल.
  • यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे.
  • केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे.
  • ‘मिशन मौसम’ची उद्दिष्टं काय आहेत?
    • हवामान निरीक्षणा साठीच्या आधुनिक यंत्रणा या कार्यक्रमाद्वारे वापरात आणण्यात येणार आहेत.
    • यामध्ये डॉप्लर रडार, हाय परफॉर्मन्स कम्प्युटर्स, विंड प्रोफायलर्स आणि रेडिओमीटर्सचा समावेश असेल.
  • खालील 3 संस्थांद्वारे ही योजना राबवली जाईल
    1. India Meteorological Department
    2. Indian Institute of Tropical Meteorology
    3. National Centre for Medium-Range Weather Forecasting

5) भारताची अर्थव्यवस्था लवकरच तिसऱ्या क्रमांकाची होणार

  • भारत आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असे भाकीत एस अँड पी ग्लोबलने प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवले.
  • विद्यमान आर्थिक वर्षात 6.7 टक्क्यांच्या विकासदराने अर्थव्यवस्था मार्गक्रमण करेल.
  • वर्ष 2023-24 मधील 8.2 टक्क्यांचा विकासदर टिकवून ठेवण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्रात सुधारणा, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न आणि सार्वजनिक भांडवलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी निरंतर सुधारणा करणे आवश्यक असल्याचे अहवालाने नमूद केले आहे.

6) भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू हिला तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment