Current Affairs | चालू घडामोडी | 14 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 14 MAY 2024

1) छत्रपती संभाजी महाराज जयंती 14 मे 1657

2) चाबहार बंदराच्या संचालनासाठी भारताचा इराणशी करार

  • व्यापार तसेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी १० वर्षांच्या करारावर भारताने सोमवारी स्वाक्षरी केली, यामुळे मध्य आशियाशी व्यापार वाढविण्यास देशाला मदत होईल.
  • या माध्यमातून भारताकडून प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेतले जाणार आहे
  • पाकिस्तानच्या हद्दीत न शिरता आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्ते आणि रेल्वे मार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी हे बंदर प्रवेशद्वार ठरेल
  • सर्वप्रथम २०१६ च्या सुरुवातीला चाबहार बंदरातील शाहिद बेहेश्ती टर्मिनलचा वापर भारताकडून सुरू झाला. पण दरसाल नूतनीकरण होणाऱ्या या कराराची जागा आता दीर्घ मुदतीच्या कराराकडून घेतली जाईल.
  • चाबहारचा वापर गेल्या वर्षी भारताने अफगाणिस्तानला गव्हाची मदत पाठवण्यासाठी केला होता.

3) उत्तराखंड सरकारने ‘पिरुल लाओ पैसा पाओ’ अभियान सुरू केले

  • उत्तराखंड राज्यातील जंगलातील भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे.
  • या मोहिमेत सहकार, युवा मंगल दल, वन पंचायत यांचाही सहभाग असणार आहे.
  • या मोहिमेअंतर्गत, स्थानिक तरुण आणि गावकरी जंगलातील कोरडे पिरुल (पाइन झाडाची पाने) गोळा करतील आणि नियुक्त केलेल्या पिरुल संकलन केंद्रात घेऊन जातील. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या देखरेखीखाली त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तहसीलदार पिरुल संकलन केंद्राचे व्यवस्थापन करतील.

4) महिंद्रा अँड महिंद्राने ‘ड्रोन दीदी’ पायलट प्रोजेक्टसाठी MSDE सोबत सामंजस्य करार केला

  • उद्देश = ग्रामीण महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी,
  • मंत्रालय = केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE)
  • नोएडा आणि हैदराबाद येथे सुरुवातीचे पायलट प्रकल्प सुरू होतील
  • ड्रोन दीदी योजना
    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 मार्च 2024 रोजी भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा, नवी दिल्ली येथे सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमांतर्गत नमो ड्रोन दीदी योजनेचा शुभारंभ केला.
    • ड्रोन दीदी योजनेंतर्गत, पीक निरीक्षण, खते फवारणी आणि बियाणे पेरणे यासारख्या कामांमध्ये मदत करण्यासाठी 15000 महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना कृषी ड्रोनने प्रशिक्षण आणि सुसज्ज करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

5) Drone संबंधी पहिले राज्य/शहर ‼️

Drone मेळावा – ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)
Drone महोत्सव – दिल्ली
Drone धोरण – हिमाचल प्रदेश
Drone कृषी वापर – तेलंगणा
Drone भाड्याने – राजस्थान

  • नागरी वापर पहिला देश
    इस्राईल
  • वरुणा = भारतातील पहिला प्रवासी drone by सागर डिफेन्स इंजिीअरिंग

6) रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकाना ‘युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर’मध्ये समाविष्ट


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment