Current Affairs | चालू घडामोडी | 17 MAY 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 17 MAY 2024

1) 17 मे

1.1) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना = 17 मे 1993

1.2) बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट ची स्थापना (बी आय एस) = 17 मे 1930

2) सुनील छेत्री याने केली निवृतीची घोषणा

  • सोशल मीडियावर घोषणा : 6 जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना
  • कारकीर्द
    • २००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान.
    • दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका
    • २००८ साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे २७ वर्षात पहिल्यांदाच भारताला २०११ साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले.
    • २००२ मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत २०१० मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली.
    • सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू
    • आयएसएलमध्ये = इस्ट बंगाल, डेम्पो’ मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून या संघाकडून खेळ
    • छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले
  • पुरस्कार
    • 2011 = अर्जुन पुरस्कार
    • 2019 = पद्मश्री पुरस्कार
    • 2021 = खेलरत्न पुरस्कार

3) वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी मचाण पद्धत बंद झाल्यानंतर जनजागृतीच्या उद्देशाने वनखात्याने सुरू ठेवलेला मचाण उपक्रम वादाला निमंत्रण देतो आहे

  • पारंपरिक प्राणी-गणना?
    • जंगलातील प्राण्यांची आकडेवारी मिळवण्यासाठी पाणवठ्याजवळ झाडांवर मचाण उभारून त्यावर बसणे आणि येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद तसेच पाऊलखुणांवरून प्राण्यांची ओळख अशी पद्धत दशकभरापूर्वीपर्यंत वापरण्यात येत होती
    • मात्र यानंतरही त्रुटी राहात आणि गणना नेमकी होत नसे
    • बुद्धपौर्णिमेला होणारी पाणवठ्यावरील मचाण-गणना आणि पाऊलखुणांच्या साहाय्याने होणारी प्रगणना यांत अचूक आकडेवारी मिळत नसे
  • नवी पद्धत?
    • भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या दोन्ही संस्थांनी प्राणीगणनेसाठी ‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही वैज्ञानिक पद्धत तयार केली
    • 2010 मध्ये पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करून देशभरात एकाच वेळी प्राणीगणना केली
  • मचाण गणना बंद झाली असली तरीही ‘जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने’ बुद्धपौर्णिमेच्या रात्री ‘निसर्गानुभव’ याच नावाने मचाण उपक्रम सुरू ठेवण्यात आला

4) इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे. तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी

  • उसाचा रस किंवा मळीपासून इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारे हटविले असून देशभरातील कारखान्यांकडे शिल्लक असलेले सुमारे तीन हजार कोटींचे इथेनॉल खरेदी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्यांना दिले आहेत.
  • देशातील साखरटंचाई आणि साखरेच्या दरातील चढउतार टाळण्यासाठी केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ रोजी उसाचा रस आणि बी- हेवी मोलाईसेस(मळी) पासून इथेनॉल उत्पादन आणि खरेदीवर बंदी घातली होती.

5) दादासाहेब फाळके महोत्सवात ‘वंश’ लघुपटाला पुरस्कार

  • प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित सावी आर्ट्स आणि वाइड विंग्ज मीडियातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या ‘वंश’ या लघुपटाला दिल्ली येथे झालेल्या १४ व्या दादासाहेब फाळके महोत्सवात सन्मानित करण्यात आले.
  • देशासह परदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ‘वंश’ लघुपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली आहे.

6) तीन राज्यांतील सात हजार शिक्षकांना विज्ञान, गणित अध्यापनाचे धडे

  • विज्ञान आणि गणित या विषयांचे अध्यापन अभिनव पद्धतीने करण्यासाठी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर पुणे) आयराइज या प्रकल्पाअंतर्गत शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते
  • ३० तास, ८० तास आणि २० तास अशा त्रिस्तरीय प्रशिक्षणाचा यात समावेश असतो.
  • प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक पुढे अन्य शिक्षकांना प्रशिक्षण देऊ शकतात.
  • आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तराखंड, बिहार या तीन राज्यांतील सात हजारांहून अधिक शिक्षकांना धडे देण्यात आले.
  • प्रकल्पाची उद्दिष्ट्ये
  1. नवसंकल्पनांची संस्कृती निर्माण करण्याची परिसंस्था विकसित करणे,
  2. देशभरातील शाळा, उद्योगांमध्ये सर्जनशील आणि चिकित्सक विचार करण्यास प्रोत्साहन देणे,
  3. सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि वैज्ञानिक आव्हानांवर नवसंकल्पनेद्वारे उपाय शोधण्यासाठी रोडमॅप तयार करणे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment