Current Affairs | चालू घडामोडी | 15 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 MAY 2024

1) 15 मे

1.1) देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिवस = 15 मे 1817

  • तत्वबोधिनी सभा स्थापना = 1839
  • तत्वबोधिनी पत्रिका = 1843
  • आदी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व

1.2) विजय केळकर जन्मदिन = 15 मे 1942

  • पद्मविभूषण = 2011
  • तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष = 2007
  • पीपीपी समिती अध्यक्ष

2) भारत आता जपानलाही मागे टाकणार

  • 2025 मधे चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार

3) माजी लष्करी अधिकारी वैभव काळेंचा गाझामधील हल्ल्यात मृत्यू

  • संयुक्त राष्ट्रांसह इस्रायलचेही चौकशीचे आदेश
  • 2023 मधे या युद्धाला तोंड फुटल्यापासून गेलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे
  • कर्नल काळे यांची पार्श्वभूमी
    • कर्नल काळे एप्रिल २००४ मध्ये भारतीय लष्करी सेवेत दाखल झाले होते.
    • त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सन २००९ ते २०१० दरम्यान ‘कंटीजेन्ट चिफ सेक्युरिटी ऑफिसर’ या पदावर सेवा बजावली.
    • दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बी.ए.ची पदवी संपादन केली होती. त्यांनी वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याची पदवी संपादन केली होती.
    • त्यांनी लखनौ येथील ‘आयआयएम’मधूनही पदवी संपादन केली होती.
    • त्यांनी भारतीय लष्करातून सन २०२२ मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती. त्यांनी ‘११ जम्मू आणि काश्मीर रायफल्स’मध्ये सेवा बजावली होती.
    • दोनच महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून रूजू झाले होते

4) युवा विद्यापीठ क्रमवारी

  • टाइम्स हायर एज्युकेशनतर्फे (THE) युवा विद्यापीठ क्रमवारी (यंग युनिव्हर्सिटी रँकिंग) जाहीर करण्यात आली. त्यात देशातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा पहिल्या दोनशे संस्थांमध्ये समावेश झाला आहे
  • जागतिक विद्यापीठ क्रमवारीचेच निकष या क्रमवारीसाठी वापरण्यात आले
  1. अध्यापन
  2. संशोधनात्मक वातावरण
  3. संशोधन गुणवत्ता
  4. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन
  5. उद्याोगातून उत्पन्न
  6. एकस्व अधिकार (पेटंट)

अशा निकषांवर शिक्षण संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले.

  • जागतिक स्तरावर पहिले तीन क्रमांक
  1. सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी
  2. फ्रान्समधील पॅरिस येथील पीएसएल रीसर्च युनिव्हर्सिटी
  3. द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी
  • केरळमधील कोट्टायमच्या महात्मा गांधी विद्यापीठाने 81 वे स्थान पटकाविले आहे.
  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) 162 व्या स्थानी आहे.

5) भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांचे निधन

  • GST अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.
  • त्यांनी ‘जीएसटी’तील अडीअडचणी दूर करण्यासाठी राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी असंख्य वेळा संवाद साधले, शंकांचे निरसन केले. उच्चाधिकार समितीत चर्चा घडवून आणली.
  • ‘जीएसटी’त अर्थकारण, करपद्धती आणि तंत्रज्ञान असा त्रिवेणी संगम आहे. ‘जीएसटी’ अमलात आणण्यासाठी लागणारे माहिती-तंत्रज्ञानाचे जाळे विकसित करण्याचे श्रेयही सुशीलकुमार मोदींना जाते
  • वाजपेयींनी त्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आणले. बिहारमध्ये नेतेपदावर पोहोचलेले बहुतांश बिगरकाँग्रेसवादाचे बाळकडू घेऊन मोठे झाले.
  • बिहारमध्ये ते 2 वेळा उपमुख्यमंत्री देखील झाले. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले

6) ग्राहक संरक्षण कायदा वकिलांना लागू नाही

  • सेवेतील कमतरतेबद्दल वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्याखाली जबाबदार धरता येणार नाही. सेवेतील कमतरतेबद्दल त्यांना ग्राहक न्यायालयात खेचता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
  • विधी व्यवसाय हा एकमेवाद्वितीय आहे, येथील कामाचे स्वरूप वैशिष्टयपूर्ण आहे आणि त्याची तुलना अन्य व्यवसायांशी करता येणार नाही, असे खंडपीठाने सांगितले.
  • वकील आणि त्यांच्या सेवा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कक्षेत येतात, या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निवाड्याला बार कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि बार ऑफ इंडियन लॉयर्स यांनी आव्हान दिले होते
  • ग्राहक संरक्षण कायदा = 2019

7) ब्रिक्स
(#Prediction)

  • ‘BRIC’ हा शब्द 2001 मध्ये जिम ओ’नील यांनी ‘बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स’ या book मध्ये प्रथम वापरला.
  • रूपा पुरुषोत्थमन यांनी ही संज्ञा प्रत्यक्षात आणली होती.
    • 2008 – BRIC एकत्र आले
    • 2009 – पहिली परिषद- रशियात
    • 2010 – मध्ये दक्षिण आफ्रिका सदस्य झाल्याने – 2010 पासून BRIC चे BRICS झाले.
  • संघटनेची उद्दिष्ट व कार्ये
    • गटांतील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे.
    • परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे.
    • आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे.
  • सध्या Permenent = 9 सदस्य
  1. Brazil
  2. Russia
  3. India
  4. China
  5. South Africa
  6. Iran
  7. Ethiopia
  8. Egypt
  9. UAE
  • Argentina सदस्यत्व घेण्यास नकार दिला आहे
  • Saudi Arabia चा अजून Official सहभाग नाही.
  • Summit
    • 2009 – 1 ली – एडातरीनबर्ग (रशिया)
    • 2021 – 13 वी – नवी दिल्ली (भारत) (video conference)
    • 2022 – 14 वी – बिजिंग (चीन) (video conference)
    • 2023 – 15 वी – जोहान्सबर्ग (द.आफ्रिका)
    • 2024 – 16 वी – कझान (रशिया)

8) फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांमध्ये रवी पंडित

  • पुण्यात मुख्यालय असलेल्या केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष रवी पंडित यांनी आता फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
  • जगभरातील आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांना केपीआआयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स पुरविते.
  • याआधी पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टीमचे आनंद देशपांडे यांनी या यादीत स्थान मिळविले होते
  • रवी पंडित यांच्या विषयी
    • रवी पंडित हे सनदी लेखापाल असून, त्यांच्या वडिलांची किर्तने अँड पंडित ही लेखा सेवा कंपनी होती.
    • हा व्यवसाय जागतिक पातळीवर नेण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी एमआयटी स्लोअन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शाखेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले.
    • त्यानंतर ते भारतात परतले. नंतर त्यांनी वडिलांच्या कंपनीचे रुपांतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत करण्यास सुरूवात केली. जी पुढे केपीआयटी टेक्नॉलॉजीज अशी नावारूपास आली

9) जागतिक हायड्रोजन परिषद 2024

  • दिनांक : 13 ते 15 मे 2024
  • ठिकाण : नेदरलँड्स येथील रॉटरडॅम येथे
  • जागतिक हायड्रोजन परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे
  • भारताने या परिषदेत आपले पहिले पवेलियन उभारले आहे. या पवेलियनची स्थापना केंद्रीय नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने केली.

10) सुलतान अझलान शाह हॉकी ट्रॉफी 2024

● विजेतेपद : जपान (पहिल्यांदा विजेतेपद)

● उपविजेतेपद : पाकिस्तान

  • दिनांक : 11 मे 2024
  • ठिकाण : मलेशिया, इपोह
  • यंदाची स्पर्धा : 30 वी
  • भारताने या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.
    • भारताने आतापर्यंत 5 वेळा जेतेपद पटकावले आहे = 1985, 1991, 1995, 2009, 2010

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment