Current Affairs | चालू घडामोडी | 27 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 27 JUN 2024

1) आसाम मधील माजुली जिल्ह्याची निर्मिती = 27 जून 2016

  • भारतातील पहिला नदीतील बेटिय जिल्हा (नदी = ब्रम्हपुत्रा)

2) पॅराग्वे बनला सौर आघाडीतील शंभरावा देश

  • भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य म्हणून पॅराग्वे सहभागी झाला आहे.
  • सध्या या आघाडीमध्ये 119 देश सहभागी आहेत. मात्र त्यापैकी 99 देशांनी प्रत्यक्ष सहभागाची कागदपत्रे सुपूर्द केली आहे.
  • मे महिन्यात स्पेनने 99 वा सदस्य देश म्हणून मान्यता पत्र सादर केले होते. आता यामध्ये पॅराग्वेचीही भर पडली आहे.
  • इंटरनॅशनल सोलर एलायन्स :
  • स्थापना : 30 नोव्हेंबर 2015 मुख्यालय : हरियाणा, गुरुग्राम

3) नाटोच्या सरचिटणीस पदी मार्क रुट यांची नियुक्ती

  • नेदरलॅन्डचे मावळते पंतप्रधान मार्क रुट यांची नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन च्या भावी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नाटोचे विद्यमान सरचिटणीस नॉर्वेचे जेन्स स्टॉटेन्बर्ग यांच्या जागेवर 1 ऑक्टोबर पासून मार्क रुट नटोचे सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
  • ब्रुसेल्समध्ये नाटोच्या मुख्यालयात सर्व सदस्य देशांच्या नाटो राजदूतांच्या उपस्थितीत नवीन सरचिटणीसांच्या निवडीची प्रक्रीया पार पडली.
  • NATO : North Atlantic Treaty Organization
  • स्थापना : 4 एप्रिल 1949

4) जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन : 26 जून

  • दरवर्षी 26 जून हा दिवस जगभर जागतिक अमलीजागतिक अमली पदार्थ विरोधी दिन पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने 1988 साली याची घोषणा केली.
  • 26 जून या दिवसाला चीन मधील पहिल्या अफू युद्धाच्या काळात (1987) अफू व्यापारावर घातल्या गेलेल्या बंदीचा संदर्भ आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment