Current Affairs | चालू घडामोडी | 16 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 16 MAY 2024

1) सिक्कीम भारतात विलीन झाले = 16 मे 1975

2) स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको गोळीबारात गंभीर जखमी

  • स्लोवाकिया हा रशियाचा मित्र देश असून युरोपातील मोजक्याच अमेरिका विरोधी देशांतील आहे

3) पाकिस्तानकडून ‘फताह-२’ची यशस्वी चाचणी

  • पाकिस्तानने फताह-२ निर्देशित रॉकेट प्रणालीच्या प्रशिक्षणाची यशस्वी चाचणी घेतली.
  • ‘फताह-२’ हे ४०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांचा अचूक वेध घेऊ शकते

4) महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेमधून ग्राहकांची २.२१ कोटींची बचत

  • महावितरणची ‘गो ग्रीन योजना’
    • वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत वीजग्राहकांना केवळ ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’चा पर्याय देणे
    • यामुळे ग्राहकांची तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांची वार्षिक बचत होत आहे
  • पुणे परिमंडलातील एक लाख २३ हजार वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे.

5) नीरज चोप्राने फेडरेशन चषकातील भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले

  • महाराष्ट्राच्या उत्तम पाटीलला कांस्यपदक तर कर्नाटकच्या डी पी मनू याने रौप्य पदक जिंकले

6) हायब्रीड सुनावणी बनले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वैशिष्ट्य

  • भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची खटले व्यवस्थापन यंत्रणा ‘फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर (एफओएसएस) वर विकसित केली गेली आहे आणि ती अशा प्रकारची जगातील सर्वांत मोठी यंत्रणा आहे.
  • कोरोना महामारीनंतरही थेट आणि ऑनलाइन सुनावणी (हायब्रीड सुनावणी) भारतीय न्यायालयांचे वैशिष्ट्य बनली आहे आणि ज्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणे खूप अवघड आहे, त्यांना याचा खूप फायदा झाला आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment